गोपनीयता नोटिस

तुम्ही किंवा तुमचे अंतिम वापरकर्ते Google Workspace for Education खात्याद्वारे Read Along अ‍ॅक्सेस करत असल्यास, ही गोपनीयता नोटिस लागू होणार नाही आणि Google Workspace for Education ची गोपनीयता नोटिस अथवा Google ने ज्या इतर कराराच्या अंतर्गत Google Workspace for Education पुरवण्यास सहमती दर्शवली आहे, त्याद्वारे तुमचा Read Along चा वापर संचालित होईल.

Read Along कोणता डेटा गोळा करते आणि आम्ही तो कसा वापरतो हे समजून घेण्यात पालकांना मदत करणे हा या Read Along गोपनीयता नोटिसचा उद्देश आहे.  ही नोटिस विशेषतः Read Along शी संबंधित आमच्या गोपनीयता व्यवहारांबद्दल माहिती पुरवते आणि Google गोपनीयता धोरण याच्या सर्वात सुसंबद्ध भागांचा सारांश पुरवते.

Read Along हे साइन इन केलेली किंवा साइन आउट केलेली सेवा म्हणून ऑपरेट करू शकते. साइन इन केलेले असताना, वापरकर्ता त्याच्या Google खात्यामधून साइन इन करतो आणि त्याचा इतिहास  प्राधान्ये या गोष्टी खात्यावर सेव्ह केल्या जातात, जेणेकरून त्याला कोणत्याही डिव्हाइसवर फक्त लॉग इन करून सेवा वापरता येईल. साइन आउट केलेले असताना, साइन इन करण्यासाठी वापरकर्त्याला Google खाते वापरण्याची आवश्यकता नसते, पण त्याचा इतिहास आणि प्राधान्ये ही फक्त डिव्हाइसवर सेव्ह केली जातात.

साइन इन केलेली सेवा वेब आणि Android ॅप या दोन्हींच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, पण साइन आउट केलेली सेवा फक्त Android ॅपवरील सद्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

आम्ही गोळा करत असलेली माहिती

तुम्ही Read Along वापरता, तेव्हा Google तुमच्या लहान मुलांच्या पुस्तक वाचणे यासारख्या वापरावर आधारित माहिती गोळा करते. या माहितीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो:

Read Along हे साइन इन केलेली सेवा म्हणून वापरताना:

Read Along हे साइन आउट केलेली सेवा म्हणून वापरताना:

Read Along च्या साइन इन केलेल्या आणि साइन आउट केलेल्या दोन्ही सेवा व्हॉइस डेटा गोळा करतात. व्हॉइस डेटावर फक्त वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर प्रक्रिया केली जाते आणि वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी, तो Google सोबत शेअर केला जात नाही. प्रक्रिया केल्यानंतर व्हॉइस डेटा अजिबात स्टोअर केला जात नाही.

Read Along च्या साइन इन केलेल्या आणि साइन आउट केलेल्या दोन्ही सेवा वापरून वापरकर्त्यांना त्यांच्या लहान मुलांसाठी विविध प्रोफाइलदेखील सेट करता येतात व पुरवलेल्या विविध प्रकारच्या अवतारांमधून त्यांना निवड करता येते आणि त्यांच्या प्रोफाइलसाठी नाव सेट करता येते.

आम्ही गोळा करत असलेली माहिती कशी वापरतो

ॅप किंवा वेबवर Read Along वापरताना, Google हे वर वर्णन केलेली माहिती गोळा करते, जेणेकरून तुमचे लहान मूल एका सेशनपासून दुसर्या सेशनपर्यंत प्रगती करणे सुरू ठेवू शकेल. त्यामुळे तुमच्या लहान मुलाला मागील वाचन इतिहास पाहता येतो आणि तुमच्या लहान मुलाने मिळवलेल्या ॅपमधील रिवॉर्डचा माग ठेवता येतो. तुमच्या लहान मुलाच्या स्वारस्यांशी आणि वाचन पातळीशी जुळणार्या पुस्तकांची शिफारस करण्यासाठी मागील वाचन इतिहास वापरला जातो. तुमचे लहान मूल त्यांच्या वाचन कौशल्यांमध्ये सुधारणा करत असताना त्यांच्या काही महिन्यांच्या किंवा वर्षांच्या प्रवासात मदत व्हावी, यासाठी ही माहिती आवश्यक आहे.

Read Along च्या साइन इन केलेल्या किंवा साइन आउट केलेल्या आवृत्त्या वापरताना, खाली वर्णन केल्याप्रमाणे शिक्षक अथवा ॅडमिनसोबत शेअर करण्याचा अपवाद वगळता, Google तुमच्या लहान मुलांना तृतीय पक्षांसोबत वैयक्तिक माहिती शेअर करण्याची किंवा ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देण्याची अनुमती देत नाही.

