Google ड्राइव्ह सेवा अटी

१० डिसेंबर २०१८ रोजी अखेरचे सुधारित लागू होण्याची तारीख: २२ जानेवारी २०१९

1. परिचय

Google ड्राइव्ह वापरल्याबद्दल धन्यवाद. Google ड्राइव्ह ही Google LLC (“Google”, “आम्ही” किंवा “आम्हाला”) ने प्रदान केलेली सेवा आहे, जी 1600 Amphitheatre Parkway, Mountain View California 94043, USA येथे स्थित आहे. तुम्ही युरोपियन इकोनॉमिक एरिया किंवा स्वित्झर्लंडमध्ये राहात असल्यास, Google ड्राइव्ह, Google Ireland Limited (“Google”, “आम्ही” किंवा “आम्हाला”) ने पुरवली आहे, जी आयर्लंडच्या (नोंदणी क्रमांक:३६८०४७) कायद्यांतर्गत आणि कार्यरत असलेली कंपनी आहे आणि Gordon House, Barrow Street, Dublin 4, Ireland येथे स्थित आहे. या Google ड्राइव्ह सेवा अटी (ज्याला आम्ही “अटी” म्हणून संदर्भित करतो) तुमच्या Google ड्राइव्ह आणि Google ड्राइव्ह वरील तुमच्या आशयाचा वापर आणि अॅक्सेस कव्हर करते. आमची गोपनीयता धोरणे आम्ही तुमची माहिती कशी गोळा करतो याचे वर्णन करते आणि आमची प्रोग्राम धोरणे आमच्या सेवा वापरत असताना तुमच्या जबाबदार्‍या स्पष्ट करते.

तुमच्या Google ड्राइव्हच्या वापरासाठी तुम्ही अटींशी सहमत होणे आवश्यक आहे. कृपया त्या काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला अटी समजत नसल्यास किंवा तुम्ही त्यांचा कोणताही भाग स्वीकारत नसल्यास, तुम्ही Google ड्राइव्ह वापरू नये.

2. आपला Google ड्राइव्हचा वापर

वय निर्बंध. Google ड्राइव्ह वापरण्‍यासाठी तुमचे वय 13 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तुमचे वय 13 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास परंतु 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास, Google ड्राइव्ह वापरण्‍यासाठी आणि अटी स्वीकारण्‍यासाठी तुम्हाला तुमच्या पालकाची किंवा कायदेशीर पालकाची परवानगी आवश्‍यक आहे.

वैयक्तिक वापर. या अटी स्वीकारून, तुम्ही सहमत आहात की तुम्ही Google ड्राइव्हचा वापर व्यवसाय उद्देशांसाठी करणार नाही; तुम्ही ड्राइव्ह सेवेचा वापर केवळ वैयक्तिक अव्यावसायिक उद्देशांसाठी करणे आवश्यक आहे. व्यवसायांनी GSuite वापरण्याची आम्ही शिफारस करतो.

तुमचे Google खाते. Google ड्राइव्ह वापरण्यासाठी तुमच्याकडे Google खाते असावे लागेल. तुमच्या Google खात्याचे संरक्षण करण्यासाठी, तुमचा पासवर्ड गोपनीय ठेवा. तुमच्या Google खात्यावर किंवा त्यामधून होणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या Google खात्याच्या पासवर्डचा पुनर्वापर तृतीय-पक्ष अ‍ॅप्लिकेशनवर न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पासवर्डचा किंवा Google खात्याचा कोणताही अनधिकृत वापर तुमच्या लक्षात आल्यास, या सूचना फॉलो करा.

तुमचे आचरण. Google ड्राइव्हचा गैरवापर करू नका. तुम्ही Google ड्राइव्हचा वापर लागू निर्यात आणि पुनर्निर्यात नियंत्रण कायदे आणि नियमांसह, केवळ कायद्याने परवानगी दिल्यानुसारच करू शकता. तुम्ही तुमच्या आचरणाला आणि Google ड्राइव्हमध्ये संचयित केलेल्या तुमच्या आशयाला जबाबदार आहात आणि तुम्ही आमच्या प्रोग्राम धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे. आम्ही अटींच्या आणि आमच्या प्रोग्राम धोरणांच्या पालनासाठी तुमच्या आचरणाचे आणि Google ड्राइव्हमधील आशयाचे परीक्षण करू शकतो.

