मार्ग दृश्य ने भूपरिवेष्टित देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध राज्याचे दरवाजे सर्व जगासाठी कसे खुले केले ते पहा.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या भूतानमध्ये पर्यटनाला पोषक ठरतील अशा अनेक डोंगरवाटा, हिरवीगार खोरी आणि शांत प्रवाही नद्या आहेत. त्यामुळेच भूतानच्या पर्यटन आणि सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, हा छुपा खजिना दाखवण्याकरिता शासनाने मार्ग दृश्य सह बारा महिने चालणाऱ्या उपक्रमासाठी भागीदारी केली आहे.

चित्रीकरणासाठी लागणाऱ्या मंजुरीचे अनेक अडथळे पार करून त्याबाबत मान्यता मिळवल्यानंतर, भूतानच्या पर्यटन मंडळाला, Google सिंगापूरच्या तांत्रिक सपोर्टच्या सहयोगाने मे २०२० मध्ये हा प्रोजेक्ट सुरू करता आला होता. दोन Ricoh Theta V, एक Insta360 Pro, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि ते सुरू ठेवण्यासाठी नियमित घेतलेली ट्रबलशूटिंग सेशन याद्वारे मार्ग दृश्य ने त्यांना सपोर्ट केला.

२६२५.८६ किमी

घेतलेले फोटो

२,३९८,२८५

प्रकाशित केलेल्या इमेज

७.४ मी

व्ह्यू

भूतानच्या सौंदर्याचे डिजिटल मॅपिंग

मार्ग दृश्य चा हा उपक्रम राबवण्यापूर्वी, भूतानकडे संभाव्य अतिथींशी कनेक्ट करण्यासाठी तांत्रिक तज्ञ किंवा साधने नव्हती. त्यामुळे पर्यटकांना प्रवासांचे नियोजन करणे आव्हानात्मक वाटायचे. मात्र आता बौद्ध यात्रेकरूंपासून ते संभाव्य अतिथींपर्यंत कोणतीही व्यक्ती थिंफू आणि पुनाखाच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावांमधील गढी मठ व्हर्च्युअली शोधून काढू शकते.

जगापर्यंत पोहोचणे हा शासनाच्या योजनेतील एक मैलाचा दगड असला, तरीही ICT सक्षम समाजाच्या दिशेने उचललेले भूतानच्या डिजिटल प्रवासामधील हे एक महत्त्वाचे पाऊलदेखील आहे.

भूतानमधील प्रवासासाठी सर्वाधिक वापरलेले रस्ते

मार्ग दृश्य च्या स्मार्ट नेव्हिगेशनने पर्यटकांसाठी जगभरातील लोकप्रिय ठिकाणे खुली केली आहेत आणि पर्यटकांना निवडीचे तसेच फिरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. रीअल टाइम 360 फुटेज आणि वास्तविक स्थितीचा आभासी फेरफटका यांचा ॲक्सेस दिल्याने अतिथींना त्यांच्या सोयीनुसार प्रवास करण्यात आणि त्यानुसार प्रदेश एक्सप्लोर करण्यात मदत झाली आहे.

 

भूतानच्या Google मार्ग दृश्य आवृत्तीने देशाला, तसेच जगभरातील लोकांना मदत केली आहे. भूमापन अधिकारी, व्यवसाय, शासकीय एजन्सी, शैक्षणिक संस्था आणि इतर अनेक लोकांद्वारे त्यांच्या सेवा सुधारित करण्यासाठी हे वापरले जाऊ शकते.

-

दोर्जी द्रादुल, महासंचालक, भूतान पर्यटन मंडळ

 

मार्ग दृश्य मध्ये नवीन जोडलेले ५०० व्यवसाय आणि भूतानच्या नकाशामध्ये केलेल्या ४,००० अपडेटसह रहिवाशांना रीअल टाइम रहदारीचे अपडेट आणि मार्गासंबंधी सूचना यांपासून ते स्थानिक व्यवसायांसाठी आणखी एक्स्पोजर यापर्यंत सर्व फायदेदेखील मिळाले आहेत.

Google मार्ग दृश्य चे मॅपर भूतानमध्ये कारवर कॅमेरा सेट करत आहेत

आणखी चांगली मार्ग दृश्ये

भूतानला जगापर्यंत पोहोचवण्याच्या व्यतिरिक्त, शासनाचा मार्ग दृश्य उपक्रम विकास प्रकल्प नियोजनात खूपच उपयुक्त ठरला आहे. शतकानुशतके अपरिचित असलेल्या भूतानच्या भूप्रदेशाचे चित्रीकरण केल्याने, त्याच्या वारसा स्थळांच्या देखभालीसंबंधी धोरण आखण्यासाठी एकप्रकारे सुरुवात झाली आहे. मार्ग दृश्य च्या डेटानुसार, शासन रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेऊ शकते आणि गरज असेल तिथे सुधारणा करू शकते.

अधिकाधिक भ्रमंतीकार भूतान एक्सप्लोर करत आहेत. मार्ग दृश्य च्या या उपक्रमाची नुकतीच सुरुवात झाली असून यामध्ये सध्या फक्त २० शहरे समाविष्ट आहेत, ३८,३९४ km² चा प्रदेश आहे. नवीन पायाभूत सुविधांच्या विकासासोबत नकाशे नियमितपणे अपडेट करण्याची योजना आहे.

मार्ग दृश्य ने छोट्या प्रदेशांना जगाच्या नकाशावर आणून लोकांशी कनेक्ट केले आहे. देशातील हा लपलेला खजिना अत्यंत वेधक अशा इमेजरीने खुला केल्याने, तो देशाच्या गतिमार्गात क्रांती घडवून आणू शकतो आणि विकासात अविभाज्य भूमिका बजावू शकतो.

आणखी एक्सप्लोर करा

तुमची स्वतःची मार्ग दृश्य इमेजरी शेअर करा