Gmail प्रोग्राम धोरणे

खालील प्रोग्राम धोरणे Gmail ला लागू होतात. Gmail वापरणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक अनुभव देण्यामध्ये धोरणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

तुम्ही ग्राहक (उदा., @gmail.com) खात्यासह Gmail वापरत असल्यास, कृपया अधिक माहितीसाठी Google च्या सेवा अटी देखील पाहा. तुम्ही ऑफिस, शाळा किंवा दुसऱ्या संस्थेचे खाते वापरत असल्यास, तुमच्या संस्थेने Google शी केलेला करार अथवा इतर धोरणांनुसार अटी लागू होऊ शकतात. तुमचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर अधिक माहिती देऊ शकतो.

गैरवर्तनाची तक्रार नोंदवा

एखाद्या खात्याने आमची प्रोग्राम धोरणे यांचे उल्लंघन केले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, त्यासंबंधित तक्रार करण्याचे अनेक मार्ग आहेत:

  • सर्वसाधारण गैरवर्तनासाठीहा फॉर्म
  • वापरा
  • लहान मुलांना दुष्प्रेरित करण्यासाठी हा फॉर्म
  • वापरा
  • कॉपीराइटच्या उल्लंघनासाठी हा फॉर्म
  • वापरा

आम्ही गैरवर्तन कसे परिभाषित करतो हे समजून घेण्यासाठी खालील धोरणे वाचली आहेत याची खात्री करा. आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारी खाती Google बंद करू शकते. तुमचे खाते बंद केले गेले असल्यास आणि ते चुकून झाले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया या पेजवरील सूचना फॉलो करा.

खाते इनॅक्टिव्हिटी

अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी उत्पादन वापरा. अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये दर दोन वर्षांमधून किमान एकदा उत्पादन किंवा त्यामधील आशय अ‍ॅक्सेस करणे याचा समावेश आहे. इनॅक्टिव्ह खात्यांवर आम्ही कारवाई करू शकतो, ज्यामध्ये उत्पादनामधून तुमचे मेसेज हटवण्याचा समावेश असू शकतो. येथे आणखी वाचा.

स्पॅम आणि बल्क मेल

स्पॅम किंवा नको असलेले व्यावसायिक ईमेल पाठवण्यासाठी Gmail चा वापर करू नका.

CAN-SPAM कायदा किंवा इतर स्पॅमविरोधी कायद्यांचे उल्लंघन करणारे ईमेल पाठवण्यासाठी; मुक्त, तृतीय पक्ष सर्व्हर वापरून अनधिकृत ईमेल पाठवण्यासाठी अथवा कोणत्याही व्यक्तीचे ईमेल अ‍ॅड्रेस त्यांच्या संमतीशिवाय वितरित करण्यासाठी तुम्हाला Gmail चा वापर करण्याची अनुमती नाही.

वापरकर्त्यांची दिशाभूल किंवा फसवणूक करण्याकरिता ईमेल पाठवण्यासाठी, हटवण्यासाठी अथवा फिल्टर करण्यासाठी तुम्हाला Gmail इंटरफेस ऑटोमेट करण्याची अनुमती नाही.

कृपया लक्षात ठेवा की, “नको असलेला” ईमेल याची व्याख्या तुमच्यासाठी आणि तुमचा ईमेल मिळवणाऱ्यांसाठी वेगवेगळी असू शकते. मिळवणाऱ्यांनी याआधी तुमच्याकडून ईमेल मिळवणे निवडले असले तरीही मोठ्या संख्येने मिळवणाऱ्यांना ईमेल पाठवताना विचार करा. Gmail वापरकर्ते ईमेलना स्पॅम म्हणून मार्क करतात तेव्हा तुम्ही पाठवलेल्या पुढील मेसेजचेदेखील आमच्या गैरवापरविरोधी सिस्टमद्वारे स्पॅम म्हणून वर्गीकरण केले जाण्याची शक्यता वाढते.

एकाहून अधिक Gmail खाती तयार करणे आणि वापरणे

Google धोरणांचा गैरवापर करण्यासाठी, Gmail खात्याच्या मर्यादा ओलांडण्यासाठी, फिल्टर टाळण्यासाठी किंवा तुमच्या खात्यावरील बंधने हटवण्यासाठी एकाहून अधिक खाती तयार करू नका किंवा वापरू नका. (उदाहरणार्थ, गैरवर्तनामुळे दुसऱ्या वापरकर्त्याने तुम्हाला ब्लॉक केले असल्यास किंवा तुमचे Gmail खाते बंद केले गेले असल्यास, त्यासारख्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्यासाठी त्याच्या जागी दुसरे खाते तयार करू नका.)

