मार्ग दृश्य वापरून झांझिबार येथील स्थानिक समुदायांना सक्षम करणे

अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी पर्यटनावर अवलंबून असलेल्या कोणत्याही पर्यटन स्थळाकरिता, आंतरराष्ट्रीय जागरूकता वाढवणे हे प्राधान्य आहे आणि झांझिबारही त्याला अपवाद नाही. त्यामुळे झांझिबारसाठी आर्थिक प्रभाव निर्माण करण्याचा विचार केला गेला, तेव्हा झांझिबार नियोजन आयोग यांनी त्यांच्या द्वीपसमूहाचे सौंदर्य दाखवण्याचा निर्धार केला – आणि मदतीसाठी मार्ग दृश्य होते. वर्ल्ड ट्रॅव्हल इन 360 (WT360) मधील व्यावसायिक फोटोग्राफर फेडेरिको डिबेटो, निकोलाय ऑमेलचेन्को आणि क्रिस डु प्लेसी यांनी एकत्र येऊन झांझिबार प्रोजेक्ट सुरू केला व स्थानिक समुदायांनी स्वतःहून प्रोजेक्ट पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रेरित केले.

Google मार्ग दृश्य हे झांझिबारच्या स्थानिक समुदायांना सक्षम करत आहे

Watch the film

Link to Youtube Video (visible only when JS is disabled)

१,७०० किमी

घेतलेले फोटो

९ लाख ८० हजार

प्रकाशित केलेल्या इमेज

३.३ कोटी

व्ह्यू

१०५ हॉटेल

१०५ हॉटेलची सूची

एकत्रितपणे विकास करत आहे

मोठ्या प्रमाणावर मॅपिंग करणे हे एक आव्हान आहे. म्हणूनच, उंगुजा हे सुंदर बेट मॅप करण्यात मदत करण्यासाठी WT360 टीमने झांझिबार स्टेट युनिव्हर्सिटी मधील बारा विद्यार्थी स्वयंसेवकांसह एकत्र काम केले. फेडेरिको, निकोलाय आणि क्रिस या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १,७०० किलोमीटर फुटेज कॅप्चर केले.

आमच्या GDP मध्ये पर्यटनाचा वाटा ३०% पेक्षा जास्त आहे. परिणामी, आम्ही आमच्या तरुण पिढीला आणि जे आधीच पर्यटन उद्योगात काम करत आहेत त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो. असा एक काळ होता, जेव्हा पर्यटन म्हणजे हॉटेल उद्योग अशी समजूत होती. पर्यटन हे त्याहून अधिक आहे. त्यामध्ये इतिहास आहे, एअरलाइन आहेत आणि मार्केटिंग हा पैलूही आहे. अधिक झांझिबारी उद्योगात गुंतल्यामुळे सरकारला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल.

-

सिमाई मोहम्मद सैद, झांझिबारचे पर्यटन आणि वारसा मंत्री.

झांझिबार विकसित होत असताना, पायाभूत सुविधांच्या विकासाला मदत करण्यासाठी आणि देशामध्ये नवीन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फेडेरिकोची टीम स्थानिक रस्त्यांच्या 360 इमेज नियमितपणे रिफ्रेश करते.

झांझिबारमधील फेबेरिको डेबेटो येथील Google मार्ग दृश्य मधील रस्त्याचा फोटो

360 इमेजरी वापरून व्यवसाय जागतिक पातळीवर घेऊन जाणे

या वर्षाच्या सुरुवातीला, फेडेरिको यांनी पेंबा येथील उत्तरेकडील बेट एक्सप्लोर करण्यास सुरुवात केली. फक्त सहा दिवसांमध्ये, फेडेरिको आणि इब्राहिम खालिद, जे माजी विद्यार्थी स्वयंसेवक आहेत, त्यांनी ५०० किलोमीटरहून अधिक इमेज व ४० हवाई पॅनोरमा कॅप्चर केले, जे त्यांनी मार्ग दृश्य स्टुडिओ वापरून Google Maps वर अपलोड केले.