Google ड्राइव्ह मोबाइल डिव्हाइसवर उपलब्ध आहे. तुम्हाला विचलित करेल आणि रहदारी किंवा सुरक्षिततेच्या कायद्यांचे पालन करण्यापासून तुम्हाला प्रतिबंध करेल अशा प्रकारे Google ड्राइव्ह वापरू नका.

तुमचा आशय. Google ड्राइव्ह तुम्हाला आशय अपलोड, सबमिट, संचयित करू देते आणि पाठवू आणि मिळवू देते. त्या आशयामध्ये असलेल्या तुमच्या कोणत्याही बौद्धिक संपत्ती अधिकारांची मालकी तुम्ही राखून ठेवता. थोडक्यात, जे तुमच्या मालकीचे आहे ते तुमचेच राहते.

तुम्ही Google ड्राइव्हवर किंवा तिच्यामधून आशय अपलोड, सबमिट, संचयित करता, पाठवता किंवा मिळवता तेव्हा, तुम्ही Google ला असा आशय वापरणे, होस्ट करणे, पुनरुत्पादित करणे, सुधारणे, व्युत्पन्न कार्ये तयार करणे (जसे की भाषांतरांचा, रूपांतरांचा किंवा आम्ही करत असलेल्या इतर बदलांचा परिणाम म्हणून मिळणारी कार्ये, ज्यांमुळे तुमचा आशय आमच्या सेवांसोबत अधिक चांगल्या प्रकारे काम करेल), संप्रेषण करणे, प्रकाशित करणे, सार्वजनिकरीत्या सादर करणे, सार्वजनिकरीत्या दाखवणे आणि वितरित करणे यांचा जागतिक परवाना देता. तुम्ही या परवान्यामध्ये देत असलेले अधिकार आमच्या सेवा ऑपरेट करणे, त्यांचा प्रचार करणे आणि त्या सुधारणे आणि नवीन सेवा विकसित करणे या मर्यादित उद्देशांसाठी आहेत. तुम्ही तुमचा आशय न हटवल्यास, तुम्ही आमच्या सेवा वापरणे थांबवले तरी हा परवाना सुरू राहतो. तुम्ही Google ड्राइव्हवर सबमिट करत असलेल्या कोणत्याही आशयासाठी आम्हाला हा परवाना देण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक अधिकार आहेत याची खात्री करा.

Google ड्राइव्हमधील शेअरिंग सेटिंग्ज इतर लोक तुमच्या Google ड्राइव्ह मधील आशयासोबत काय करू शकतात ते तुम्हाला नियंत्रित करू देतात. तुम्हाला बाय डीफॉल्ट तुम्ही तयार करत असलेल्या किंवा Google ड्राइव्हवर अपलोड करत असलेल्या सर्व आशयाचे नियंत्रक म्हणून सेट केले जाते. तुम्ही तुमचा आशय शेअर करू शकता आणि तुमच्या आशयाचे नियंत्रण इतर वापरकर्त्यांना हस्तांतरित करू शकता.

तुम्हाला कस्टमाइझ केलेले शोध परिणाम आणि स्पॅम आणि मालवेअर ओळख यांसारखी वैयक्तिकरीत्या उपयुक्त उत्पादन वैशिष्ट्ये पुरवण्यासाठी, आमच्या स्वयंचलित सिस्टम तुमच्या आशयाचे विश्लेषण करतात. आशय मिळवताना, शेअर करताना, अपलोड करताना आणि तो संचयित केल्यावर हे विश्लेषण घडून येते. Google आशय कसा वापरते आणि संचयित करते याविषयी अधिक माहिती तुम्हाला आमच्या गोपनीयता धोरणामध्ये सापडू शकते. तुम्ही Google ड्राइव्हविषयी फीडबॅक किंवा सूचना सबमिट केल्यास, आम्ही तुमचा फीडबॅक किंवा सूचना तुमच्या बंधनात न राहता वापरू शकतो.