तुम्हाला ऑटोमेटेड पद्धतीने Gmail खाते तयार करण्याची किंवा Gmail खात्यांची खरेदी, विक्री, व्यापार करण्याची अथवा ती इतरांना पुन्हा विकण्याचीदेखील अनुमती नाही.

मालवेअर

व्हायरस, मालवेअर, वर्म, दोष, ट्रोजन हॉर्स, करप्ट झालेल्या फाइल किंवा नुकसान पोहोचवणारे अथवा फसवणारे इतर कोणत्याही प्रकारचे आयटम प्रसारित करण्यासाठी Gmail चा वापर करू नका. याव्यतिरिक्त, Google किंवा इतरांच्या नेटवर्क, सर्व्हर अथवा मूलभूत संरचनांच्या कार्याला हानी पोहोचवणारा किंवा त्यामध्ये हस्तक्षेप करणारा आशय वितरित करू नका.

घोटाळा, फिशिंग आणि इतर प्रकारचे फसवे व्यवहार

तुम्ही दुसर्‍या वापरकर्त्याचे Gmail खाते त्याच्या स्पष्ट परवानगीशिवाय अ‍ॅक्सेस करू शकत नाही.

फिशिंगसाठी Gmail चा वापर करू नका. पासवर्ड, आर्थिक तपशील आणि सोशल सिक्युरिटी नंबर यांच्या समावेशासह पण त्यापुरत्याच मर्यादित नसलेल्या संवेदनशील वैयक्तिक डेटाची मागणी करणे किंवा गोळा करणे टाळा.

खोट्या हेतूने इतर वापरकर्त्यांची दिशाभूल किंवा फसवणूक करून त्यांना माहिती शेअर करण्यासाठी भाग पाडण्याकरिता मेसेज पाठवू नका. यामध्ये फसवणूक अथवा दिशाभूल करण्याच्या उद्देशाने दुसर्‍या व्यक्तीची, कंपनीची किंवा संस्थेची तोतयेगिरी करणे यांचा समावेश आहे.

लहान मुलाची सुरक्षितता

Google चे धोरण बाल लैंगिक गैरवर्तन आशय खपवून घेत नाही. आम्हाला अशा आशयाविषयी समजल्यास, आम्ही कायद्यानुसार नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन यांच्याकडे तक्रार नोंदवू. आम्ही यामध्ये सहभागी असलेल्या Gmail खात्यांविरुद्ध समाप्त करण्याच्या समावेशासह शिस्तभंगाची कारवाईदेखील करू शकतो.

Gmail वापरून मुलांना दुष्प्रेरित करण्यास, म्हणजेच लैंगिक अत्याचार, तस्करी किंवा इतर शोषणाची तयारी म्हणून लहान मुलाची भीती कमी करण्यासाठी त्याच्यासह भावनिक संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतींच्या संचाच्या स्वरूपातील गोष्टींना Google प्रतिबंधित करते.

लहान मुलाला धोका आहे किंवा ते गैरवर्तन, शोषण अथवा तस्करीच्या अधीन आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमच्या स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थेशी त्वरित संपर्क साधा.

तुम्ही कायदा अंमलबजावणी संस्थेकडे आधीच तक्रार केली असल्यास आणि तरीही मदत हवी असल्यास किंवा Gmail वापरून एखादे लहान मूल धोक्यात येणार आहे अथवा आले आहे अशी तुम्हाला काळजी वाटत असल्यास, तुम्ही हा फॉर्म वापरून Google कडे अशा वर्तनाची तक्रार नोंदवू शकता. कृपया लक्षात ठेवा की, एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी Gmail वर संपर्क साधू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांना कधीही ब्लॉक करू शकता.

कॉपीराइट

कॉपीराइट कायद्यांचा आदर करा. पेटंट, ट्रेडमार्क, व्यापार गुपित किंवा इतर मालकी हक्कांच्या समावेशासह इतरांच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करू नका. बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित किंवा प्रेरित करण्याचीदेखील तुम्हाला अनुमती नाही. तुम्ही हा फॉर्म वापरून Google कडे कॉपीराइट उल्लंघनाची तक्रार नोंदवू शकता.

छळ

इतरांचा छळ करण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी Gmail चा वापर करू नका. कोणीही या उद्देशांसाठी Gmail चा वापर करत आहे असे आढळल्यास, त्यांचे खाते बंद केले जाऊ शकते.

बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटी

कायदेशीररीत्या काम करा. बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटीचा प्रचार करण्यासाठी, त्यांचे आयोजन करण्यासाठी किंवा त्यामध्ये सहभागी होण्यासाठी Gmail चा वापर करू नका.