Google वरील तुमची गोपनीयता

गोपनीयतेबद्दल आम्हाला विचारल्या जाणार्‍या काही टॉप प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे सापडू शकतात, जसे की, डेटा म्हणजे काय? तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास, गोपनीयता धोरण हेदेखील पहा.

तुमचे स्थान

विषयावर जा

Google वर शेअरिंग

विषयावर जा

डेटा आणि पर्सनलायझेशन

विषयावर जा

तुम्ही नियंत्रक आहात

विषयावर जा

तुमचे स्थान

Google ला माझे स्थान कळते का?

तुम्ही इंटरनेट वापरता तेव्हा, अ‍ॅप्स आणि साइट या तुम्ही कुठे आहात याचा साधारणतः अंदाज लावू शकतात व हे Google देखील करू शकते. तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जनुसार, Google तुमचे अचूक स्थानदेखील जाणून घेऊ शकते. (माझे स्थान किती अचूक असते? हे पहा)

तुम्ही Search, Maps किंवा Google Assistant यांसारख्या गोष्टी वापरून Google वर शोधता तेव्हा, तुम्हाला आणखी उपयुक्त परिणाम पुरवण्यासाठी तुमचे सध्याचे स्थान वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही रेस्‍टॉरंट शोधत असल्यास, सर्वात उपयुक्त परिणाम हे तुमच्या जवळपासच्या रेस्‍टॉरंटचे असू शकतात.

तुम्ही तुमचे स्थान कसे व्यवस्थापित करू शकता हे पहा

मला स्थान सुरू आणि बंद कसे करता येईल?

तुम्ही Google वर शोधता तेव्हा, तुम्ही जिथून शोधत आहात त्या सर्वसाधारण भागाचा Google नेहमीच अंदाज लावेल. तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेटशी कनेक्ट होणार्‍या कोणत्याही अ‍ॅप किंवा साइटप्रमाणे, तुमच्या डिव्हाइसच्या आयपी अ‍ॅड्रेसच्या आधारावर Google तुमच्या स्थानाचा अंदाज लावू शकते. अधिक माहितीसाठी, मी कुठे आहे ते Google ला कसे समजते? पहा.

तुम्ही Google वापरता तेव्हा तुमचे अचूक स्थान पाठवायचे का हे निवडण्यासाठी, तुम्ही स्वतंत्र अ‍ॅप्स, साइट आणि तुमच्या डिव्हाइसकरिता स्थान परवानग्या सुरू किंवा बंद करू शकता.

तुम्ही तुमचा घराचा किंवा ऑफिसचा पत्ता सेट केल्यास आणि Google ने तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये असल्याचा अंदाज लावल्यास, तुमच्या शोधासाठी नेमका पत्ता वापरला जाईल.

माझे स्थान किती अचूक असते?

तुमचा सर्वसाधारण भाग

तुम्ही Google वर शोधता तेव्हा, तुम्ही जिथून शोधत आहात त्या सर्वसाधारण भागाचा Google नेहमीच अंदाज लावेल. या प्रकारे Google तुम्हाला उपयुक्त परिणाम पुरवू शकते आणि नवीन शहरामधून साइन इन करणे यासारखी नेहमीपेक्षा वेगळी अ‍ॅक्टिव्हिटी डिटेक्ट करून तुमचे खाते सुरक्षित ठेवू शकते.

सर्वसाधारण भाग हा तीन चौ किमी पेक्षा मोठा असतो आणि त्यामध्ये किमान १००० वापरकर्ते असतात जेणेकरून, तुमच्या शोधामधील सर्वसाधारण भागामध्ये तुम्हाला ओळखले जात नाही आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात मदत होते.

तुमचे अचूक स्थान

तुम्ही परवानगी दिल्यास, Google तुमचे अचूक स्थान वापरू शकते. उदाहरणार्थ, “माझ्या जवळचे आइसक्रीम” यासारख्या शोधांसाठी सर्वात उपयुक्त परिणाम किंवा दुकानापर्यंत टर्न बाय टर्न चालण्याचे दिशानिर्देश मिळवण्यासाठी Google ला तुमच्या अचूक स्थानाची आवश्यकता असते.

अचूक स्थान म्हणजे तुम्ही नेमके कुठे आहात यासारखी माहिती, जसे की, विशिष्ट पत्ता

Google ला माझे स्थान कसे समजते?