घोषणा. Google ड्राइव्हच्या तुमच्या वापरासंबंधात, आम्ही तुम्हाला सेवा घोषणा, प्रशासकीय संदेश आणि इतर माहिती पाठवू शकतो. तुम्ही त्यांपैकी काही संप्रेषणांची निवड रद्द करू शकता.

आमच्या Google ड्राइव्ह सेवा. Google ड्राइव्ह वापरल्याने तुम्हाला Google ड्राइव्हमधील कोणत्याही बौद्धिक संपत्ती अधिकारांची किंवा तुम्ही अ‍ॅक्सेस करत असलेल्या आशयाची मालकी मिळत नाही. तुम्ही जोपर्यंत Google ड्राइव्हमधील आशयाच्या मालकाकडून परवानगी मिळवत नाही किंवा तुम्हाला अन्यथा कायद्याने परवानगी नाही तोपर्यंत तुम्ही तो वापरू शकत नाही. या अटी तुम्हाला Google ड्राइव्हमध्‍ये वापरलेले कोणतेही ब्रँडिंग किंवा लोगो वापरण्‍याचा अधिकार देत नाही. Google ड्राइव्हमध्‍ये किंवा त्यासोबत दाखवलेल्या कोणत्याही कायदेशीर नोटिस काढू नका, अस्पष्ट करू नका किंवा त्यात बदल करू नका.

3. गोपनीयतेचे संरक्षण

Google चे गोपनीयता धोरण तुम्ही Google ड्राइव्ह वापरत असताना आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा कसा हाताळतो आणि तुमच्या गोपनीयतेचे कसे संरक्षण करतो ते स्पष्ट करते. Google ड्राइव्ह वापरून, तुम्ही सहमत आहात की Google असा डेटा आमच्या गोपनीयता धोरणांनुसार वापरू शकते.

4. कॉपीराइटचे संरक्षण

आम्ही कथित कॉपीराइट उल्लंघनाच्या सूचनांना प्रतिसाद देतो आणि U.S. Digital Millennium Copyright Act मध्‍ये सेट केलेल्या प्रक्रियेनुसार वारंवार उल्लंघने करणार्‍यांची खाती समाप्त करतो.

कॉपीराइट धारकांना त्यांची बौध्दिक संपत्ती ऑनलाइन व्यवस्थापित करण्‍यात मदत करण्यासाठी आम्ही माहिती पुरवतो. एखादी व्यक्ती तुमच्या कॉपीराइटचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास आणि तुम्ही आम्हाला सूचित करू इच्छित असल्यास, तुम्हाला आमच्या मदत केंद्रामध्‍ये सूचना सबमिट करण्याविषयी आणि सूचनांना प्रतिसाद देण्याविषयी Google च्या धोरणांबद्दल माहिती सापडू शकते.

5. प्रोग्राम धोरणे

तुमचा आशय बेकायदेशीर आहे का किंवा तो आमच्या प्रोग्राम धोरणांचे उल्लंघन करतो का हे निर्धारित करण्यासाठी आम्ही त्याचे परीक्षण करू शकतो आणि आशय आमच्या धोरणांचे किंवा कायद्याचे उल्लंघन करत आहे असे आम्हाला वाजवीपणे वाटल्यास आम्ही तो काढू शकतो किंवा दाखवण्यास नकार देऊ शकतो. पण याचा अर्थ अपरिहार्यपणे असा नाही की आम्ही आशयाचे परीक्षण करतो, म्हणून कृपया आम्ही ते करतो असे समजू नका.

