आम्ही 360 इमेजरी कधी, कुठे आणि कशी गोळा करतो ते जाणून घ्या

Google च्या मार्ग दृश्य वाहनांचा रंगीत ताफा पहा आणि जगाचा नकाशा आणखी चांगला व्हावा, यासाठी आम्ही 360 इमेजरी कशी गोळा करतो ते जाणून घ्या.

Google मार्ग दृश्य इमेजरीचा संग्रह
Google मार्ग दृश्य इमेजरीचा संग्रह, अ‍ॅनिमेशन कार

फोटोंचे स्रोत

मार्ग दृश्य फोटो हे Google आणि आमचे कंट्रिब्युटर या दोन स्रोतांकडून मिळतात.

आमचा आशय
कंट्रिब्युटरचा आशय

आमचा आशय

Google च्या मालकीच्या आशयाचे श्रेय "मार्ग दृश्य" किंवा "Google नकाशे" यांना दिले जाते. आम्ही आमच्या इमेजरीमधील चेहरे आणि लायसन्स प्लेट आपोआप धूसर करतो.

धोरणाचे तपशील

जॉर्डनमधील पेट्राची Google मार्ग दृश्य इमेज

कंट्रिब्युटरचा आशय

ग्राहकाने योगदान म्हणून दिलेल्या आशयामध्ये त्यांचे क्लिक/टॅप करता येणारे खात्याचे नाव आणि काही वेळा प्रोफाइल फोटोचा समावेश असतो.

धोरणाचे तपशील

मार्ग दृश्य मध्ये योगदान द्या

फेडेरिको डिबेटो हे झांझिबार मॅप करत असतानाची Google मार्ग दृश्य इमेज

या महिन्यात आम्ही कुठे मॅप करत आहोत

तुमचा अनुभव समृद्ध करणारी आणि तुमच्या आसपासच्या जगाविषयी माहिती मिळवण्यात तुम्हाला मदत करणारी इमेजरी पुरवण्यासाठी आम्ही जगभरात ड्राइव्ह व ट्रेक करतो. तुम्हाला आमच्या टीमला भेटायचे असल्यास, ती तुमच्या जवळपासच्या स्थानी कधी येणार आहे ते खाली पहा.

तारीख जिल्हा
तारीख जिल्हा

आमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या काही घटकांमुळे (हवामान, बंद रस्ते, इत्यादी) आमच्या कार चालत नाहीत किंवा प्रवासयोजनेत किंचित बदल होतील अशी शक्यता आहे. सूचीमध्ये एखादे विशिष्ट शहर नमूद केले असल्यास त्या सूचीमध्ये त्या शहरापासून ड्राइव्ह करत जाता येईल इतक्या इतरावर असलेली छोटी शहरे आणि नगरे यांचा देखील समावेश असू शकतो याची नोंद घ्या.

जगभरातील आश्चर्यांचे फोटो काढण्यासाठी तयार केलेला वाहनांचा ताफा

आम्ही सर्व सात खंडांवरील अद्भुत ठिकाणांना भेट दिली आहे आणि आणखी बऱ्याच ठिकाणांना भेट द्यायची आहे. योग्य वाहनांचा ताफा निवडण्यात आणि सर्वोत्तम इमेजरी गोळा करण्यात मदत व्हावी, यासाठी आम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी भूप्रदेश, हवामान व लोकसंख्येची घनता यांच्या समावेशासह अनेक घटक विचारात घेतो.

मार्ग दृश्य कार

इमेजरी गोळा करण्यासाठी आमचे सर्वाधिक वापरले जाणारे उपकरण म्हणजे छतावरील कॅमेरा सिस्टीमने सुसज्ज असलेली मार्ग दृश्य कार. या कारने घोडा केळे खात आहे अशा इमेजरीच्या समावेशासह जगभरातील एक कोटीपेक्षा जास्त मैल अंतर कॅप्चर करण्यात आम्हाला मदत केली आहे.
मार्ग दृश्य कार

ट्रेकर

ही पोर्टेबल कॅमेरा सिस्टीम बॅकपॅक म्हणून वापरली जाऊ शकते किंवा पिकअप ट्रकच्या छतावर, स्नोमोबाइल अथवा मोटरबाइकवर माउंट केली जाऊ शकते. यामुळे आम्हाला अरुंद मार्ग किंवा जिथे फक्त पायी पोहोचता येऊ शकते अशा ठिकाणांमधील इमेजरी गोळा करता आली, जसे की माचू पिचू चे इंका सिटडल.
ट्रेकर

नकाश्यांमध्ये जिवंतपणा आणत आहे

आम्ही इमेजरी गोळा केल्यानंतर, आता ती सर्व तुमच्या स्क्रीनवर आणण्याची वेळ आली आहे. आमची टीम पडद्यामागे काय करत आहे याची ही झलक आहे.

  • इमेज गोळा करणे

    सर्वप्रथम, मार्ग दृश्य अनेक ठिकाणे दाखवता यावीत याकरिता आम्ही त्या त्या ठिकाणांच्या सभोवताली वाहन चालवून तिथले फोटो घेतो. सर्वोत्तम इमेजरी कधी आणि कुठे घेता येईल हे निश्चित करण्यासाठी आम्ही विविध भागांमधील हवामान आणि लोकसंख्येची घनता यांसारख्या अनेक बाबींवर बारीक लक्ष देतो.

  • इमेजरी अलाइन करणे

    प्रत्येक इमेजला तिच्या नकाशावरील भौगोलिक स्थानाशी जुळवण्यासाठी, आम्ही कारवरील GPS, वेग आणि दिशा मोजणार्‍या सेन्सरमधून मिळालेले सिग्नल एकत्रित करतो. यामुळे आम्हाला कारचा नेमका मार्ग ठरवण्यात तसेच आवश्यकतेप्रमाणे इमेजना तिरपे किंवा पुन्हा अलाइन करण्यात देखील मदत होते.

  • फोटोंना 360 फोटोंंमध्ये रुपांतरित करणे

    360 फोटोंमधील फटी टाळण्यासाठी, लगतचे कॅमेरे एकमेकांना किंचित आच्छादणारी छायाचित्रे घेतात. त्यानंतर आम्ही या फोटोंना शिवून 360 अंशातली एकच इमेज बनवतो. त्यानंतर "शिलाई" कमी दिसावी आणि इमेज एकसंध दिसावी यासाठी आम्ही विशेष इमेज प्रक्रिया अल्गोरिदम वापरतो.

  • तुम्हाला योग्य इमेज दाखवणे

    कारचे लेसर पृष्ठभागावरून किती जलद परावर्तित होतात यावरून आम्हाला एखादी इमारत किंवा वस्तू किती दूर आहे हे कळते आणि आम्हाला जगाचे 3D मॉडेल तयार करण्यात मदत करते. तुम्ही मार्ग दृश्य मध्ये जसे दूर जाल तसे, हे मॉडेल तुम्हाला दाखवण्यासाठी त्या स्थानाचा सर्वोत्तम पॅनोरामा ठरवते.

आम्ही येथे जाऊन आलो आहोत

नकाश्यावरील निळे भाग हे मार्ग दृश्य कुठे उपलब्ध आहे ते दाखवतात. अधिक तपशिलांसाठी झूम इन करा किंवा Google Maps वर ब्राउझ करा.

अधिक जाणून घ्या