तुमचे स्थान वेगवेगळ्या स्रोतांवरून मिळते, जे तुम्ही कुठे आहात त्याचा अंदाज लावण्यासाठी एकत्र वापरले जातात.

तुमच्या डिव्हाइसचा आयपी अ‍ॅड्रेस

आयपी अ‍ॅड्रेस हे साधारणतः फोन नंबरच्या क्षेत्र कोडसारख्याच भौगोलिक स्थानावर आधारित असतात. याचा अर्थ असा की, google.com सह, तुम्ही वापरत असलेले कोणतेही अ‍ॅप किंवा वेबसाइट तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसमुळे तुम्ही जेथे आहात त्या सर्वसाधारण भागाचा अंदाज लावू शकते. तुमच्या डिव्हाइसचा आयपी अ‍ॅड्रेस तुमचा इंटरनेट सेवा पुरवठादार तुमच्या डिव्हाइसला असाइन करतो आणि तो इंटरनेट वापरण्यासाठी आवश्यक असतो.

तुमच्या डिव्हाइसचे स्थान

तुम्ही Google अ‍ॅप किंवा साइटला तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरण्याची परवानगी दिल्यास, ती माहिती तुम्ही कुठे आहात ते समजून घेण्यासाठी वापरली जाऊ शकते. जवळजवळ सर्व डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये, सामान्यतः सेटिंग्जमध्ये बिल्ट इन स्थान सेटिंग असते.

Google वरील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी

तुमच्या मागील Google शोधांच्या आधारे, Google तुम्ही जेथे आहात त्या सर्वसाधारण भागाचा अंदाज लावू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही मुंबईमध्ये पिझ्झा बरेचदा शोधत असल्यास, तुम्हाला मुंबईमधील परिणाम पहायचे असल्याची शक्यता असते.

तुमची लेबल केलेली ठिकाणे

तुम्ही तुमचा घराचा किंवा ऑफिसचा पत्ता सेट केल्यास, तुम्ही कुठे आहात त्याचा अंदाज लावण्यासाठी Google ते वापरू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा घराचा पत्ता आणि तुमचा आयपी अ‍ॅड्रेस सेट केल्यास, मागील अ‍ॅक्टिव्हिटी किंवा स्थानासंबंधी माहितीचे इतर स्रोत सुचवतात की, तुम्ही तुमच्या घराच्या जवळ असू शकता, त्यानंतर तुम्ही कुठे आहात त्याचा अंदाज म्हणून आम्ही तुमच्या घराचे स्थान वापरू.

माझे स्थान कोण पाहू शकते?

ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही Google स्थान शेअरिंग वापरत असल्यास, तुम्ही सर्व Google अ‍ॅप्स आणि साइटवर मित्रमैत्रिणी व कुटुंबासोबत तुमचे रीअल-टाइम स्थान शेअर करू शकता.

तुम्ही तुमचे स्थान शेअर करत आहात का ते तपासा

स्थान शेअरिंग बाय डीफॉल्ट बंद असते. तुम्हाला तुमचे रीअल-टाइम स्थान शेअर करायचे असल्यास, तुम्हाला ते कोणासोबत आणि किती वेळ शेअर करायचे आहे ते निवडावे व कंफर्म करावे लागेल. तुम्ही तुमचे स्थान शेअर करणे कधीही थांबवू शकता.

तुमचे रीअल-टाइम स्थान इतरांसोबत शेअर करणे पहा.

डेटा आणि पर्सनलायझेशन

Google माझ्याबद्दलचा कोणता डेटा गोळा करते?

तुम्ही Google अ‍ॅप्स आणि साइट वापरता तेव्हा, त्या तुम्हाला पुरवण्यासाठी, तुमच्याकरिता आणखी उपयुक्त बनवण्यासाठी व Google डेटा का गोळा करते? यामध्ये स्पष्ट केलेल्या इतर कारणांसाठी आम्हाला हवी असलेली माहिती आम्ही गोळा करतो.

तुमची सेटिंग्ज वापरून, आम्ही गोळा करत असलेला डेटा आणि तो डेटा कसा वापरला जातो यावर तुम्ही मर्यादा घालू शकता. उदाहरणार्थ, आम्ही तुमचा YouTube इतिहास तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करणे तुम्हाला नको असल्यास, तुम्ही YouTube इतिहास बंद करू शकता. Google ने काय सेव्ह करावे हे मला कसे ठरवता येईल? हे पहा

डेटा म्हणजे काय?

तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये तुम्ही आम्हाला पुरवत असलेल्या, तुम्हाला वैयक्तिकरीत्या ओळखणार्‍या गोष्टींचा समावेश असतो, जसे की, तुमचे नाव आणि ईमेल अ‍ॅड्रेस. त्यामध्ये तुमच्याशी वाजवीरीत्या जोडला जाऊ शकणारा इतर डेटादेखील असतो, जसे की, आम्ही तुमच्या Google खाते मध्ये तुमच्याशी संबद्ध करत असलेली माहिती.

तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये दोन प्रकारच्या गोष्टी असतात:

तुम्ही पुरवत असलेल्या किंवा तयार करत असलेल्या गोष्टी

तुम्ही Google खाते तयार करता तेव्हा, तुम्ही आम्हाला तुमचे नाव आणि पासवर्ड यांसारखी वैयक्तिक माहिती पुरवता.

तुम्ही तयार, अपलोड करत असलेला किंवा इतरांकडून मिळवत असलेला ईमेल मेसेज आणि फोटो यांसारखा आशयदेखील तुम्ही सेव्ह करू शकता.

तुम्ही Google वर करत असलेल्या गोष्टी

आणखी चांगला अनुभव पुरवण्यासाठी, आम्ही आमच्या सेवांमधील तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दलची माहिती गोळा करतो, ज्यामध्ये तुम्ही शोधत असलेल्या संज्ञा आणि तुम्ही पाहत असलेले व्हिडिओ, तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधता किंवा आशय शेअर करता ते लोक व तुमचा Chrome ब्राउझिंग इतिहास यांसारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो.

तुम्ही Google सेवा अ‍ॅक्सेस करण्यासाठी वापरत असलेली अ‍ॅप्स, ब्राउझर आणि डिव्हाइस यांबद्दलची माहिती आम्ही गोळा करतो, जी तुमची बॅटरी संपत असताना तुमची स्क्रीन मंद करण्यासारखी वैशिष्ट्ये पुरवण्यात आम्हाला मदत करते.

आम्ही तुमच्या स्थानावर प्रक्रिया करतो, जसे की, तुम्ही टर्न बाय टर्न दिशानिर्देश यासारखी वैशिष्ट्ये वापरता तेव्हा. अधिक माहितीसाठी, स्थान विभाग पहा.

Google डेटा का गोळा करते?

आमच्या सेवा पुरवणे, त्या तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनवणे आणि आम्ही हा डेटा कशा प्रकारे वापरतो यामध्ये स्पष्ट केलेल्या इतर कारणांसाठी आम्हाला हवी असलेली माहिती आम्ही गोळा करतो.

उदाहरणार्थ, तुम्हाला जेथे जात आहात तेथे रहदारी टाळून जाण्यात Google Maps तुम्हाला मदत करू शकते कारण, ते तुम्ही कुठे आहात याबद्दलची माहिती (तुमचा डेटा) सार्वजनिक डेटासोबत (नकाशे आणि सार्वजनिक ठिकाणांबद्दलची माहिती) एकत्रित करते.

आम्ही हा डेटा कशा प्रकारे वापरतो

आमच्या सेवा पुरवणे

आमच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही डेटा वापरतो, जसे की, परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही शोधत असलेल्या संज्ञांवर प्रक्रिया करणे.

आमच्या सेवांची देखभाल करणे आणि त्यांमध्ये सुधारणा करणे

आमच्या सेवांची देखभाल करण्यात आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यात डेटा आम्हाला मदत करतो. उदाहरणार्थ, आम्ही आउटेज ट्रॅक करू शकतो. आणि कोणत्या शोध संज्ञांच्या शब्दलेखनात सर्वात जास्त वेळा चुका केल्या जातात हे समजून घेतल्याने आम्हाला आमच्या सर्व सेवांवरील स्पेल-चेक वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करण्यात मदत होते.

नवीन सेवा डेव्हलप करणे

नवीन सेवा डेव्हलप करण्यात डेटा आम्हाला मदत करतो. उदाहरणार्थ, Picasa या Google च्या पहिल्या फोटो अ‍ॅपमध्ये लोक त्यांचे फोटो कसे संगतवार लावत असत हे समजून घेतल्याने आम्हाला Google Photos डिझाइन आणि लाँच करण्यात मदत झाली.