6. आमच्या सेवांमधील सॉफ्टवेअर विषयी

क्लायंट सॉफ्टवेअर. Google ड्राइव्हमध्‍ये डाउनलोड करण्यायोग्य सॉफ्टवेअर (“सॉफ्टवेअर”) समाविष्ट असते. नवीन आवृत्ती किंवा वैशिष्ट्य उपलब्ध झाल्यावर हे सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाइसवर आपोआप अपडेट होऊ शकते. Google ने तुम्हाला Google ड्राइव्हचा भाग म्हणून दिलेले सॉफ्टवेअर वापरण्‍यासाठी Google तुम्हाला वैयक्तिक, जागतिक, रॉयल्टी-मुक्त, नियुक्त न करता येणारा आणि अनन्य नसलेला परवाना देते. या अटींनी परवानगी दिलेल्या पद्धतीनुसार हा परवाना तुम्हाला Google ने पुरवल्याप्रमाणे Google ड्राइव्ह वापरू देणे आणि तिच्या लाभांचा आनंद घेऊ देणे या एकमेव उद्देशासाठी आहे. कायद्याने त्या प्रतिबंधांना मनाई करेपर्यंत किंवा तुमच्याकडे आमची लेखी परवानगी नसेपर्यंत, तुम्ही Google ड्राइव्हचा कोणताही भाग किंवा त्यामध्‍ये असलेले सॉफ्टवेअर कॉपी, सुधारित, वितरित करू शकत नाही किंवा त्याची विक्री करू शकत नाही किंवा भाड्याने देऊ शकत नाही तसेच त्याचे रिव्हर्स इंजिनीयरिंग करू शकत नाही किंवा त्या सॉफ्टवेअरचा स्रोत कोड काढण्याचा प्रयत्न करू शकत नाही.

मुक्त स्रोत सॉफ्‍टवेअर. मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. Google ड्राइव्हमध्ये वापरलेले काही सॉफ्टवेअर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार असलेल्या मुक्त स्रोत परवान्याअंतर्गत देऊ केले जाऊ शकते. मुक्त स्रोत परवान्यामध्‍ये यांपैकी काही अटींना स्पष्टपणे अधिशून्य करणार्‍या तरतूदी असू शकतात.

7. Google ड्राइव्ह सुधारित आणि समाप्त करणे

Google ड्राइव्हमधील बदल. आम्ही Google ड्राइव्ह सातत्याने बदलत आणि सुधारत असतो. आम्ही कामगिरी किंवा सुरक्षितता सुधारणा करू शकतो, कार्ये किंवा वैशिष्ट्ये बदलू शकतो किंवा कायद्याचे पालन करण्यासाठी किंवा आमच्या सिस्टमवर बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटी किंवा त्यांचा गैरवापर प्रतिबंधित करण्यासाठी बदल करू शकतो. Google ड्राइव्हविषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही येथे सदस्यत्व घेऊ शकता. ज्यांमुळे तुमचा Google ड्राइव्हचा वापर प्रतिकूलपणे प्रभावित होईल असे आम्हाला वाजवीपणे वाटते त्या महत्त्वाच्या बदलांची सूचना आम्ही तुम्हाला देऊ. तथापि, काही वेळा आम्हाला सूचना न देता Google ड्राइव्हमध्ये बदल करण्याची गरज भासू शकेल. जेथे आम्हाला सेवेची सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांची खात्री करणे, गैरवापर प्रतिबंधित करणे किंवा कायदेशीर आवश्यकतांची पूर्तता करणे यांसाठी कृती करणे आवश्यक असते अशा प्रसंगांपर्यंत हे मर्यादित असतील.

निलंबन आणि समाप्त करणे. तुम्ही कधीही Google ड्राइव्ह वापरणे थांबवू शकता, मात्र तुम्हाला जाताना पाहून आम्हाला खेद वाटेल. तुम्ही वास्तविकपणे किंवा वारंवार आमच्या अटींचे किंवा आमच्या प्रोग्राम धोरणांचे उल्लंघन केल्यास आम्ही तुमचा Google ड्राइव्हचा अ‍ॅक्सेस निलंबित किंवा कायमचा बंद करू शकतो. तुमचा Google ड्राइव्हचा अ‍ॅक्सेस निलंबित किंवा बंद करण्याची आम्ही तुम्हाला पूर्वसूचना देऊ. तथापि, आम्हाला कायदेशीर दायित्वास कारणीभूत होईल किंवा इतर वापरकर्त्यांना Google ड्राइव्ह अ‍ॅक्सेस करण्यात आणि वापरण्यात बाधा येईल अशा प्रकारे तुम्ही Google ड्राइव्ह वापरत असल्यास, आम्ही कोणत्याही सूचनेशिवाय तुमचा Google ड्राइव्हचा अ‍ॅक्सेस निलंबित किंवा बंद करू शकतो.

