तुमच्या आसपासचे जग शोधण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी Google समर्पित आहे. तुम्हाला जवळपासच्या किंवा जगभरातील ठिकाणांचे पूर्वावलोकन करण्यात आणि ती एक्सप्लोर करण्यात मदत करून तुमचा अनुभव वर्धित करणे हा आमच्या प्लॅटफॉर्मवरील इमेजरीचा हेतू आहे. इमेजरी उपयुक्त आणि आमचे वापरकर्ते एक्सप्लोर करत असलेल्या जगाचे प्रतिबिंब असावी याची खात्री करण्यासाठी आम्ही काटेकोर प्रयत्न करतो.

मार्ग दृश्य इमेजरीला बाह्य पक्ष किंवा Google द्वारे योगदान दिले जाऊ शकते. यामधला फरक तुम्ही प्रत्येक इमेजरीसोबत सादर करण्यात आलेले नामोल्लेख किंवा आयकनवरून ओळखू शकता. बाह्य पक्षाने कॅप्चर केलेली आणि Google Maps वर प्रकाशित केलेली इमेज त्या योगदानकर्त्याची (किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या एखाद्या उत्तराधिकाऱ्याची) मालमत्ता असते.

हे पेज Google ने योगदान दिलेले मार्ग दृश्य इमेजरी धोरण सेट करते. वापरकर्त्याने योगदान दिलेल्या मार्ग दृश्य इमेजरीसाठी, कृपया Maps वापरकर्त्याने योगदान दिलेल्या आशयाचे धोरण पहा.

Google ने योगदान दिलेले हे मार्ग दृश्य
इमेजरी धोरण

मार्ग दृश्य इमेजरी पाहणाऱ्या प्रत्येकास सकारात्मक, फायदेशीर अनुभव येईल याची खात्री करण्यासाठी आम्ही Google ने योगदान दिलेले हे मार्ग दृश्य धोरण विकसित केले आहे. ते आम्ही अयोग्य आशय कसा हाताळतो आणि Google Maps वर मार्ग दृश्य इमेजरी प्रकाशित करताना कोणते निकष वापरतो हे स्पष्ट करते. आम्ही अधूनमधून आमची धोरणे अपडेट करू शकतो, त्यामुळे कृपया ते वेळोवेळी तपासत राहा.

मार्ग दृश्य इमेजरी रीअल टाइम नाही

मार्ग दृश्य इमेजरी आमचे कॅमेरा त्या स्थानावरून त्या दिवशी जाताना जे पाहू शकले फक्त तेच दाखवते. त्यानंतर, त्यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक महिने लागतात. याचा अर्थ असा, की तुम्ही पाहत असलेला आशय कदाचित काही महिन्यांपूर्वीचा किंवा काही वर्षे जुना असू शकतो. काही स्थानांवर, जेथे आम्ही गेली अनेक वर्षे इमेजरी गोळा केलेल्या आहेत तेथे तुम्हालादेखील त्या इमेजरीमधील बदल आमच्या टाइम मशीन फंक्शनमधून पाहता येतील.

धूसर करत आहे

Google Maps वर मार्ग दृश्य इमेज प्रकाशित केल्या जातात तेव्हा व्यक्तींच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी Google अनेक पावले उचलते.

आम्ही चेहरा आणि लायसन्स प्लेट ब्लर करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे मार्ग दृश्य मध्ये Google ने योगदान दिलेल्या इमेजरीमधील ओळखता येण्याजोगे चेहरे आणि लायसन्स प्लेट ब्लर करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. तुम्हाला तुमचा चेहरा किंवा लायसन्स प्लेट आणखी ब्लर करायची असल्यास अथवा तुमचे संपूर्ण घर वा कार किंवा शरीर ब्लर करायचे असल्यास, "समस्येची तक्रार करा" हे टूल वापरून विनंती सबमिट करा.