गोळा केलेली माहिती Google हे अंतर्गत ऑपरेशनच्या उद्देशांनीदेखील वापरते, जसे की स्पॅम आणि गैरवापर प्रतिबंधित करणे, आशय परवाना निर्बंधांची अंमलबजावणी करणे, प्राधान्य दिलेली भाषा निर्धारित करणे, ॅप्लिकेशनच्या साइन-इन केलेल्या किंवा साइन-आउट केलेल्या आवृत्त्यांच्या वापराचे विश्लेषण करणे  सेवा पुरवणे, तिची देखभाल करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे.

Read Along ची साइन-इन केलेली आवृत्ती वापरताना, Google हे शिक्षक आणि ॅडमिनना गट तयार करण्याची यंत्रणादेखील देऊ करते, जेणेकरून एकाहून अधिक लहान मुलांना ती कोणती पुस्तके वाचत आहेत, त्यांची प्रगती कशी आहे  ते एकूण किती वेळ वाचन करत आहेत याबाबतची माहिती, त्याचप्रमाणे त्यांचे ॅपमधील नाव त्यांच्या शिक्षकांसोबत शेअर करता येईल. यामुळे शिक्षक तुमच्या लहान मुलाला आणि गटामधील इतर लहान मुलांना नियमितपणे वाचन करण्याचा सराव करण्याकरिता मार्गदर्शन करू शकतात.

Read Along ची साइन-आउट केलेली आवृत्ती वापरताना, Read Along ने गोळा केलेल्या, तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेल्या कोणत्याही डेटाचे तुम्हाला पुनरावलोकन करायचे असल्यास आणि/किंवा तो हटवायचा असल्यास, तुम्ही Read Along ॅप हटवून अथवा तुमच्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे ॅप्लिकेशन डेटा हटवण्याशी संबंधित वैशिष्ट्य वापरून तसे करू शकता.

Read Along ची साइन-इन केलेली आवृत्ती वापरताना, तुम्हाला Read Along ने गोळा केलेला, तुमच्या खाते आयडेंटिफायरच्या आधारे सर्व्हरवर स्टोअर केलेला कोणताही डेटा हटवायचा असल्यास, ॅपच्या डावीकडील नेव्हिगेशन मेनूमधील “इतिहास हटवाबटणावर क्लिक करून तुम्ही तसे करू शकता. तुमचे संपूर्ण Google खाते हटवल्यानेदेखील, साइन इन केलेल्या आवृत्तीमधून हा डेटा हटवला जाईल.

आम्ही शेअर करत असलेली माहिती

Google हे पुढीलपैकी एखादी परिस्थिती लागू नसल्यास, Google च्या बाहेर वैयक्तिक माहिती उघड करणार नाही:

संमतीने

आम्हाला पालकांची संमती असेल, तेव्हा Google हे वैयक्तिक माहिती Google च्या बाहेरील कंपन्या, संस्था किंवा व्यक्ती (जसे की शिक्षक अथवा ॅडमिन) यांच्यासोबत शेअर करेल.

कायदेशीर कारणांसाठी

माहितीचा ॅक्सेस, वापर, जतन किंवा डिस्क्लोजर पुढील गोष्टींसाठी वाजवीरीत्या आवश्यक आहे यावर आमचा सद्भावनापूर्वक विश्वास असल्यास, Google हे वैयक्तिक माहिती Google च्या बाहेरील कंपन्या, संस्था अथवा व्यक्तींसोबत शेअर करेल:

बाह्य प्रक्रियेसाठी

आमच्या सूचनांच्या आधारे आणि आमचे गोपनीयता धोरण याच्या  इतर कोणत्याही योग् गोपनीयता आणि सुरक्षा उपाययोजनांचे पालन करून, वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी Google ती आमच्या संलग्न कंपन्यांना किंवा इतर विश्वासार्ह व्यवसायांना अथवा व्यक्तींना पुरवू शकते.

उदाहरणार्थ, ॅपच्या वापराबद्दलचे ट्रेंड दाखवण्यासाठी किंवा भागीदारांसोबतच्या आमच्या अहवालविषयक कर्तव्यांची पूर्तता करण्यासाठी, Google हे ॅपच्या वापराबद्दलचा ॅग्रिगेट केलेला डेटा तृतीय पक्षांसोबत शेअर करू शकते.

परस्परविरोधी अटींचा अन्वयार्थ

जिथे गोपनीयता नोटिस आणि Google गोपनीयता धोरण यांमध्ये फरक करणार्या संज्ञा असतात, तिथे ही गोपनीयता नोटिस Google गोपनीयता धोरण नियंत्रित करते.

सेवा पुरवठादार

Read Along सेवा यांच्याद्वारे पुरवली जाते:

Google LLC

१६०० अँफिथिएटर पार्कवे, माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया ९४०४३ यूएसए

फोन: + ६५०-२५३-००००

ईईए आणि स्वित्झर्लंडमध्ये:

Google Ireland Limited

गॉर्डन हाउस, बॅरो स्ट्रीट, डब्लिन 

आयर्लंडचे प्रजासत्ताक

आमच्याशी संपर्क साधा

कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास पालक आमच्याशी येथे थेट संपर्क साधू शकतात: readalong@google.com