Google ड्राइव्ह बंद करणे. आम्ही Google ड्राइव्ह बंद करण्‍याचा निर्णय घेतल्यास, आम्ही तुम्हाला किमान 60 दिवसांची पूर्वसूचना देऊ. या सूचना कालावधीदरम्यान, तुम्हाला तुमच्या फायली Google ड्राइव्हबाहेर काढण्‍याची संधी असेल. हा 60 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही तुमच्या फायली अ‍ॅक्सेस करू शकणार नाही. तुमच्या फायली तुमच्या मालकीच्या आहेत आणि अशा फायलींचा तुमचा अ‍ॅक्सेस जतन करणे महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटते. तुमच्या फायली कशा डाउनलोड कराव्यात यावरील सूचनांसाठी, कृपया आमच्या साहाय्य पेज ला भेट द्या.

8. अतिरिक्त संचय खरेदी करणे आणि पेमेंट करणे

मोफत स्टोरेज. Google तुम्हाला 15 GB मोफत Google ऑनलाइन स्टोरेज वापरण्याची अनुमती देते (तुमच्या अटींच्या पालनाच्या अधीन), जे Google ड्राइव्ह, Gmail आणि Google फोटो यांसोबत वापरता येते.

अतिरिक्त स्टोरेजची खरेदी. तुम्ही अतिरिक्त स्टोरेज (“सशुल्क स्टोरेज प्लॅन”) तुम्हाला गरज असेल त्याप्रमाणे खरेदी करू शकता. तुम्ही सशुल्क स्टोरेज प्लॅनवर रूपांतरित केल्याच्या तारखेपासून आणि रद्द करेपर्यंत प्रत्येक नियमित कालावधीच्या सेवा सत्र रीन्यूअलच्या वेळी आम्ही तुम्हाला आपोआप बिलिंग करू. सशुल्क स्टोरेज प्लॅन खरेदी करण्यासाठी, तुम्ही Google पेमेंट सेवा अटींमध्ये निर्दिष्‍ट केलेल्या पेमेंट अटींशी सहमत होणे आवश्यक आहे. तुमच्याकडे Google पेमेंट खाते नसल्यास, तुम्हाला ते या लिंकवर जाऊन सेट करता येईल, जेथे तुम्हाला Google पेमेंटविषयी आणखी माहितीदेखील सापडू शकेल. जेव्हा तुम्हाला Google पेमेंट खाते वापरून सशुल्क स्टोरेज प्लॅन खरेदी करायचा असेल तेव्हादेखील पेमेंट सेवा अटी आणि गोपनीयता सूचना लागू होतात. कोणतीही खरेदी करण्यापूर्वी कृपया तुम्ही त्या अटी काळजीपूर्वक वाचल्या आहेत याची खात्री करा.

रद्द करणे. तुमची सशुल्क स्टोरेज योजना या अटींअंतर्गत रद्द, डाउनग्रेड किंवा समाप्त करेपर्यंत प्रभावात राहील. तुम्ही तुमची सशुल्क स्टोरेज योजना तुमच्या Google ड्राइव्हमधून कधीही रद्द किंवा डाउनग्रेड करू शकता स्टोरेज सेटिंग्ज. सध्याच्या सेवा सत्राची मुदत संपल्यानंतर तुमचे रद्द किंवा डाउनग्रेड करणे पुढील बिलिंग कालावधीला लागू होईल. तुम्ही तुमच्या सशुल्क स्टोरेज योजनेसाठी वेळेवर पैसे न भरल्यास, आम्ही तुमचे खाते डाउनग्रेड करण्याचा आणि तुमचे स्टोरेज मोफत जागा पातळीपर्यंत कमी करण्याचा अधिकार राखून ठेवतो. आम्ही तुमच्या सशुल्क स्टोरेज योजनेसाठी रद्द करणे आणि परतावा प्रक्रिया आमच्या खरेदी, रद्द करणे आणि परतावा धोरण मध्ये स्पष्ट करतो.

