एका वेळी एका मार्ग दृश्य इमेजसह, Autori ने संपूर्ण फिनलँडमध्ये रस्त्यांची देखभाल करण्याबाबत क्रांती कशी घडवली.

रस्त्यांची दुर्दशा, कालबाह्य झालेले चिन्हफलक आणि दिवे नसलेले मार्ग या गोष्टी म्हणजे जगभर ड्रायव्हर आणि नगरपालिका यांना दररोज करावा लागणारा संघर्ष आहे. परंतु, पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी निराकरणे डेव्हलप करणार्‍या Autori या फिनिश कंपनीला Google Maps मार्ग दृश्य सोबत मार्ग पातळीवरील डेटा अधिक कार्यक्षमतेने गोळा करण्याचा आणि त्याचे विश्लेषण करण्याचा मार्ग सापडला आहे.

४०,००० किमी

घेतलेले फोटो

आठ दशलक्ष

प्रकाशित केलेल्या इमेज

५० दशलक्ष

व्ह्यू

रस्त्यासंबंधी डेटा

20

प्रोजेक्ट कॅप्चर करणे

फिनलँडमध्ये रस्त्यांच्या देखभालीचे व्यवस्थापन सुलभ करणे

१९८८ साली स्थापन झालेली Autori स्थिती व्यवस्थापन, कृती नियोजन आणि देखभाल समन्वय यांसाठी फिनलँडच्या रस्ते प्राधिकरणे, कंत्राटदार आणि तृतीय पक्ष सल्लागार यांसाठी सेवेच्या स्वरूपात सॉफ्टवेअर (SaaS) निराकरणे पुरवते. संपूर्ण देशभरातील रस्त्यांच्या स्थितीचे परीक्षण करण्यासाठी भरपूर वेळ आणि खूप पैसे लागतात, परंतु जेथे इतर कंपन्यांना फक्त खर्च दिसला तेथे Autori ला एका विशेष संधीचा फायदा घेता आला. त्यांच्या स्वतःच्या मार्ग दृश्य इमेज आणि SaaS निराकरण वापरून, त्यांनी फिनलँडमध्ये रोड देखभालीसंबंधी मूलभूत सुविधांच्या डेटाचे अधिक चांगले व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रिया यांकरिता टूल तयार केले आहे.

गती आणि डेटा शेअरिंगची गरज

पारंपरिकरीत्या, विशिष्ट स्थानी कोणत्या कामाची गरज आहे हे जाणून घेण्यासाठी रस्ते प्राधिकरणांना प्रत्येक रस्त्याला प्रत्यक्ष भेट द्यावी लागते. याचा अर्थ हजारो किलोमीटर ड्रायव्हिंग करणे आणि नोंदी घेण्यासाठी अगणित वेळा थांबणे. हे फक्त पर्यावरणासाठी वाईट आहे एवढेच नाही, तर ते खर्चिक आहे, त्यामध्ये अनेक स्रोत गुंतलेले असतात आणि ते खूप वेळ घेणारेदेखील आहे. म्हणून डिजिटाइझ केलेल्या आणि अधिक पर्यावरणस्नेही असलेल्या निराकरणाची गरज भासल्यामुळे Autori ने चाकोरीबाहेर जाऊन विचार केला. आणि मार्ग दृश्य हे सर्वप्रथम सुचलेले मार्ग पातळीवरील व्हिज्युअलायझेशन निराकरण होते.

 

रस्त्यांची देखभाल करणे पुढे सुरू ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत प्रचंड मोठ्या प्रमाणावरील डेटा वारंवार शेअर करण्याची गरज असते. वापरकर्त्यांमध्ये माहिती शेअर करणे आणखी सोपे करण्यासाठी मार्ग दृश्य मध्ये सर्व आवश्यक टूल आहेत - स्मार्टफोन असलेल्या सर्वांसाठी ती उपलब्ध आहेत आणि त्यासाठी कोणत्याही लॉगिन किंवा सॉफ्टवेअर इंस्टॉलेशनची आवश्यकता नाही. आणि मार्ग दृश्य यापूर्वी रस्त्यांच्या देखभालीसाठी वापरले गेले असले, तरीही डेटा अप-टू-डेट ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. आमच्या रस्त्याच्या देखभालीसंबंधी सॉफ्टवेअरशी मार्ग दृश्य इंटिग्रेट करून त्या समस्येचे निराकरण करण्याची संधी आम्हाला दिसली.