आशय आणि जाहिरातींसह, पर्सनलाइझ केलेल्या सेवा पुरवणे

पर्सनलाइझ केलेला आशय पुरवण्यासाठी आम्ही डेटा वापरतो, उदाहरणार्थ, तुम्हाला आवडू शकतील अशा व्हिडिओसाठी शिफारशी. तुमची सेटिंग्ज आणि तुमचे वय काय आहे त्यानुसार, आम्ही तुम्हाला तुमच्या स्वारस्यांवर आधारित पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवू शकतो.

परफॉर्मन्स मोजणे

परफॉर्मन्स मोजणे आणि आमच्या सेवा कशा वापरल्या जातात ते समजून घेणे यांसाठीदेखील आम्ही डेटा वापरतो.

तुमच्याशी संवाद साधणे

आम्हाला संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटी आढळल्यास, तुम्हाला सूचना पाठवण्यासाठी आम्ही तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस वापरू शकतो

Google, आमचे वापरकर्ते आणि लोकांचे संरक्षण करणे

लोकांना ऑनलाइन आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही डेटा वापरतो, जसे की, फसवणूक डिटेक्ट करणे आणि रोखणे

गोष्टी पर्सनलाइझ करण्यासाठी Google डेटा कसा वापरते?

“पर्सनलायझेशन” हे आम्ही गोळा करत असलेली माहिती आमची अ‍ॅप्स आणि साइट तुमच्यासाठी अनुकूल बनवणे याबद्दल आहे, उदाहरणार्थ:

  • तुम्हाला आवडू शकतील अशा व्हिडिओसाठी शिफारशी
  • तुम्ही Google अ‍ॅप्स आणि साइट ज्या प्रकारे वापरता त्यासाठी अनुरूप केलेल्या सुरक्षा टिपा (सुरक्षा तपासणी) पहा

सेटिंग बंद असणे किंवा ठरावीक वयाच्या लोकांसाठी असणे यांसारख्या बाबी वगळता, जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठीदेखील आम्ही डेटा वापरतो.

मी पाहत असलेल्या जाहिराती Google पर्सनलाइझ करते का?

आम्ही दाखवत असलेल्या जाहिराती शक्य तितक्या उपयुक्त बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण आम्ही ठरावीक वयाच्या किंवा जाहिरात पर्सनलायझेशन बंद करणार्‍या लोकांसाठी जाहिराती पर्सनलाइझ करत नाही.

तरीही आम्ही जाहिराती पर्सनलाइझ न करता त्या उपयुक्त बनवू शकतो उदाहरणार्थ, तुम्ही “नवीन शू” च्या परिणामांचे पेज पाहत असल्यास, तुम्हाला एखाद्या स्नीकर कंपनीची जाहिरात दिसू शकते. जाहिरात ही दिवसातील वेळ, तुमचे सर्वसाधारण स्थान आणि तुम्ही पाहत असलेल्या पेजचा आशय यांसारख्या सर्वसाधारण घटकांवर आधारित असू शकते.

तुम्ही नियंत्रक आहात

Google ने माझ्या खात्यावर काय सेव्ह करावे हे मला कसे ठरवता येईल?

तुम्ही Photos सारखी Google सेवा वापरत असताना, तुम्हाला तुमच्या फोटोचा बॅकअप घ्यायचा आहे का आणि ते सिंक करायचे आहेत का यासारख्या गोष्टी ठरवू देणारी सेटिंग्ज असतात.

सर्व Google अ‍ॅप्स आणि साइटवरील तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यात मदत करणारी सेटिंग्जदेखील असतात. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी व YouTube इतिहास ही दोन महत्त्वाची सेटिंग्ज आहेत.

ही नियंत्रणे सुरू असतात तेव्हा:

  • Google अ‍ॅप्स आणि साइटवरील तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दलची माहिती तुमच्या Google खाते वर सेव्ह केली जाते आणि
  • सेव्ह केलेली माहिती तुमचा Google अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी वापरली जाते

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी Search आणि Maps यांसारख्या Google साइट आणि अ‍ॅप्सवर सेव्ह करते आणि त्यामध्ये स्थानासारख्या संबंधित माहितीचा समावेश असतो. ते सिंक केलेला Chrome इतिहास आणि Google सेवा वापरणार्‍या साइट, अ‍ॅप्स व डिव्हाइसवरील अ‍ॅक्टिव्हिटीदेखील सेव्ह करते.