प्लॅन आणि किंमत बदल. आम्ही प्रभावात असलेला स्टोरेज प्लॅन आणि किंमत बदलू शकतो परंतु तुम्हाला या बदलांची पूर्वसूचना देऊ. हे बदल तुमच्या सध्याच्या सेवा सत्राची मुदत संपल्यावर, सूचनेनंतर तुमच्याकडून पुढील पेमेंट देय असताना, लागू होतील. तुम्हाला पैसे आकारण्याआधी आम्ही तुम्हाला किंमतीत वाढ केल्याची किंवा स्टोरेज प्लॅन कमी केल्याची किमान 30 दिवसांची पूर्वसूचना देऊ. तुम्हाला 30 दिवसांपेक्षा कमी काळात पूर्वसूचना दिली गेल्यास, पुढील पेमेंटच्या नंतरचे पेमेंट देय असल्याशिवाय बदल लागू होणार नाही. तुम्हाला अपडेट केलेल्या स्टोरेज प्लॅन किंवा किंमतीसोबत पुढे सुरू ठेवायचे नसल्यास, तुम्ही तुमचा सशुल्क स्टोरेज प्लॅन तुमच्या Google ड्राइव्हमधून कधीही रद्द किंवा डाउनग्रेड करू शकता स्टोरेज सेटिंग्ज. तुमचे रद्द किंवा डाउनग्रेड करणे सध्याच्या सेवा सत्रानंतर पुढील बिलिंग कालावधीला लागू होईल; आम्ही तुमच्या फायली तुम्हाला उपलब्ध करून देणे सुरू ठेवू किंवा तुम्हाला तुमच्या फायली Google ड्राइव्हच्या बाहेर नेण्याची संधी देऊ.

9. आमच्या हमी आणि अस्वीकरणे

आम्ही वाजवी पातळीवर कौशल्ये वापरून आणि काळजी घेऊन Google ड्राइव्ह पुरवतो आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही Google ड्राइव्ह वापरण्याचा आनंद घ्याल. परंतु Google ड्राइव्हविषयी काही गोष्टींचे आम्ही आश्वासन देत नाही. स्पष्टपणे नमूद केलेल्याव्यतिरिक्त, Google ड्राइव्हमधून उपलब्ध असलेली विशिष्‍ट कार्यक्षमता, तिची विश्वासार्हता, उपलब्धता किंवा तुमच्या गरजांची पूर्तता करण्याची क्षमता यांविषयी आम्ही कोणतीही वचने देत नाही.

10. Google ड्राइव्हसाठी दायित्व

Google आणि तिचे पुरवठादार आणि वितरक यासाठी जबाबदार किंवा पात्र नाहीत:

(a) असे नुकसान जे आमच्या या अटींचा करारंभंग झाल्यामुळे झालेले नाही;

(b) ज्यावेळी आपल्यासह संबंधित करार तयार केला होता त्यावेळी न झालले कोणतेही नुकसान किंवा हानी, Google अटींचा करारभंगाचा वाजवी पूर्वानुमान लावण्यायोग्य परिणाम; किंवा

(c) गमावलेले लाभ, महसूल, संधी किंवा डेटासह आपल्या कोणत्याही व्यवसायांशी संबंधित नुकसान.

या अटींअंतर्गत कोणत्याही दाव्यांसाठी Google, तिचे पुरवठादार आणि वितरक यांचे एकूण दायित्व, कोणत्याही अभिप्रेत हमींसह, सेवा वापरण्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेल्या रकमेपुरते (किंवा, दाव्याचा विषय मोफत सेवा असल्यास, तुम्हाला पुन्हा सेवा पुरवण्यापर्यंत) मर्यादित आहे.

मृत्यू किंवा वैयक्तिक इजा, फसवणूक, फसवी चुकीची माहिती किंवा कायद्याने वगळता येऊ न शकणारे कोणतेही दायित्व यांसाठी Google आणि तिचे पुरवठादार आणि वितरक यांचे दायित्व वगळण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी या अटींमधील काहीही उद्देशित नाही.

11. अटींचे नियमन करणारे कायदे.

