Google Drive अतिरिक्त सेवा अटी

लागू होण्याची तारीख: ३१ मार्च २०२० (मागील आवृत्ती पहा)

Google Drive वापरण्यासाठी, तुम्ही (१) Google सेवा अटी आणि (२) या Google Drive अतिरिक्त सेवा अटी (“Google Drive अतिरिक्त अटी”) स्वीकारणे आवश्यक आहे.

कृपया यांपैकी प्रत्येक दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा. एकत्रितपणे, हे दस्तऐवज “अटी” म्हणून ओळखले जातात. ते आमच्या सेवा वापरताना तुम्ही आमच्याकडून कशाची अपेक्षा करू शकता आणि आम्ही तुमच्याकडून कशाची अपेक्षा करतो हे निश्चित करतात.

या अटींचा भाग नसले तरीदेखील, तुम्हाला तुमची माहिती कशी अपडेट, व्यवस्थापित, एक्सपोर्ट करता आणि हटवता येईल हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आमचे गोपनीयता धोरण वाचण्याकरिता आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो.

१. तुमचा आशय

Google Drive तुम्हाला आशय अपलोड, सबमिट, स्टोअर करू, पाठवू आणि मिळवू देते. Google सेवा अटी यांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, तुमचा आशय तुमचाच राहतो. तुम्ही तुमच्या Drive खात्यामध्ये अपलोड, शेअर किंवा स्टोअर करत असलेल्या कोणत्याही मजकूर, डेटा, माहिती आणि फाइलसह, आम्ही तुमच्या कोणत्याही आशयावर मालकीचा दावा करत नाही. Google Drive सेवा ऑपरेट करण्यासाठी आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी Google सेवा अटी Google ला मर्यादित उद्देशांचा परवाना देतात — त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत दस्तऐवज शेअर करण्याचे ठरवल्यास किंवा तुम्हाला तो वेगळ्या डिव्हाइसवर उघडायचा असल्यास, आम्ही ती कार्यक्षमता पुरवू शकतो.

Google Drive तुम्हाला इतर Google Drive वापरकर्त्यांच्या आशयावरदेखील सहयोग करू देते. आशयाचा “मालक” म्हणजे आशय आणि त्याचा वापर नियंत्रित करणारी व्यक्ती.

तुमच्या Google Drive मधील आशयासोबत इतर लोक काय करू शकतात ते Google Drive मधील शेअरिंग सेटिंग्ज तुम्हाला नियंत्रित करू देतात. तुमच्या फाइलची गोपनीयता सेटिंग्ज त्या ज्या फोल्डर किंवा ड्राइव्हमध्ये आहेत त्यावर अवलंबून आहेत. तुमच्या वैयक्तिक ड्राइव्हमधील फाइल, तुम्ही त्या शेअर करण्याचे ठरवेपर्यंत खाजगी असतात. तुम्ही तुमचा आशय शेअर करू शकता आणि तुमच्या आशयाचे नियंत्रण इतर वापरकर्त्यांकडे ट्रान्स्फर करू शकता. तुम्ही तयार करत असलेल्या किंवा इतरांनी शेअर केलेल्या फोल्डर अथवा ड्राइव्हमध्ये ठेवत असलेल्या फाइल शेअरिंग सेटिंग्ज मिळवतील आणि त्या ज्यामध्ये आहेत त्या फोल्डर किंवा ड्राइव्हची मालकी सेटिंग्ज मिळवू शकतील. आमच्या गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केलेले वगळता आम्ही तुमच्या फाइल आणि डेटा इतरांसोबत शेअर करणार नाही.

तुमचा आशय आम्ही मार्केटिंग किंवा प्रचारात्मक मोहिमांसाठी वापरणार नाही.

२. प्रोग्राम धोरणे

आशय बेकायदेशीर आहे का किंवा तो आमच्या प्रोग्राम धोरणे यांचे उल्लंघन करतो का हे निर्धारित करण्यासाठी आम्ही त्याचे परीक्षण करू शकतो आणि आशय आमच्या धोरणाचे किंवा कायद्याचे उल्लंघन करतो असे आम्हाला वाजवीपणे वाटल्यास आम्ही तो काढू किंवा दाखवण्यास नकार देऊ शकतो. परंतु त्याचा अपरिहार्यपणे असा अर्थ होत नाही की, आम्ही आशयाचे परीक्षण करतो, त्यामुळे आम्ही तसे करतो असे कृपया गृहित धरू नका.