मोबाइल आणि PC वर २,००,००० हून अधिक गेमशी संबंधित जागतिक दर्जाचा कॅटलॉग एक्सप्लोर करा आणि तुमच्यासाठी योग्य असलेला गेम शोधा
Google Play पॉइंट मिळवा१ जे तुम्ही गेम खरेदी करण्यासाठी वापरू शकता आणि पॉइंट सदस्य म्हणून विशेष लाभ मिळू शकता
तुमच्या आवडत्या गेमबद्दलचे आणि तुमच्या स्वत:च्या गेमिंग कामगिरीबद्दलचे अपडेट हे एकाच सोयीस्कर तुम्ही टॅबमध्ये आहेत२
सवलती आणि गेममधील आयटम यांसाठी वापरता येणारे पॉइंट व रिवॉर्ड तुम्ही ज्यामध्ये मिळवू शकता, अशा Google Play Points या Google Play च्या रिवॉर्ड प्रोग्रामसह पुढील पातळीवरील रिवॉर्ड अनलॉक करा. तुम्ही जितके अधिक Google Play पॉइंट मिळवाल, तितकी अद्वितीय रिवॉर्ड, लाभ आणि पैसे देऊनही मिळवता न येणारे अनुभव तुम्ही अनलॉक कराल. आताच सामील व्हा१.
तुम्ही टॅबच्या केंद्रस्थानी तुमची गेमर प्रोफाइल असते. मोबाइलवरील प्रोफाइल आयकनवर टॅप करून तुम्हाला कधीही तुम्ही टॅबवरून गेमर प्रोफाइल यावर सहजरीत्या ट्रांझिशन करता येते. संपूर्ण मोबाइलवर आणि PC वर एकच प्रोफाइल असल्याने, तुम्ही तुमच्या सर्व गेमच्या बाबतीतील तुमच्या आकडेवारीचा, स्ट्रीकचा, प्रगतीचा आणि झकास कामगिरीचा सहजरीत्या माग ठेवू शकता. प्रत्येक कामगिरी, प्रत्येक विजय इथे साजरा करता येईल.
Gemini Live सोबतचा Google Play Games साइडकिक हा नवीन गेमिंग सहयोगी आहे, जो तुम्हाला तुमचा गेम न सोडता तुमच्या आकडेवारीचा, झकास कामगिरीचा आणि टिपांचा सहज ॲक्सेस देतो. तुम्ही खेळत असताना Gemini Live कडून रीअल-टाइम संभाषणपर मार्गदर्शनदेखील मिळवू शकता. साइडकिक फक्त Google Play वरून डाउनलोड केलेले गेम खेळत असताना उपलब्ध आहे आणि लवकरच मोबाइलवर येत आहे.
Google च्या सुरक्षेसह आणि संरक्षणासह, संपूर्ण मोबाइलवर व PC वर आत्मविश्वासाने खेळा. तुमचा डेटा आणि डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी, आम्ही देऊ करत असलेल्या प्रत्येक गेमवर Google Play १०,००० हून अधिक सुरक्षितता तपासण्या रन करते.