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी तुम्हाला Maps, Search आणि इतर Google सेवांमध्ये आणखी जलद शोध, आणखी चांगल्या शिफारशी आणि आणखी पर्सनलाइझ केलेले अनुभव देण्यासाठी वापरली जाते.

YouTube इतिहास

तुम्ही YouTube वापरता तेव्हा पाहत असलेले व्हिडिओ आणि शोधत असलेल्या गोष्टी सेव्ह करते.

तुमचा YouTube इतिहास हा तुमचा YouTube अनुभव आणि इतर अ‍ॅप्स पर्सनलाइझ करण्यासाठी वापरला जातो, जसे की, तुमचे शोध परिणाम.

मी माझी अ‍ॅक्टिव्हिटी संबंधी डेटा कसा हटवायचा?

तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला डेटा तुम्ही हटवू शकता. तुम्ही कायमचा हटवण्यासाठी निवडलेला डेटा आमच्या सिस्टममधून काढून टाकणे हे केले जाते. हा डेटा आमच्या सर्व्हरवरून पूर्णपणे काढला जाईल किंवा तुमच्याशी संबंध जोडला जाणार नाही अशा स्वरूपातच ठेवला जाईल याची खात्री करण्यासाठी, आम्ही काळजीपूर्वक प्रक्रिया करतो.

तुम्ही शोधलेल्या, वाचलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टी यांसारख्या तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीचे पुनरावलोकन करण्यासाठी, माझी अ‍ॅक्टिव्हिटी येथे भेट द्या. तुम्ही विशिष्ट वेळेच्या रेंजमधील अ‍ॅक्टिव्हिटीचे विशिष्ट भाग किंवा तुमची पूर्ण अ‍ॅक्टिव्हिटी हटवू शकता.

तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी आपोआप हटवली जाणे हेदेखील निवडू शकता.

मी माझा आशय कसा डाउनलोड करायचा?

तुमच्या आशयामध्ये ईमेल, फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज, पत्रके, टिप्पण्या, संपर्क आणि कॅलेंडर इव्हेंट यांचा समावेश असतो.

तुमच्या आशयाचा बॅकअप घेण्यासाठी किंवा तुम्हाला वेगळी सेवा वापरून पहायची असल्यास, तो दुसर्‍या कंपनीकडे नेण्यासाठी, त्याचे संग्रहण तयार करण्याकरिता तुमचा डेटा डाउनलोड करणे येथे भेट द्या.

मी साइन आउट केलेले असताना माझ्याकडे कोणती नियंत्रणे असतात?

तुम्ही साइन आउट केलेले असतानादेखील Google कसे वापरायचे ते तुम्हाला निवडू देणारी नियंत्रणे तुमच्याकडे आहेत. तुम्ही साइन आउट केलेले असताना, ही सेटिंग्ज बदलण्यासाठी g.co/privacytools येथे भेट द्या:

शोध कस्टमायझेशन

आणखी उपयुक्त परिणाम आणि शिफारशींसाठी, या ब्राउझरवरील तुमचे Google शोध वापरते.

YouTube शोध आणि पाहण्याचा इतिहास

तुमच्यासाठी YouTube पर्सनलाइझ करण्याकरिता, तुम्ही पाहत असलेले व्हिडिओ आणि तुम्ही शोधत असलेल्या गोष्टी यांसारखी YouTube वरील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरते.

तुम्ही तुमच्या ब्राउझरमधील काही किंवा सर्व कुकी ब्लॉकदेखील करू शकता, पण यामुळे वेबवरील ठरावीक वैशिष्ट्ये काम करणे बंद होऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला साइन इन करायचे असते तेव्हा अनेक वेबसाइटना कुकी सुरू केल्या जाण्याची आवश्यकता असते.

साइन आउट केलेले वापरकर्ते त्यांना पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती पहायच्या आहेत का हेदेखील निवडू शकतात, मात्र आम्ही ठरावीक वयाच्या लोकांसाठी जाहिराती पर्सनलाइझ करत नाही.