अनुचित आशय

तुम्ही "समस्येची तक्रार करा" लिंक वापरून अयोग्य आशयाची तक्रार करू शकता. कलात्मक, शैक्षणिक किंवा माहितीपर मूल्य वगळता आम्ही पुढील वर्गवाऱ्यांना अयोग्य आशय समजतो.

बौद्धिक मालमत्ता उल्लंघने

बौद्धिक मालमत्ता उल्लंघने

कोणाच्याही कायदेशीर अधिकारांचे, तसेच कॉपीराइटचे उल्लंघन करणाऱ्या इमेज किंवा इतर कोणत्याही आशयाला आम्ही अनुमती देत नाही. अधिक माहितीसाठी किंवा DMCA विनंती दाखल करण्यासाठी, आमच्या कॉपीराइट प्रक्रियांचे पुनरावलोकन करा.

आयकन भडक लैंगिक आशय

भडक लैंगिक आशय

आम्ही लैंगिकदृष्ट्या भडक आशयाला अनुमती देत नाही.

बेकायदेशीर, धोकादायक किंवा हिंसक आशय आयकन

बेकायदेशीर, धोकादायक किंवा हिंसक आशय

मुळातच बेकायदेशीर असणाऱ्या, धोकादायक किंवा गुन्हेगारी कृत्ये प्रमोट करणाऱ्या अथवा ग्राफिक किंवा अकारण हिंसा समाविष्ट असलेल्या आशयाला आम्ही अनुमती देत नाही.

त्रास देणे आणि धोके आयकन

त्रास देणे आणि धोके

लोकांना त्रास, धमकी देण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी मार्ग दृश्य चा वापर करत असलेल्या आशयाला आम्ही अनुमती देत नाही.

द्वेषयुक्त भाषण

द्वेषयुक्त भाषण

आम्ही अशा आशयाला अनुमती देत नाही जो वंश, वांशिक मूळ, धर्म, भिन्नक्षमता, लिंग, वय, राष्ट्रीयत्व, ज्येष्ठत्व, लैंगिक प्राधान्य किंवा लिंगाधारित ओळखीच्या आधारावर व्यक्ती अथवा गटांविरुद्ध हिंसाचाराला प्रमोट करतो अथवा पाठिंबा देतो.

दहशतवादी आशय आयकन

दहशतवादी आशय

दहशतवादी संघटनांचे इतर कोणतेही हेतू, तसेच भरती यांसाठी ही सेवा वापरण्याची आम्ही अनुमती देत नाही. आम्ही दहशतवादी कृत्यांना, हिंसेला उत्तेजन देणारा किंवा दहशतवादी हल्ले प्रमोट करणारा दहशतवादाशी संबंधित आशयदेखील काढून टाकू.

लहान मूल धोक्यात सापडण्‍याच्या स्‍थितीचे आयकन

लहान मूल धोक्यात सापडण्‍याची स्‍थिती

लहान मुलांचे शोषण किंवा गैरवापर करणाऱ्या आशयाविरुद्ध Google चे शून्य सहिष्णुता धोरण आहे. यात लैंगिक गैरवर्तनाच्या सर्व इमेज आणि लैंगिक रीतीने लहान मुलांना सादर करणार्‍या सर्व आशयाचा समावेश आहे. अशा रीतीने लहान मुलांचे शोषण करत आहे असा वाटणारा कोणताही आशय तुम्हाला आढळल्यास, तुमचा उद्देश या आशयाकडे Google चे लक्ष वेधणे हा असला, तरी कृपया तो पुन्हा शेअर करू नका किंवा त्याच्यावर टिप्पणी करू नका. तुम्हाला इंटरनेटवर इतरत्र असा आशय आढळल्यास, कृपया नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅंड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन (NCMEC) यांच्याशी थेट संपर्क साधा.

वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहिती आयकन

वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहिती

तुमचे किंवा इतरांचे क्रेडिट कार्ड तपशील, वैद्यकीय माहिती किंवा सरकारद्वारे जारी ओळखपत्र यांसारख्या वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहितीचा समावेश असलेल्या आशयाला आम्ही अनुमती देत नाही.