-

आरी इमोनन, Autori च्या डिजिटलायझेशन सल्ला विभागाचे प्रमुख

 

Google मार्ग दृश्य Autori फिनलंडच्या रस्त्याचे नकाशे

ऑनलाइन आणि ऑफलाइन रस्ते सुरक्षितता एकत्रित करणे

२०१७ च्या सुरुवातीला, इमेज प्रकाशित करण्यासाठी Autori ने त्यांच्या कंपनीचे Google खाते वापरून फोटोग्राफी करण्यास आणि फिनलँडमधील राष्ट्रीय मार्गांची 360 इमेजरी अपलोड करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, त्यांनी ४०,०००किमी लांबीचे राष्ट्रीय मार्ग कव्हर केले आहेत आणि ऐंशी लाख इमेज अपलोड केल्या आहेत, ज्यामुळे रस्त्यांच्या देखभालीचे व्यवस्थापन ऑनलाइन आले आहे. त्यांच्या SaaS निराकरणांसोबत मार्ग दृश्य इंटिग्रेट करून त्यांनी रस्ते प्राधिकरणांसाठी अप-टू-डेट रस्ते मालमत्ता माहिती रिमोट पद्धतीने अ‍ॅक्सेस करणे सोपे केले आहे.

Autori ने मार्ग दृश्य वर प्रकाशित केलेली इमेजरी यामुळे, रस्त्यावरील गहाळ चिन्हफलक, खुणा किंवा खड्डे यांबद्दलच्या तक्रारींची संबंधित पक्षांनी त्यांच्या ऑफिसमधून तपासणी करावी यासाठी ते अपलोड केले आणि टॅग केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, कस्टमाइझ करता येणारे निराकरण पुरवून, Autori कंत्राटदारांना संबंधित देखभालीच्या कामाचा एकाच जागी माग ठेवू देते आणि त्याचे नियोजन करू देते. देखभालीचे काम पूर्ण झाल्यावर, त्या भागाच्या नवीन 360 इमेज घेतल्या जातात आणि रस्त्याचा डेटा अप-टू-डेट ठेवण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांकडून अपलोड केल्या जातात. यामुळे तपासणीसाठी प्रत्यक्ष जागेला भेट देण्याची आवश्यकता कमी झाली आहे - ज्यामुळे वेळ आणि पैसे यांची बचत होते व हरितगृह वायूची उत्सर्जने कमी होतात.

संपूर्ण जगभरात रस्ते सुरक्षिततेमध्ये क्रांती घडवणे

मार्ग दृश्य मुळे Autori ला फिनलँडमधील रस्ते प्राधिकरणांसाठी माहिती शेअर करणे आणि प्रासंगिक जागरूकता यांमध्ये सुधारणा करता आल्या, ज्यामुळे खर्च कमी करण्यात आणि कार्यक्षमता वाढवण्यात मदत झाली. यामुळे सर्व जगावर होणारा सकारात्मक परिणाम ओळखून, भविष्यात रस्त्यांसंबंधी डेटा गोळा करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी Autori आता प्रमाणित मॉडेलवर काम करत आहे. १०००किमी लांबीच्या सायकलिंग आणि पादचारी मार्गांची फोटोग्राफी करून त्यांनी स्थानिक लोकांना त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यातदेखील मदत केली. लोक आता अप-टू-डेट डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात आणि कमी अंतरांचे प्रवास आणखी पर्यावरणस्नेही मार्गाने करू शकतात. त्याव्यतिरिक्त, फिनलँडमध्ये अतिरिक्त १५,०००किमी चा डेटा गोळा करण्यासाठी ते या उन्हाळ्यात पुन्हा रस्त्यांवर जातील, ज्यामुळे त्यांना देशातील जवळपास अर्ध्या राष्ट्रीय मार्गांची फोटोग्राफी करता येईल आणि ते मार्ग दृश्य वर प्रकाशित करता येतील.

गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यवसाय अनेक खास पद्धतींनी मार्ग दृश्य कसे वापरत आहेत त्याचे Autori चे यश हे फक्त एक उदाहरण आहे. ते फक्त फोटो-मॅपिंग टूलपेक्षा आणखी बरेच काही आहे आणि त्याचे तुमच्या व्यवसायासाठीदेखील अगणित फायदे असू शकतात. तुमची स्वतःची मार्ग दृश्य यशोगाथा लिहिण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

यामध्ये पोस्ट केले:

मॅपिंग आणि डिजिटायझेशन

आणखी एक्सप्लोर करा

तुमची स्वतःची मार्ग दृश्य इमेजरी शेअर करा