पर्यटन आकर्षणे, वारसा स्थळे, हॉटेल आणि व्यवसाय यांच्या अचूक फुटेजसह, ते नॅशनल ग्लोबल टूर ऑफ झांझिबार तयार करू शकले, हा असा इमेजरी प्लॅटफॉर्म आहे जो वेगाने वाढत आहे व जगभरातील बेटांचा प्रचार करत आहे.

मॅप करण्यापासून नोकरीच्या संधी तयार करेपर्यंत

फेडेरिको हे शमीमू यासिन यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्या विद्यार्थिनी होत्या आणि त्यांना ड्रोन पायलट बनण्याची इच्छा होती. झांझिबारचे भविष्य सुधारण्याच्या वचनबद्धतेने प्रेरित, शमीमू यांनी मार्ग दृश्य तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्यासाठी WT360 टीमशी संपर्क साधला. सर्वोत्कृष्ट व्हिडिओ कॅमेरा वापरणे, इमेज कशा कॅप्चर कराव्या आणि त्या Google Maps वर कशा अपलोड कराव्या हे त्यांना शिकवण्यात आले. शमीमू यांनी लवकरच या कौशल्यांवर प्रभुत्व मिळवले आणि उदरनिर्वाहासाठी झांझिबारची बेटे एक्सप्लोर व मॅप करणाऱ्या व्यावसायिक फोटोग्राफर बनल्या.

फेडेरिको, शमीमू आणि इब्राहिम सध्या नवीनतम विकसित भाग, नवीन व्यवसाय व नूतनीकरण केलेली हॉटेल यांवर लक्ष केंद्रित करून झांझिबारच्या नवीन हवाई इमेज अपलोड करण्याचे काम करत आहेत. आणि झांझिबारचे अ‍ॅम्युझमेंट पार्क उघडल्यापासून, त्यांचे ध्येय पुढे जात आहे.

झांझिबार येथील मोठ्या प्रमाणावरील मॅपिंग: मार्ग दृश्य स्टुडिओ वापरून आणखी स्मार्ट आणि जलद डेटा प्रकाशित करणे

२०१९ पासून इमेज आणि कॅमेरा गुणवत्ता यांमध्ये सुधारणा झाली आहे व मार्ग दृश्य स्टुडिओ लाँच झाल्यामुळे इमेजरी प्रकाशित करणे आणखी सोपे आणि जलद झाले आहे. फोटोग्राफर एकाच वेळी अनेक 360 व्हिडिओ अपलोड करू शकतात, प्रगतीचे निरीक्षण करू शकतात, अपलोड केलेल्या गोष्टी या ठिकाण किंवा फाइलच्या मूळ नावानुसार शोधू शकतात आणि परस्परसंवादी नकाशाचे स्तर वापरून भविष्यामध्ये माहिती गोळा करण्याशी संबंधित योजना करू शकतात.

 

आम्ही मार्ग दृश्य स्टुडिओ वापरून संपूर्ण पेंबा बेट प्रकाशित केले. टूलच्या प्रमुख सुधारणा संस्थेवर आधारित आहेत, जसे की थांबवलेले किंवा व्यत्यय आणलेले अपलोड पुन्हा सुरू करणे आणि अनेक व्हिडिओ एकत्र अपलोड करताना नवीन फाइल जोडण्यासाठी रात्री उठण्याची आवश्यकता नसणे. यामुळे आमचा बराच वेळ वाचला!

-

फेडेरिको डिबेटो, व्यावसायिक फोटोग्राफर

 

भविष्य उभे करणे

प्रोजेक्ट झांझिबार स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या देशाचे मॅपिंग करण्यासाठी सक्षम आणि शिक्षित करण्याच्या उद्देशाने सुरू झाला व तेव्हापासून याचा जागतिक प्रभाव पडला आहे. तीन वर्षांत, प्रोजेक्टमुळे स्थानिक व्यवसाय समोर आले आहेत आणि शमीमू आणि इब्राहिम यांसारख्या माजी स्वयंसेवकांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

आणखी एक्सप्लोर करा

तुमची स्वतःची मार्ग दृश्य इमेजरी शेअर करा