जर तुम्ही युरोपियन इकोनॉमिक एरिया किंवा स्वित्झर्लंडच्या, बाहेर राहता तर कॅलिफोर्नियाच्या कायद्यांच्या विरोधातील नियमांच्या विरोधात कॅलिफोर्नियाच्या कायद्यांचे हे नियम या अटी किंवा Google ड्राइव्हशी संबंधित उद्भवणाऱ्या किंवा कोणत्याही संबंधित वादांवर लागू होतील. या अटींमधून उद्भवणाऱ्या किंवा त्यांच्याशी संबंधित सर्व दाव्यांचे खटले अनन्यपणे सांता क्लारा काउंटी, कॅलिफोर्निया, यूएसएच्या फेडरल किंवा राज्य न्यायालयांमध्ये चालवले जातील आणि तुम्ही आणि Google त्या न्यायालयांमधील वैयक्तिक अधिकार क्षेत्रांना संमती देता.

जर तुम्ही युरोपियन इकोनॉमिक एरिया किंवा स्वित्झर्लंडमध्ये, रहात असल्यास या अटी किंवा Google ड्राइव्हशी संबंधित किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही विवादासाठी तुमच्या निवासस्थानाचे कायदे आणि न्यायालये लागू होतील आणि तुम्ही तुमच्या स्थानिक न्यायालयांमध्ये कायदेशीर कारवाई करू शकता. विवाद ऑनलाइन रेझोल्यूशनसाठी युरोपियन कमिशन ऑनलाइन विवाद रेजोल्यूशन प्लॅटफॉर्मवर सादर केला जाऊ शकतो.

12. या अटींविषयी

आम्ही या अटी किंवा Google ड्राइव्हला लागू होणार्‍या कोणत्याही अतिरिक्त अटींमध्ये सुधारणा करू शकतो, उदाहरणार्थ: Google ड्राइव्ह किंवा कायदा, पद्धती किंवा राजकीय किंवा आर्थिक धोरण यांमधील बदल प्रतिबिंबित करण्यासाठी; किंवा नियामकांनी किंवा संबंधित औद्योगिक संस्थांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना प्रतिसाद म्हणून; किंवा Google ला तिच्या कर्तव्यांची पूर्तता करू देण्यासाठी. तुम्ही नियमितपणे अटी पहाव्यात. आम्ही या अटींमधील सुधारणांच्या सूचना या पेजवर पोस्ट करू.आम्ही सुधारित अतिरिक्त अटींच्या (“अतिरिक्त अटी”) सूचना Google ड्राइव्हमध्ये पोस्ट करू आणि तुम्हाला अटींमधील वास्तविक बदलांच्या सूचना पुरवू. बदल पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार नाहीत आणि ते पोस्ट केल्यावर किंवा तुम्हाला सूचित केल्यानंतर 14 दिवसांनी प्रभावात येतील. तथापि, नवीन कार्ये किंवा वैशिष्ट्यांमध्ये केले जाणारे बदल (“नवीन सेवा”) किंवा कायदेशीर कारणांसाठी केलेले बदल तात्काळ प्रभावात येतील. तुम्ही नवीन सेवेसाठीच्या सुधारित अटींशी सहमत नसल्यास, तुम्ही तुमचा नवीन सेवेचा वापर थांबवावा (अधिक माहितीसाठी, वर “समाप्त करणे” पहा).

या अटी आणि अतिरिक्त अटींमध्ये संघर्ष असल्यास, अतिरिक्त अटी त्या संघर्षासाठी नियंत्रण करतील.

या अटी Google आणि तुम्ही यांच्यामधील संबंध नियंत्रित करतात. ते कोणतेही तृतीय पक्ष हिताधिकारी अधिकार तयार करत नाहीत.

तुम्ही या अटींचे पालन करत नसल्यास आणि आम्ही तात्काळ कारवाई करत नसल्यास, याचा अर्थ आमच्याकडे असू शकणारे कोणतेही अधिकार (जसे की भविष्‍यात कारवाई करणे) आम्ही सोडून देत आहोत असा होत नाही.

एखादी विशिष्‍ट अट अंमलबजावणी करण्यायोग्य नसल्याचे लक्षात आल्यास, यामुळे इतर कोणत्याही अटी प्रभावित होणार नाहीत.

Google शी संपर्क कसा साधावा याविषयी अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या संपर्क पेज ला भेट द्या.